Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महिला पोलिसाला चोरट्यांकडून चुना

$
0
0
बँकेतील अधिकाऱ्याला हाताशी धरून एका महिला पोलिसाच्या खात्यातून परस्पर २३ हजारांची रोकड काढण्यात आली. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रतिभा दत्तात्रय आहेर या नवप्रशिक्षणार्थी महिला पोलिसाने फिर्याद दिली आहे.

नाशकात पकडल्या बनावट नोटा

$
0
0
निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यभर कोट्यवधींच्या बेहिशेबी रकमा जप्त होत असताना नाशकातही गुन्हे शाखेने शनिवारी चार लाख वीस हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या. शंभर रुपयांची बनावट नोट ५० रुपये दराने विकली जात असल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

कार्यकर्ता सेनेचा अन् पाठिंबा भुजबळांना

$
0
0
उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांना विरोध करण्यासाठी छगन भुजबळ यांच्या पारड्यात आपले वजन टाकणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

अव्दय हिरेंच्या प्रचारासाठी राखी सावंत मनमाडमध्ये

$
0
0
आजवर मराठी मराठी म्हणत मराठीच्या नावाखाली महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या नेत्यांनी जनतेला कधी अन्न, वस्त्र, निवारा दिला का, असा सवाल करीत आणि पंतप्रधान मोदींची दृष्टी लक्षात घेऊन त्यांचे हात बलशाली करण्यासाठी राज्यात भाजपचे सरकार आणा, असे आवाहन अभिनेत्री राखी सावंत हिने केले.

भांडवलदार समर्थक पक्षाला सत्तेत बसवू नका

$
0
0
‘महाराष्ट्रात युती क‌िंवा आघाडी तुटल्याचा देखावा न‌िर्माण केला जात असला तरीही हे सर्व पक्ष आतून एकच आहेत. आण‌ि ते सर्व भांडवालदारांनाच धार्ज‌िणे आहेत. राज्यातील कष्टकरी जनतेच्या व‌िकासासाठी भांडवलदारांच्या समर्थक असलेल्या पक्षांना सत्तेत बसवू नका.

तोफा आज टिपेला

$
0
0
नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला असून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या जाह‌िरसभांचा टप्पाही आता संपला आहे. नरेंद्र मोदी, राहूल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या तोफा धडाडल्यानंतरही जिल्ह्यात निवडणुकांचे वातावरण तयार होऊ शकले नाही.

आगामी काळ इंजिनीअर्सचा

$
0
0
‘उद्योग क्षेत्रात स्पर्धा असेल तरच गुणवत्ता आणि कामगिरीचा कस लागतो. उद्याचे जग हे मोठ्या स्पर्धेचे आणि संशोधनाचे आहे. या काळात इंजिनीअर्सचे योगदान अत्यंत मोलाचे ठरणार आहे,’ असे प्रतिपादन कोकुयो कॅमलिन लिमिटेडचे चेअरमन सुभाष दांडेकर यांनी केले.

डी‌जीपी-अंबड रस्ता खड्ड्यात

$
0
0
डीजीपी नगर येथील माऊली लॉन्स ते अंबड येथील महिंद्रा कंपनी दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाल्याने नागरिकांना खड्डे चुकवित मार्ग शोधावा लागत आहे. याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

आयुक्तांविना रखडली कामे

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काम करू द्यायचे नाही या एकमेव उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी नाशिक महापालिकेला आयुक्त दिला नाही. मनसेच्या नगरसेवकांना काम करू न देता कोंडीत पकडण्याचे तंत्र राज्य सरकारने अवलंबले.

जिल्ह्यात १८ लाखांची रोकड जप्त

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी कोट्यवधींच्या नोटा जप्त होत असताना नाशिक जिल्ह्यात एकाच दिवसात सटाणा, देवळा, नांदगाव आणि निफाडमध्ये नाकाबंदी दरम्यान सुमारे १८ लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या.

NCP : महाराष्ट्रावर काय केलं ?

$
0
0
‘निवडणुकीनंतर बलात्कार केला असता,’ असे मनसेच्या तासगावचे उमेदवार सुधाकर खाडे संदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी नाशिकमध्ये खरपूस समाचार घेतला.

मतदार `राजा`!

$
0
0
ठकसेन आज तांबडं फुटायच्या आतच उठलं होतं. रायबा अन् सायबाही अंधारातच त्याच्याकडं आलं होतं. प्रचाराची आज सांगता होणार असल्यानं पाच वाजेपर्यंत त्याला जीव की रान करायचं होतं. महिनाभराची जाहीर धावपळ आज थांबणार असली तरी आजची आणि उद्याची रात्र वैऱ्याची असल्यानं ठकसेन अन् त्याच्या वर्कर सेनेसाठी सज्ज राहण्याचे आदेश निघालेले होते.

भ्रष्टवाद्यांची दादागिरी संपवा

$
0
0
‘काँग्रेस, राष्ट्रवादीने महाराष्ट्राला कायम दिल्लीपुढे झुकवत ठेवण्याचे काम केले आहे. तर आताही दिल्लीतील भाजपची सुरु असलेली दादागिरी सहन करणार आहात का,’ असा सवाल करीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक ही स्वाभिमानी महाराष्ट्राची लढाई असल्याचे सांगत भगव्याचे राज्य आणण्याचे आवाहन रविवारी येवल्यातील जाहीर सभेत केले.

उच्च शिक्षण, उपलब्धतेचे आव्हान!

$
0
0
भारतात १८ ते २३ या वयोगटातील तरुणांची संख्या २०१६ पर्यंत १४ कोटी १५ लक्ष इतकी असेल असा भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाचा अंदाज आहे. लोकसंख्येतील हाच वर्ग उच्च शिक्षण घेणारा असतो.

सुनील बागुल राष्ट्रवादीवर नाराज

$
0
0
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल हे निवडणुकीत पक्षाने विश्वासात न घेतल्याने नाराज असून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. रविवारी त्यांनी आपल्या निवडक समर्थकांची बैठक घेऊन दुसऱ्या पक्षात जाण्यांसदर्भातील चाचपणी केली.

आनंदीबेन यांचा फ्लॉप शो!

$
0
0
गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने महाराष्ट्राची मोठी वाताहत केली आहे. त्यामुळे मतदारांनी आगामी पाच वर्षांचा विचार करुन आणि राज्याची दुर्दशा थांबविण्यासाठी भाजपला संपूर्ण बहुमत द्यावी, अशी कळकळीची विनंती गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी जाहीर सभेत केली.

येवल्यात काँग्रेसची नामुष्की

$
0
0
येवला मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निवृत्ती लहरे यांनी रविवारी अनपेक्षितपणे राष्ट्रवादीचे उमेदवार व माजी मंत्री छगन भुजबळ यांना अचानक पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे मतदानाच्या दोन दिवस अाधी काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे.

नाशकात उमेदवारांचा भर रॅलींवर

$
0
0
नाशिक जिल्ह्यात जिल्ह्यातील उमेदवार आणि पक्षांनी रविवारी मतदारांपर्यत पोहचण्यासाठी जिवाचे रान केले. तर सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रचाररॅलीने शक्तीप्रदर्शन करून प्रचाराची सांगता करण्यावर उमेदवाराचा भर असणार आहे.

राज ठाकरेंविरोधात गुन्हा

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जेलरोड येथील सभा मर्यादीत वेळेपेक्षाही अधिकवेळ चालल्याने उपनगर पोलिसांनी संयोजकांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल केला आहे.

जादूटोण्यासाठी मृतदेहाचे मुंडके

$
0
0
आजारपणाची पीडा कायमची घाल‌विण्यासाठी मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार मृतदेहाचे मुंडके छाटून आणल्याचा प्रकार इगतपुरी तालुक्यातील गव्हांडे गावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images