Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

फरांदेंची मतदिवाळी

0
0
नाशिक मध्य मतदारसंघात मनसेचे आमदार वंसत गिते यांचा धक्कादायक पराभव झाला. या जागेवर भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे यांनी मोदी लाटेवर स्वार होत विजयश्री खेचून आणली आहे. फरांदे यांनी गिते यांचा तब्बल २८ हजार १५८ मतांनी पराभव केला

उत्तर महाराष्ट्राची भाजपला साथ

0
0
मोदी लाटेवर स्वार होत भारतीय जनता पक्षाने उत्तर महाराष्ट्रात जबरदस्त मुसंडी मारली आहे. शिवसेनेला मात्र आपल्या जागा राखण्यात कसेबसे यश मिळाले. काँग्रेसने आश्चर्यकारकरित्या आपली कामगिरी सुधारली असतानाच राष्ट्रवादीला मात्र चांगलाच फटका बसला आहे.

`संतुलित आहार प्राधान्याचाच`

0
0
माणसाने नेहमी क्रियाशिल राहिले पाहिजे. रोजच्या रोज व्यायाम तर करावाच. परंतु, याबरोबरच रोजच्या आहारात संतुलित आहारालाही प्राधान्य द्या, असे प्रतिपादन प्रसिद्ध आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी केले.

टीईटीचा अर्ज भरण्यासाठी झुंबड

0
0
महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी शिक्षकांना अग्नीपरीक्षेला सामोरे जावे लागत आहे. कडक उन्हात अर्ज भरण्यासाठी शिक्षकांच्या रांगा लागल्या असून, अर्ज तपासण्यासाठी स्टाफ वाढविण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.

सुवर्ण खरेदीदारांनो, सावधान!

0
0
ग्राहकहो, सध्या बाजारात दिवाळी निमित्ताने सेल, बक्षिस योजना, लकी ड्रॉ ची धूम आहे. सोने खरेदीसाठी हा शुभकाळ मानला जातो. सृष्टीच्या मांगल्याचा उत्साह मनामनात संचारतो. काही ग्राहक सोने खरेदीला गुंतवणूक समजतात.

एमआयडीसीत पोलिसांचे ‘जागते रहो’

0
0
दिवाळी काळात औद्यो‌गिक वसाहतींमध्ये शुकशुकाट राहात असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढते. या काळात चोरीच्या घटना रोखता याव्यात यासाठी योग्य ती खबरदारी घ्या, असे आवाहन पोलिसांन‌ी उद्योजकांना केले आहे.

फटाक्यांच्या दुकानांवर कारवाईची मागणी

0
0
शहराच‌ी मध्यवस्ती असलेल्या भद्रकाली परिसरात बेकायदेशीररित्या ३५ ते ४० फटांक्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असे फटाके स्टॉल्स धोकादायक असून, याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदू खाटिक युवा महासंघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत लासुरे यांनी केली आहे.

तत्काळच्या तिकिटांवर मिळणार सवलत

0
0
रेल्वेतर्फे वितरीत करण्यात येणाऱ्या तत्काळ तिकिटांच्या वाटपात सुसूत्रता आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून बदल करण्यात येत असून, उपलब्ध असलेल्या तत्काळ तिकिटांच्या ५० टक्के तिकिटे नियमित दरात तर उरलेली ५० तिकिटे डायनॅमिक दरात विक्री करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

देवळाली कॅम्पला उत्सवाचे स्वरूप

0
0
दिवाळीच्या शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या देवळाली कॅम्पला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रविवारी गर्दीचा उच्चांक नोंदवला गेला. यंदा मुलांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मोदी पॅटर्नसह, कार्गो पॅन्ट, जॅकेट शर्ट, थ्री पीस यांना चांगली मागणी आहे.

चंपानगरीत स्वच्छता मोहीम

0
0
जेलरोड येथील जुना सायखेडा मार्गावरील चंपानगरीमध्ये शौचालयाचे चेंबर तुंबल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली होती. महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याचे वृत्त प्रकाशित होताच, विभागीय अधिकारी किशोर चव्हाण आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांनी तातडीने कार्यवाही केली.

आमदारांचा पहिला दिवस मुंबईवारीत

0
0
आमदारपदी निवडून आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी आपला पहिला दिवस सकाळच्या सत्रात सत्कारात, तर दुपारनंतर मुंबईवारी करण्यात घालवला. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुबंईत पक्षाच्या बैठकीला हजेरी लावत राज्यात बदललेल्या राजकीय स्थितीचाही अंदाज घेतला आहे.

पहिलीच महासभा तहकूब

0
0
महापौरपदी विराजमान झालेल्या अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेली पहिलीच महासभा तहकूब झाली. त्यामुळे सभागृह नेतेपदाची घोषणा आणखी पुढे ढकलली गेली.

मंत्रिपदासाठी लॉबिंग

0
0
राज्यात भाजपचे सरकार येण्याची दाट चिन्हे असून, नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी भाजपच्या आमदारांनी लॉबिंग सुरू केले आहे. मं‌त्रिमंडळात स्थान मिळणार असल्याने नाशिक जिल्ह्यातून मंत्रिपद मिळविण्यासाठी चारही आमदारांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

भाजपसोबत जुनाच मित्र हवा!

0
0
राज्यात भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या तरी स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. यामुळे सरकार स्थापन्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे.

भाजपचे मिशन सिंहस्थ अन् महापालिकेची सत्ता

0
0
नाशिक शहरातील तीन आणि ग्रामिणची एक अशा चार जागा प्रथमच जिल्ह्यात जिकंल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. भाजप कार्यालयात नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार सोहळ्यात याचा प्रत्यय आला असून जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपचा नारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

व्यावसायिकाला धमकावून पैसे हिसकावले

0
0
दारू पिण्यास पैसे दिले नाहीत तर तुझ्या पोटात चाकू खुपसेन, असे धमकावून गिरणी चालकाजवळील पैसे हिसकावणाऱ्यावर पंचवटी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

‘येस, आय कॅन डू इट’

0
0
अशक्य या शब्दाला आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका. मनापासून मेहनत केली तर नक्कीच आपण यशस्वी होतो. ‘येस, आय कॅन डू इट’ हा मूलमंत्र दागिन्यासारखाच जपा तुम्हीही मौल्यवान व्हाल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेती यलो फेम गर्ल गौरी गाडगीळ यांनी केले.

निवडणूक भत्त्यापासून पोलिस अजूनही वंचित

0
0
निवडणूक प्रक्रिया अत्यंत सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी कसोशीने झटणाऱ्या पोलिस यंत्रणेला मात्र भत्त्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील भत्ता अद्यापही पोलिसांना अदा करण्यात आलेला नाही.

पाच वाहने चोरीस

0
0
शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, चोरीची वाहने नेमकी जातात कुठे असा सवाल उप‌स्थित होत आहे. दोन दिवसांत शहरातून तब्बल ५ वाहने चोरीस गेली असून त्यामध्ये ट्रक आणि एका इनोव्हा कारचा समावेश आहे. नाशिकरोड आणि आडगाव परिसरात या घटना घडल्या.

सभापतीपदासाठी रस्सीखेच

0
0
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी आज, मंगळवारी दुपारी एक वाजता राजीव गांधी भवन येथे निवडणूक पार पडणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images