Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

फटाका गाळ्यांचा लिलाव

0
0
रहिवाशी भाग तसेच सुरक्षेच्या इतर नियमांचा भंग करणाऱ्या दोन विभागातील तब्बल १८ ठिकाणांना पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे महापालिका प्रशासनाला ८३ पैकी १८ जागा वगळून ६५ ठिकाणांचा लिलाव गुरूवारी करावा लागला. आज, शुक्रवारी उर्वरीत तीन विभागातील ७७ ठिकाणांचा लिलाव होणार आहे.

त्र्यंबक पालिकेवर कारवाई?

0
0
दोन आठवड्यात त्र्यंबकेश्वर पालिकेने तेथील पूजाविधीच्या साहित्याची विल्हेवाट लावली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश ग्रीन ट्रिब्युनलने दिले आहेत.

STच्या ४०० जादा बस

0
0
वर्षातील सर्वात मोठा सण अर्थात दिवाळी अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. दिवाळीनिमित्त आपल्या गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा नाशिक विभागाने नियमित गाड्यांव्यतीरिक्त अतिरिक्त ४०० पेक्षा अधिक बसेसचे नियोजन केले आहे

नाशिकमध्ये तिघांची आत्महत्या

0
0
नाशिक शहरात तीन वेगवेगळ्या भागांमध्ये तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मखमलाबाद, राणेनगर आणि शालिमार येथे या आत्महत्येच्या घटना घडल्या.

शालिमार चौकात तरुणावर वार

0
0
शालिमार येथे एका तरुणावर धारदार हत्याराने वार करण्यात आले. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

मतमोजणीचे काउंटडाऊन

0
0
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी होणार असल्याने त्यासाठीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, कोण विजयी होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

३० ते ३५ टक्के मते निर्णायक

0
0
२००९ च्या तुलनेत २०१४ च्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत नाममात्र फरक पडला असून त्याचा एकाच उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता कमी आहे. साधारणतः ३० ते ३५ टक्के मते मिळवणारा उमेदवार विजयी ठरू शकतो.

अन् शहरात टक्का घसरला

0
0
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात अत्यल्प मतदान होण्यास उमेदवारांची अधिक संख्या हे कारण असू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यास दुजोरा दिला असून, मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचाही परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे दिसून येत आहे.

पावसाची हजेरी

0
0
शहराच्या अनेक भागात गुरुवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नाशिककरांची मोठी तारांबळ उडाली. काही भागात पावसाचा जोर अधिक होता तर काही भागात वाऱ्याचा वेग मोठा होता.

गावित,कराड,गितेंची खर्चात आघाडी

0
0
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी केलेल्या खर्चाची आकडेवारी जमा करण्यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत निर्मला गावित, डी. एल. कराड आणि वसंत गीते यांनी खर्चात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

मनपा कर्मचा-यांना बोनस

0
0
आदर्श आचारसंहिता लागू असताना सानुग्रह अनुदान (बोनस) रक्कम देता येऊ शकते या प्रश्नास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ उत्तर दिल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सहा पोलिसांचे निलंबन

0
0
निवडणूक बंदोबस्ताची ड्युटी न करता कामावर गैरहजर राहिलेल्या ६ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ५ कर्मचारी पोलिस मुख्यालयातील तर १ कर्मचारी शीघ्र कृती दलातील (क्यूआरटी) आहे.

उडविले साडेसोळा कोटी!

0
0
निवडणूक काळातील पैशाचा वापर हा तसा नवा विषय नसला तरी अलीकडे त्याचा होणार मुक्त वापर ही चिंतेची बाब बनली असतानाच नाशिकमधील काही मतदारसंघात झालेली कोटीच्या कोटी उड्डाणे हा चौकशीचा मुद्दा बनला आहे.

नाशकात मतदार महिलेला जाळलं!

0
0
आपण सांगितलेल्या उमेदवाराला मत दिले नाही म्हणून तीन राजकीय कार्यकर्त्यांनी एका वृद्ध महिलेला मारहाण करून पेटवून दिल्याचा भयंकर आणि संतापजनक, असा प्रकार येवला तालुक्यात घडला आहे. गंभीररीत्या भाजलेली ही महिला सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

अनोख्या इच्छाशक्तीचा स्वामी

0
0
आंपलचंपलमध्ये ती असायची कच्चा लिंबू, मी हे जरा मोठ्यानंच ओरडायचो...बाप रे नाकाचा शेंडा केवढा तरी लालबुंद व्हायचा, तोंडातल्या तोंडात ती पुटपुटायची...चिडून पळत हिंडायची.

आठवणीतली दिवाळी

0
0
शहरात राहत असताना दिवाळीची चाहूल लागली की आठवते ती तीस-चाळीस वर्षांपूर्वीची माझ्या गावातली दिवाळी. दिवाळीत मातीच्या पणत्यांच्या ओळीच ओळी घरोघरी-दारोदारी झगमग करीत असायच्या.

ती दिवाळी आता कोठे?

0
0
दिवाळी म्हटलं की अनेक आठवणी भुईनळातल्या असंख्य चमचमणाऱ्या ताऱ्यांसारख्या मनाच्या पडद्यावर उमलून येतात. दिवाळी लहानपणापासून मला खूप-खूप आवडणारी.

द्रौपदी वस्त्रहरण

0
0
वॉश तंत्राबद्दलची बरीच माहिती यापूर्वीच्या लेखांबधून आपण घेतली. साधारणपणे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ते २० व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत वा मध्यापर्यंत या तंत्रात भरपूर चित्रे काढली गेली.

मांडा एक उत्सव

0
0
मांडे करण्याला मांडा घडणे असे म्हणतात. दागिना घडण्यासारखे कलाकुसरीचे काम म्हणून. मी आपण मांडा घडतांना पाहिला आहे काय? असे शीलाताई आपटे, रजनीताई दांडेर, शरदिनी डहाणूकर, मीरा जोगळेकर गुलाबचंद, उल्का नाटेकर या सगळ्यांना विचारले, सगळ्यांचे उत्तर नाही असे होते.

ठेकेदारांच्या बिलांसाठी २५ कोटी

0
0
अर्थसंकल्पातील तरतुदी कमी पडू लागल्याने त्या वाढवून संबंधीत ठेकेदारांना योग्य त्या प्रमाणात पैसे अदा करण्याचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी दिल्यानंतर आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी विविध विभागाच्या कामांसाठी सुमारे २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images