Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उन्हाच्या झळांनी नाशिककर हैराण

$
0
0
गेल्या आठवडाभरापासून वाढलेल्या तापमानामुळे नाशिककरांना हैराण केले आहे. पाणी टंचाई आणि ऊन्हाची वाढती तीव्रता यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाच्या झळांमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले असून आठवडाभरातच दवाखान्यांमध्ये ताप, सर्दीच्या पेशंटच्या संख्येत वाढ झाली आहे.

नॉन होम ब्रँचच्या नावाने ग्राहकांची लूट

$
0
0
बँकींग क्षेत्रात स्पर्धा वाढीस लागावी म्हणून रिझर्व्ह बँकेने संस्था, संघटना आणि कंपन्यांनाही बँक उघडण्यास मुभा दिली असताना सद्यस्थितीत बँका ग्राहकांची मनमानी पद्धतीने लूट करीत असल्याचे दिसून येत आहे.

असमन्वयाचे दुभाजक

$
0
0
रस्ते अपघातांना वाहनचालकांसोबतच शहर विकासातील दोष व त्रूटीही तितक्याच कारणीभूत असतात, हे विसरुन चालणार नाही. वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याच्या वाटेवर निघालेल्या नाशिकला लागलेले अपघातांचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही.

आदिवासींच्या अंधश्रद्धेचे ग्रहण सुटणार

$
0
0
प्रदीर्घ काळापासून आदिवासी भागात असलेले अंधश्रद्धेचे ग्रहण सुटण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आदिवासी विकास विभागाशी हातमिळवणी केली असून येत्या काळात आदिवासी भागात अंधश्रद्धा निर्मुलनासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

कामगार औद्योगिक सुरक्षेचा केंद्रबिंदू

$
0
0
'उत्पादकता आणि सुरक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. औद्योगिक क्षेत्रात सुरक्षाचक्र हे २४ तास आणि ३६५ दिवस कार्यरत असणे आवश्यक आहे. तसे झाल्यास सुरक्षा संस्कृती उदयास येईल. पण, या सुरक्षेचा केंद्रबिंदू कामगार आहे,' असे प्रतिपादन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे डेप्युटी डायरेक्टर आर. डी. दहिफळे यांनी केले.

रस्त्याने वाढविले मणक्यांचे विकार

$
0
0
पोलिस आयुक्तालय ते कृषीनगर जॉगिंग ट्रॅक समोरील रस्त्याची सध्या प्रचंड अवकळा झाली असून त्यामुळे या रस्त्याचा दररोज वापर करणाऱ्यांना मणक्यांचे विकार जडत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

पाण्याविषयी 'एमआयडीसी'त नियोजनाचा दुष्काळ

$
0
0
सध्याच्या दुष्काळी स्थिती लक्षात घेत आगामी काळातील पाणी नियोजनाचा सर्वत्र गंभीर विचार सुरु असताना उद्योगांसाठी आगामी काळात लागणा-या पाण्याबाबत नियोजनच नसल्याने 'एमआयडीसी'त अकलेचा दुष्काळ असल्याची धक्कदायक बाब निदर्शनास येत आहे.

करमणूक कराची धूरा ऑपरेटरच्या हाती

$
0
0
केबल ग्राहकांकडून मासिक रकमेपोटी ठराविक पैसे गोळा करून नंतर जिल्हा प्रशासनाकडे करमणूक कर भरण्याची पारंपरिक पद्धत 'एसटीबी' (सेट टॉप बॉक्स) लावल्यानंतरही कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महापालिकेत जबाबदा-यांची खिरापत

$
0
0
महापालिकेत अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरीही प्रत्यक्षात परिस्थिती अतिशय गंभीर आहे. जकात विभागाचे उपायुक्त हरिभाऊ फडोळ आणि कर संकलन विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्याकडे तब्बल १३ (प्रत्येकी) विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

'ब्लॅकमेलिंग' प्रकरण पेटले

$
0
0
गंगापूर गावातील मलनि:सारण केंद्र (एसटीपी) होऊ नये म्हणून मनसेचे नेतेच प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने सत्ताधारी व आयुक्तांच्या निषेधार्थ मुख्यालयाबाहेर आंदोलन केले.

भंडाराप्रकरणी कृती समितीचा मोर्चा

$
0
0
राज्यातील दलित आदिवासी बहुजन समाजावरील वाढलेला अन्याय व भंडारा जिल्ह्यातील तीन बहिणींचा झालेला संशयास्पद मृत्यू, याविरोधात सोमवारी 'अत्याचारविरोधी कृती समिती'तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

नदीजोड प्रकल्पासाठी जाधव यांचे उपोषण सुरू

$
0
0
नदीजोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीसह तीन मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक जाधव यांनी रविवारी सकाळपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उत्तर भारतातील नद्यांचे वाया जाणारे पाणी दक्षिण भारतातील नद्यांमध्ये सोडावे जेणेकरून भारतात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

शिखरेवाडीतील तरुणाचा निर्घृण खून

$
0
0
पार्टी करून घरी परतणा-या एकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हरिभाऊ कोल्हे (४५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते शिखरेवाडी परिसरात राहत होते.

'टीईटी' आवश्यकच

$
0
0
शिक्षकांची संबंधित पदाची पात्रता तपासण्यासाठी घेतल्या जाणा-या परीक्षांना नेहमीच विरोध झाल्याचे निदर्शनास आले आहे. सेट आणि नेट परीक्षांमुळे सुरू झालेला गोंधळ हे त्याचे उदाहरणच म्हणता येईल.

बड्या कंपन्यांवर पालिकेची मेहरनजर

$
0
0
महापालिकेच्या घरपट्टी वसुलीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून एका बड्या हॉटेलच्या मालकांना संबंधित उपायुक्तांनी परस्पर सुमारे सहा लाखांची सुट दिली आहे.

छोटा पठाणाला कोठडी

$
0
0
कैदी पार्टीतील पीएसआयवर प्राणघातक हल्ला करून पोबारा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समीर पठाण (छोटा पठाण) याला सरकारवाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला सायंकाळी कोर्टासमोर हजर करण्यात आल्यानंतर एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

आठवडाभरात 'एसई'चा निकाल

$
0
0
सेकंड इअर इंजिनीअरिंगचा (एसई) जवळपास अडीच महिन्यांपासून रखडलेला निकाल येत्या आठवडाभरात लागण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे विद्यापीठातील विश्वसनीय सूत्रांमार्फत देण्यात आली.

सरकारी यंत्रणा 'इंडिया बुल्स'च्या दावणीला

$
0
0
'इंडिया बुल्स'साठी एकलहरा ते गुळवंच दरम्यान खासगी रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या निषेधार्थ 'शेतकरी संघर्ष समिती'ने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. भूसंपादन बेकायदा असून, एमआयडीसी व जिल्हा प्रशासनाच्या अधिका-यांकडून या प्रक्रियेला चाप लावण्याऐवजी शेतक-यांवर दहशत निर्माण केली जात असल्याचा थेट आरोप समितीने केला आहे.

राष्ट्रवादीत 'नाना-नाना' ना रे

$
0
0
खुद्द 'दादां'च्या उपस्थितीत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या 'नानां'ना जिल्ह्यातील 'हेविवेट' नेत्यामुळे पदापासून दूर राहावे लागत आहे. तर याच 'हेविवेट' नेत्याला 'दादां'चा वादा देत खुले आव्हान देणारे आणखी एका 'नानां'नाही पक्षीय जबाबदारीपासून बेदखल केले जात आहे.

सहा लाख रोपे जळाली

$
0
0
बागलाण तालुक्याच्या पश्चिमपट्टातील केळझर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या दोन रोपवाटिकांमधील तब्बल सहा लाख रोपे केवळ हलगर्जीपणामुळे जळून गेली आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images