Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गटबाजी होऊनही गावितांना मिळाली संधी

$
0
0
इगतपुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक चांगलीच गाजली. या निवडणुकीत अनेक बाबींवर गांभीर्याने चर्चा झाल्या. निर्मला गावितांच्या विजयाला जशी अनेक कारणे आहेत, तशीच विरोधकांच्या पराभवालाही बरीच कारणे आहेत.

उजळले हेमाडपंती शिवालय

$
0
0
‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले’ या काव्यपंक्तीचा प्रत्यक्ष अनुभव झोडगेकरांनी यंदाच्या दीपोत्सव २०१४ मध्ये घेतला. दिव्यांच्या प्रकाशात काळ्या पाषाणातील माणकेश्वर हेमाडपंती शिवालयाच्या प्रांगणात १००० दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात ‘झोडगे दीपोत्सव २०१४’ उत्साहात साजरा झाला. दीपोत्सवाचे हे पाचवे वर्ष होते.

एमआयडीसीत पुन्हा वाजणार भोंगा

$
0
0
दिवाळी म्हणजे इतरांप्रमाणेच कामगारांसाठीही आनंदाचा सण. आठवडाभराच्या उत्साहपूर्ण वातावरणातून कामगारांना एक प्रकारे नवी ऊर्जाच मिळते. हीच ऊर्जा घेऊन आज, सोमवारपासून कारखान्यांतील मशिनरी धडाडणार आहेत.

साथीच्या रोगांचे थैमान

$
0
0
नाशिकरोड परिसरात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून, अनेक खासगी दवाखाने गर्दीने ओसंडून वाहत आहेत. शहरातील नागरिकांना मलेरिया, डेंग्यु या सारख्या रोगांनी ग्रासले असून, शहरात स्वच्छता मोहिम राबवावी अशी मागणी करण्यात येत आहे.

गढूळ पाण्याची ‘छाया’

$
0
0
सातपूर कॉलनीतील आनंद छाया परिसरात पाच महिन्यांपासून रहिवाशांना पिण्याचे गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अनेक ठिकाणी पाण्याची लाईन खोदून तपासली असतानाही लिकेजची समस्या सुटलेली नाही.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

$
0
0
उच्च शिक्षणाचे नियंत्रण, नियमन, अनुदाने, दर्जा, परवानगी, गुणवत्ता मापन यासाठी राष्ट्रीय स्तरावर अनेक संस्था कार्य करतात. उदा. विद्यापीठ अनुदान आयोग, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, नॅक, राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद आदी.

स्वच्छतेतून आत्मदर्शनाकडे

$
0
0
स्वच्छतेचा संबंध कशाशी असतो? केर काढणे आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो दुसऱ्या एका व्यवस्थेच्या हवाली करणे एवढीच स्वच्छता मर्यादित असू द्यायची का? कचऱ्याचे प्रचंड डोंगर, अहोरात्र जाळणारे कचऱ्याचे ढीग काय स्वच्छतेचे प्रतीक आहेत?

दिवाळी अंक मेजवानीला पसंती

$
0
0
दिवाळी निमित्त कपडे, आकाश कंदील, पणत्या, रंगीबेरंगी लाईट्स, फटाके यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची दरवर्शी झुंबड उडते. तशीच दिवाळी अंकाना देखील वाचकांची विशेष मागणी असते.

योग्यता प्रमाणपत्र अनिवार्य

$
0
0
बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटसह कागदपत्रे ३१ ऑक्टोबरपर्यंत विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. कागदपत्रांखेरीज अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

रेल्वे स्टेशनवर गर्दीचा महापूर

$
0
0
दिवाळीचा सण अखेरच्या टप्प्यात आला असताना मामाच्या गावी जाण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर छोट्यांसह नागरिकांनी गर्दी केली असून रोजच्या तुलनेत तिप्पट गर्दी होत असल्याने तिकीट काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे.

ऐन दिवाळीत गारठले नाशिककर!

$
0
0
दिवाळीनंतर गुलाबी थंडी अनुभवणाऱ्या नाशिकरांना यंदा ऐन दिवाळीत अचानकपणे गारठ्याला सामोरे जावे लागले आहे. अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) निर्माण झाले आहे.

वातावरणातील बदलाने इगतपुरीही गारठले

$
0
0
जिल्ह्याचे काश्मिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातही वातावारणाच्या फेरबदलामुळे तालुका गारठला असून, टप्याटप्याने पावसाचा शिडकावाही होत आहे.

ग्रामीण आरोग्य सेवेलाच उपचाराची गरज

$
0
0
तालुक्यातील तीन ग्रामीण रुग्णालये व ११ प्राथमिक आरोग्य केंद्राचा भलामोठा पसारा असलेल्या तालुक्यातील आरोग्यसेवा कागदावर मोठी असली तरी प्रत्यक्षात सेवेचा बोजवारा उडाला आहे.

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांवर बुरशीचा प्रादुर्भाव

$
0
0
वातावरणात बदल झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. अधूनमधून पावसाचा शिडकावा व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

फटाका स्टॉल गेले, कचऱ्याचे काय?

$
0
0
दिपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सातपूर क्लब हाऊस मैदानावर फटाक्यांचे अठरा स्टॉल लागले होते. दिवाळी सण झाल्यानंतर हे स्टॉल हटल्यानंतर येथील कचरा मात्र तसाच पडून आहे.

तयार डांबरी रस्त्यावर खडी टाकून रुंदीकरण

$
0
0
शहरातील होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. परंतु, शहराचे भूषण असलेला त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पपया नर्सरीजवळ डांबरी रस्त्यावरच डांबर टाकून खडीकरण करण्यात आले आहे.

जवखेडा घटनेच्या निषेधार्थ त्र्यंबकेश्वरमध्ये मोर्चा

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे फुले, शाहू, अंबेडकरी विचार अभियान राबविणाऱ्या संघटनेने नगर जिल्ह्यातील जवखेडा येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. बौध्द समाज बांधव लक्षणीय संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

सरकी ढेप चोरी : घोटीत दोघे ताब्यात

$
0
0
गेल्या दोन महिन्यांपूर्वी घोटी शहरातील एका व्यापाऱ्याच्या मालकीच्या खंबाळे येथील गोडावूनमधून सरकी ढेपच्या २६० गोण्या चोरीस गेल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयित युवकांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली आहे.

झोपडीस आग लागून तीस शेळ्यांचा मृत्यू

$
0
0
कळवण तालुक्यातील देवळी वणी येथे ऐन दिवाळीत झोपडीला आग लागून वीस लहान बछडे व दहा मोठ्या बकऱ्या आगीत जळून खाक झाल्या. या घटनेत एकूण १,९८,००० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

कचरा डेपोचा प्रश्न सुटता सुटेना

$
0
0
त्र्यंबक नगरपालिकेच्या सफाई कामगरांचे आरोग्य धोक्यात आले असून, दिवाळीचा सण कामगार चाळीसह परिसरातील रहिवासींना दुर्गंधीने बेजार करणार ठरला. त्र्यंबकेश्वर येथील कचरा डेपोचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images