Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

परिश्रमाने दिग्गजांना चारली धूळ

$
0
0
भाजपच्या दिग्गज इच्छुकांना बाजूला सारत नाशिक पश्चिमधून रिंगणात उतरलेल्या सीमा हिरेंच्या परिश्रम आणि आत्मविश्वासाला नरेंद्र मोदींच्या लाटेची साथ मिळाल्याने, चुरशीची लढाई सोपी करीत जिंकली.

गाड्या पेटविण्याचे सत्र सुरूच

$
0
0
नाशिकरोडला गाड्या पेटवून दहशत निर्माण करण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. दिवाळीत उपनगर परिसरात रात्री पल्सर मोटरसायकल पेटविल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दिवाळीत डेंग्यूचा वाढता धोका

$
0
0
नाशिक शहरात ऐन दिवाळीत अस्वच्छेतेचे साम्राज्य पसरल्याने डेंग्यून पाय पसरवले आहेत. शहरात गेल्या तीन आठवड्यात तब्बल १४० डेंग्यू सदृश्य संशयित रुग्णांपैकी ६८ जणांचा डेंग्यूचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

पालकमंत्रीपदी खडसेंनाच पसंती

$
0
0
आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळणारे आणि आता भाजपच्या सत्तेत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले एकनाथ खडसे संभाव्य मंत्रिमंडळात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री रहावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पारंपरिक राजकीय समीकरणांना छेद

$
0
0
स्वतःबद्दलचा फाजील आत्मविश्वास, विरोधी उमेदवाराविषयीचे अज्ञान, सत्ता व संपत्तीचा उन्माद आणि अकार्यक्षमता अशा विविध कारणांनी जिल्ह्यातील बहुसंख्य उमेदवारांचा विधानसभा निवडणुकीत पाडाव झाल्याचा निष्कर्ष काढता येतो.

रन फॉर युनिटी

$
0
0
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या ३१ ऑक्टोबरला रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात विभागीय महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. त्यानुसार विविध संस्था-संघटनांसह विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे.

कमी दाबाने पाणीपुरवठा

$
0
0
नाशिकरोड येथील शिखरेवाडी परिसरात ऐन दिवाळीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेने वेळेवर व पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भूविकास बँका संकटात

$
0
0
राज्यातील भूव‌िकास बँका पुनरुज्जीवित करण्याबाबत दाखल जनह‌ित याच‌िकेच्या सुनावणीत शासनाची फेरआढावा याच‌िका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने शासनाला या याच‌िकेवर ३० नोव्हेंबरपर्यंत न‌िर्णय घेण्याचे आदेश द‌िले आहेत.

तारांगण आर्थिक अडचणीत

$
0
0
खगोलप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या यशवंतराव चव्हाण तारांगणासाठी दिवाळीनंतर ठेकेदाराचा शोध सुरू होणार आहे. अनेक वर्ष बंद असलेले हे तारांगण गत वर्षाच्या अखेरीस सुरू करण्यात आले होते.

महामार्ग स्टँड गैरसोयींचे आगार

$
0
0
महामार्ग बसस्टँडची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. येथील अनेक समस्यांमुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागत आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी या बसस्टँडचे नूतनीकरण होणार असल्याचे सांगितले जात असले तरी हे काम केव्हा सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मनपाचा बनावट अहवाल

$
0
0
वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांच्या अहवालाविरोधात महापालिका अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये चुकीची माहिती सादर केली. यातून गैरसमज तयार झालेत. यामुळे खोटा अहवाल सादर करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांनी मुख्य वन संरक्षकांकडे हरकतीद्वारे केली आहे.

देवळालीत घोलप लाट

$
0
0
राज्यात आणि देशात कोणतीही लाट असो, देवळाली मतदारसंघात मात्र बबनराव घोलप यांचीच लाट असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सिनीअर घोलप नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीचा लाभ उठवण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांना घोलपांनी पुन्हा धोबीपछाड दिली

साधुग्राम विकास योजना

$
0
0
साधुग्रामसाठी आवश्यक जागेच्या अधिग्रहणाला पुढील आठवड्यात वेग येणार असून त्यासंबंधीच्या नोटिसा दिल्या जाणार आहेत. साधारण महिन्याभराच्या कालावधीत ही जागा अधिग्रहित करून ती महापालिकेच्या हवाली केली जाणार आहे.

दिवाळीचा जल्लोष

$
0
0
लक्ष्मीपूजनाचे व‌िव‌िध मुहूर्त साधत गुरुवारी नाश‌िक शहर आण‌ि परिसरातील बाजरपेठेत नवचैतन्य संचारले. सोने, चांदीसह, इलेक्ट्रॉन‌िक्स वस्तूंची खरेदी अन् वाहन बाजारातील तेजीमुळे शहरात कोट्यवधींची उलाढाल झाली.

सिंहस्थासाठी ‘यशदाची’ मदत

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यासाठी पुण्यातील यशदा संस्थेची मदत घेतली जाणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तयार केलेल्या आराखड्याला अंतिम रूप देतानाच हा आराखडा सर्वंकष होण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

मनसेत दिवाळीनंतर फुटेल बॉम्ब

$
0
0
विधानसभेच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत नाशिकमधील मनसेचा गड कोसळ्याने, झालेल्या हाराकिरीचे खापर मोठ्या नेत्यांवर फोडले जाणार आहे. पक्षात दिवाळीनंतर मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

ट्रक उलटून ४० जखमी

$
0
0
त्र्यंबकेश्वरपासून २० किलोमीटर अंतरावरील तोरंगण घाटात गुरूवारी मजुरांचा ट्रक पलटल्याने ४० मजूर जखमी झाले. यात महिला व लहान मुलांचा देखील समावेश आहे.

रंगल्या रेड्यांच्या टकरी

$
0
0
कधी एकमेकांच्या नजरेला नजर तर, कधी त्यानुसार अंदाज घेताना आपल्या पवित्र्यानुसार पुढे चाल करीत जोरदार आक्रमण होऊन मोठ्या टकरा अन् धडकांवर धडका… तकरांचा गुंजणारा आवाज.

चार हजार आदिवासींची भाऊबीज झाली गोड

$
0
0
‘एक वस्र मोलाचे’ हा येवल्यातील सेवाभावी संस्था खटपट युवा मंचच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणारा नावीन्यपूर्ण उपक्रम यंदाच्या दिपावलीतही कौतुकास्पद ठरला. या उपक्रमातंर्गत चार हजार आदिवासी बांधवांना वस्रांचे वाटप करण्यात आले.

पाणीप्रश्नासाठी आमदार चव्हाणांना साकडे

$
0
0
सटाणा शहरातील कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रलंबित असलेल्या केळझर पाणीपुरवठा योजनेला चालना देण्यात येवून शहरातील पाणीटंचाई कायमस्वरूपी सोडविण्यासाठी बागलाणच्या नवनिर्वाचित आमदार दीपिका चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा सटाणावासीयांनी व्यक्त केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images