Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रेल्वेचे विशेष फेऱ्यांचे आयोजन

0
0
विधानसभा निवडणुकांची धूम संपताच नागरिकांची दिवाळीला गावी जाण्याची लगबग सुरू होणार असून, त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यत्वेकरून सर्वात जास्त ७२ गाड्या उत्तर भारतात जाण्यासाठी सोडण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी सिंहस्थाबाबत बैठक

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांच्या अध्यक्षतेखाली येत्या शुक्रवारी (दि.१७) बैठक होणार आहे. या बैठकीसाठी रेल्वे, पुरातत्व, पर्यटन, माहिती व जनसंपर्क या विभागांना पाचारण करण्यात आले आहे.

केंद्राच्या निधीचा आराखडा द्या

0
0
गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी केंद्र सरकारकडून किती निधी हवा आहे. त्यासाठीचा विकास आराखडा तातडीने सादर करावा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने नाशिक महापालिकेला दिले. गोदावरी प्रदूषणासंदर्भात न्यायमूर्ती अभय ओक आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली.

पालिका ठेकेदार आर्थिक संकटात

0
0
बिलांचे पैसे देण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने वैतागलेल्या सुमारे ८० ते ९० ठेकेदारांनी सोमवारी आयुक्त सोनाली पोंक्षे यांची भेट घेऊन कैफीयत मांडली. मात्र, लेखा विभागाकडे चेंडू टोलावून आयुक्तांनी काढता पाय घेतला.

पत्त्यासाठी १० वर्षे पत्रव्यवहार

0
0
मतदार यादीतील नाव, मतदान चिठ्ठ्यांवरील अपूर्ण पत्ते आणि चुकांचा भरणा असलेले मतदान कार्ड या साऱ्या बाबी चव्हाट्यावर आलेल्या असतानाच निवडणूक यंत्रणेच्या करंट्या कारभारामुळे सारडा कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सुनील बागुल भाजपात दाखल

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुनील बागुल यांनी सोमवारी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. चांदवडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.

माकप, राष्ट्रवादीत धुमश्चक्री

0
0
सुरगाण्यात गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या प्रचाराला शेवटच्या दिवशी गालबोट लागले. आमने सामने आलेल्या माकप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होऊन त्याचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत झाले.

...अन् झाला महिलांचा उद्रेक

0
0
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांचा हितगुज मेळावा आयोजित करणाऱ्या नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी चांगलीच गोची झाली. सकाळी साडेअकराला नियोजित असलेला हा मेळावा तब्बल दुपारी तीन वाजता सुरू झाल्याने उपस्थित महिलांचा उद्रेक झाला आणि त्यांनी हुसेन यांच्या भाषणावेळीच गोंधळ निर्माण केला.

छुप्या प्रचार मोह‌िमांना जोर

0
0
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी सांयकाळी संपला असला, तरी सोमवार आणि मंगळवारची रात्र उमेदवारसह मतदारांसाठीही निर्णयाक ठरणार आहे. उघड प्रचार संपला असला तरी, आता छुप्या मोह‌िमेला जोर चढला असून उमेदवारांसह पक्षांकडून स्थानिक सेटलमेंटवर भर दिला जात आहे.

निर्भयपणे करा मतदान!

0
0
विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदानाचा दिवस उद्यावर येऊन ठेपला आहे. निवडणुक प्रक्र‌िया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून अनुचित प्रकार घडला तर अवघ्या पाचच मिनिटांत पोलिसांचा फौजफाटा शहरातील कुठल्याही बुथवर पोहोचू शकतो, अशी तयारी केली आहे.

कामगारांना पगारी सुटी

0
0
मतदानाच्या दिवशी म्हणजे येत्या बुधवारी कामगारांना भरपगारी सुटी देण्याचे आदेश कामगार उपायुक्तांनी काढले आहेत. हा आदेश उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे.

सटाण्यात अडीच लाख मतदार ठरविणार भवितव्य

0
0
बागलाण विधानसभा मतदारसंघातील तब्बल ११ उमेदवारांचे आज मतपेटीत भवितव्य बंद होत असुन, १९ ऑक्टोबर रोजी येथील भाक्षीरोडवरील गुरूप्रसाद मंगल कार्यालयात मतमोजणी होवून विजयाचे शिल्पकार कोण हे ठरणार आहे. तालुक्यातील तब्बल अडीच लाख मतदार बागलाणचा भाग्यविधाता ठरविणार आहेत.

अवैध मद्य विक्रीचे २३२ गुन्हे

0
0
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जोरदार कारवाया सुरू आहेत. अवैध मद्यविक्री व वाहतुकीवर आळा घालताना गेल्या महिनाभरात तब्बल २३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये १७२ जणांना अटक करण्यात आली असून २४ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

५१ हजार विद्यार्थ्यांचा वृक्षतोडीला विरोध

0
0
शहरातील २०१४ झाडे तोडू नयेत यासाठी विद्यार्थी पुढे आले आहेत. ५१ हजार विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात विरोध केला असून नागरिकांनीही कायदेशीर हरकती नोंदवाव्यात असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे. ही मोहिमेतून शहरात जनजागृती घडविण्याचाही मानस असल्याचे संघटनांनी सांगितले.

अडीच मह‌िन्यापासून फोटोकॉपीची प्रत‌ीक्षा

0
0
अभ‌ियांत्र‌िकी शाखेतील मेकॅन‌िकल व‌िभागातील व‌िद्यार्थ्यांनी साव‌ित्रीबाई फुले पुणे व‌िद्यापीठाकडे सुमारे अडीच मह‌िन्यांपासून पाठपुरावा सुरू ठेवला असला तरीही अद्याप त्यांना फोटोकॉपी देण्यात आलेली नाही. पुढच्या सेम‌िस्टरची परीक्षा आता २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

नाशिकला वर्षभरानंतर मिळाला धर्मदाय उपायुक्त

0
0
वर्षभरापासून रिक्त असलेल्या नाशिकच्या धर्मादाय उपायुक्तपदी आर. जी. मामू यांची तर सहाय्यक आयुक्तपदी ए. आर. भळगट आणि डी. बी. डोमाळे यांची नियुक्ती विधी व न्याय विभागाने केली आहे.

पोलीस मतदानापासून वंचित

0
0
निवडणुकीतील संभाव्य धुडगूस रोखण्यासाठी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे बहुतांश पोलिसच मतदानापासून वंचित राहणार आहेत. मात्र ही कैफियत त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार या न्यायाप्रमाणे स्वीकारावी लागणार आहे.

बोनससाठी महापालिकेत ठिय्या

0
0
दिवाळी​पूर्वी सानुग्रह अनुदानाची (बोनस) रक्कम महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा १६ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा म्युन्सिपल कर्मचारी-कामगार सेनेने दिला आहे. मंगळवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लेखाधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

शहरात होणार मतदानाची खातरजमा

0
0
आपण ज्या उमेदवाराला मत दिले ते त्यालाच गेले की नाही, याबाबत असलेली साशंकता यंदा दूर होणार आहे. त्यासाठी व्हीव्हीपॅट हे यंत्र प्रथमच मतदान यंत्राशेजारी ठेवले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदा प्रथमच नाशिक शहरातील मध्य, पश्चिम आणि पूर्व या तीन मतदारसंघात हे यंत्र लावले जाणार असल्याने नाशिककरांना त्यांच्या मतदानाची खातरजमा करता येणार आहे.

मालेगावसाठी प्रशासन सज्ज

0
0
विधानसभा निवडणुकीसाठी मालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघात आज, बुधवारी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. प्रचार साहित्य वाटप करण्यात आले असून कर्मचारी रवाना करण्यात आले. तसेच पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images