Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

खराब हवामानाची नाशिककरांना बाधा

$
0
0
दिवाळीपासून वातावरणात सतत बदल होत असल्याने बदललेल्या हवामानाची नाशिककरांना बाधा झाली आहे. सर्दी, पडसे, खोकल्याच्या तक्रारी वाढल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

नाशिकच्या कार्यकर्त्यांवर फडणवीसांनी पाडली छाप

$
0
0
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारत असलेले देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी नाशिकला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी आपल्या व्यक्तीमत्वाची छाप कार्यकर्त्यांवर पाडली होती.

अशोकस्तंभ ते ‘आर के’ पर्यंत रस्ता कामामुळे वाहनांना नो एन्ट्री

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशोक स्तंभ ते रविवार कारंजा या एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

जळगावात डिसेंबरमध्ये जलमंथन

$
0
0
पाणीटंचाई आणि सुरक्षा या दोन प्रश्नांसदर्भात येत्या डिसेंबरमध्ये जळगावात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद होणार असून, त्यात देशाच्या विविध भागातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून पाणीप्रश्नी देशव्यापी अभियानाला प्रारंभ केला जाणार आहे.

गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईची सूचना

$
0
0
येवला पंचायत समितीचे सभापती जयंत वाघ यांनी बुधवारी पंचायत समिती कार्यालयातील अंतर्गत सर्व उपविभागीय कार्यालयांना अचानक भेट देत गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची संबंधित विभाग प्रमुखांना सूचना केल्या.

टोमॅटो शेड हटविण्यास ४ आठवड्यांची मुदत

$
0
0
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला टोमॅटो शेड हटविण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने चार आठवड्याची मुदत दिली असून, दहा लाख रुपये सुरक्षा अनामत रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. शेड हटविण्यासाठी मुदत मिळावी म्हणून विनंती करण्यात आली होती.

वातावरण बदलामुळे पिके धोक्यात

$
0
0
सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन अन् सायंकाळी पाऊस या सोबत दमट हवा अशा बदलत्या वातावरणामुळे तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत. ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो कांदा, गहू आदी पिके रोगांना बळी पडत आहेत.

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जावू देणार नाही

$
0
0
राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळविण्याच्या कामाला वेग येण्याची शक्यता असून, केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी पार-तापी-नर्मदा लिंक या योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला गती देण्याच्या सूचना केल्या आहेत.

मालेगावच्या सामान्य रुग्णालयालाच उपचाराची गरज

$
0
0
बॉम्‍बस्फोटाची इष्टापत्ती म्हणून मालेगाव येथे २०० खाटांचे ३५ कोटी रुपये खर्चून सामान्य रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, ६ वर्ष उलटून देखील सामान्य मालेगावकरांसाठी अत्यंत सामान्य सोयीसुविधा पुरवण्यातसुद्धा या रुग्णालयाला यश आलेले नाही.

शिवसेनेत मतभेदांना धार, अफवांना ऊत

$
0
0
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चांगली कामगिरी करूनही शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार असल्याच्या वावड्या उठविण्यात येत असल्याने संघटनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. अशा असंतुष्ट मंडळींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

रिक्षा चालकांचा ‘द्वारका’ला विळखा

$
0
0
शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या द्वारका चौकातील सर्कल कमी केल्याने वाहतूक कोंडी कमी होईल असा दावा प्रशासनाने केला; मात्र या भागातील रिक्षाचालकांच्या अवैध पार्कींगमुळे तो फोल ठरला आहे.

पंचवटीत १ लाखांची चोरी

$
0
0
फ्लॅटमध्ये प्रवेश करून चोरट्याने १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पंचवटीतील कलानगरमध्ये रविवारी ही घटना उघडकीस आली. सुंनदा विजय रायते (५९) यांनी फिर्याद दिली आहे.

हजारो उत्तर भारतीयांचे सूर्याला अर्घ्य

$
0
0
आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, घरात सुखशांती तथा समृद्धी नांदावी यासाठी १६ हजार पेक्षा जास्त उत्तर भारतीय नागरिकांनी रामकुंड येथे बुधवारी छट पूजा साजरी केली.

तोंडी कामे नको, कृती आराखडा द्या

$
0
0
सिंहस्थाच्या विकास कामांची केवळ तोंडी माहिती देवू नका तर निश्चित कृती आराखडा (अॅक्शन प्लॅन) त्वरित सादर करा, असे कडक निर्देश विभागीय महसूल आयुक्तांनी प्रशासनाला दिले. सिंहस्थ कामांचा आढावा त्यांनी मंगळवारी घेतला.

प्रदेशाध्यक्षपद नाकारणे पडले महागात

$
0
0
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची १७ महिन्यांपूर्वी संधी असतांना ती नाकारणे हेच एकनाथ खडसे यांना महागात पडले आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांच्या नंतर त्यांना पुन्हा संधी द्यावी यासाठी नितीन गडकरी आग्रही असतांना त्याला गोपीनाथ मुंडे यांनी ब्रेक लावल्यानंतर एकनाथ खडसे यांचे नाव आघाडीवर आले.

काकड आरती झाली ९९ वर्षांची

$
0
0
देवळाली कॅम्पच्या लॅमरोडवरील भैरवनाथ मंदिरात पहाटे काकडा आरती सुरू आहे. ही परंपरा गेल्या ९९ वर्षांपासून जपली जात आहे. वारकरी संप्रदायातर्फे हा उपक्रम कार्तिक मासातील कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरारी पोर्णिमा या दरम्यान दररोज राबवला जात आहे.

साधुग्रामबाबत आज सुनावणी

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारणीसाठी लागणारी २६९ एकर जमीन अधिग्रहित करण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात गुरुवारी, ३० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी मोठी तयारी केली आहे.

वृध्दाला विवस्त्र करून मारहाण

$
0
0
भुताटकी करून गावातील लोकांना त्रास देत असल्याच्या संशयावरून एका वृध्दाला विवस्त्र करून आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण केली. सुरगाणा तालुक्यातील देवळा गावामध्ये शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

सी प्लेनची उद्या चाचणी

$
0
0
बहुप्रतिक्षीत असलेली सी प्लेनची सेवा सुरू करण्यासंदर्भात येत्या शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी चाचणी घेण्यात येणार आहे. जुहू चौपाटी ते गंगापूर धरण आणि गंगापूर धरण ते जुहू चौपाटी अशी चाचणी होणार आहे.

सुखाचा मुक्काम पोस्ट दूरच

$
0
0
शहरात उंचच उंच इमले उभे राहत आहेत. लोक सुखाने त्यात नांदत आहेत. परंतु, त्यांच्या पत्रांचे वाटप करणारा पोस्टमन मात्र अजूनही जमिनीवरच आहे. उंच इमारतींमध्ये पत्र वाटता वाटता त्याच्या गुडघ्याच्या वाट्या निकाम्या झाल्या आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images