Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आरोग्यविभागात उलथापालथ

$
0
0
स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेळोवेळी तंबी देऊनही गैरहजेरीचे प्रमाण कमी होत नसल्याने आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी शुक्रवारी सहा विभागीय स्वच्छता निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्यात.

जेलरोडवर डेंग्यूचा प्रभाव

$
0
0
जेलरोडच्या पंजाब कॉलनीत डेंग्यूचे डास आणि आळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यवाही केली. संबंधित बांधकाम मालकाला पाच हजाराचा, तर प्रकाश ट्रेडर्सला दोन हजाराचा दंड केला.

HAL मध्ये सू-३० विमानांची दुरुस्ती

$
0
0
ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये आता सू-३० विमानांची दुरुस्ती आणि नूतनीकरण होणार आहे. संरक्षण उत्पादन खात्याचे सचिव जी. मोहनकुमार यांच्या हस्ते शुक्रवारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

नाशिकमध्ये पाणीकपात?

$
0
0
नाशिक महापालिकेच्या मागणीत अर्धा टीएमसीने पाणीकपात करीत, जिल्हा प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाणी नियोजनाचा चेंडू पालिकेच्या कोर्टात ढकलला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे पालिकेला आता आरक्षित साडेचार टीएमसी पाण्यातच दैनंदिन पाणीपुरवठ्यासह कुंभमेळ्याच्या पाण्याचेही नियोजन करावे लागणार आहे.

RTO जयंत पाटलांना अटक

$
0
0
खासगी ट्रॅव्हल्सच्या दोन सस्पेंड केलेल्या बसेसचे रेकॉर्ड क्लिअर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्या प्रकरणी एका एजंटसह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांना अटक करण्यात आली. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच पाटलांना अटक करण्यात आली.

राज ठाकरेंचा नाशिक दौरा

$
0
0
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जात असलेल्या नाशिकवर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठीच बुधवार ५ नोव्हेंबरपासून चार दिवस ते नाशिकला मुक्काम ठोकणार आहेत.

अनधिकृत भंगार बाजार हटवा!

$
0
0
अंबडलिंकरोडवर वसलेले अनधिकृत भंगार बाजार हटविण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी निवेदनाद्वारे महापाल‌िका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आयुक्तांनी भंगार मार्केट काढण्यासाठी उच्च न्यालायात प्रतिज्ञा पत्र सादर करावे तसेच भंगार बाजाराच्या त्रासातून मुक्तता करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

रंगरंगोटी वादात

$
0
0
नाशिक जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचीत अध्यक्षांसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी पदभार स्विकारताच आपल्या दालनांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी सुरू केली आहे. मात्र या रंगरंगोटी आणि दुरुस्तीला कोणतीही शासकीय मान्यता नसल्याने या कामांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सी प्लेनची सोमवारी चाचणी

$
0
0
बहुप्रतिक्षित सी प्लेनची चाचणी आता सोमवारी (दि.३) दुपारी होणार आहे. यापूर्वी तीनदा ही चाचणी रद्द झाली असून चौथ्यांदा तरी ती होणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीकडून सर्व कागदपत्रांची विचारणा केली आहे.

अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0
सीबीएस, शालिमार आणि नेहरू उद्यान सारख्या अत्यंत वर्दळीच्या परिसराने शनिवारी काही तासांपुरता का असेना मोकळा श्वास घेतला. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाडी, पथारी धारकांवर वाहतूक विभागाने कारवाई केल्याने व्यावसायिकाची दाणादाण उडाली.

रुग्णांचे तक्रारीचे पाढे

$
0
0
कामगार रुग्णालयाबाबत अनेक कामगारांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर गोडसे यांनी शनिवारी अचानक कामगार रुग्णालयात भेट दिली. भेटीत अनेक रुग्णांनी रुग्णालयात सेवा, सुविधा वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. याप्रसंगी खासदार गोडसे यांनी रुग्णांच्या तक्रारीवरून लोकसभेत याविषयी आवाज उठविणार असल्याचे सांगितले.

अर्थ-बांधकामसाठी रस्सीखेच

$
0
0
जिल्हा परिषदेची बहुप्रतीक्षित सर्वसाधारण सभा येत्या ५ नोव्हेंबरला होत असून, या सभेत रिक्त असलेल्या सहा समित्यांचे वाटप तिघांना केले जाणार आहे. विशेषतः अर्थ व बांधकाम समितीसाठी उपाध्यक्षांसह केदा आहेर आणि किरण थोरे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.

‘आरोग्या’ची जबाबदारी उपसंचालकांकडे

$
0
0
आगामी कुंभमेळ्यासाठी आरोग्य विभागाशी संबंधित विविध यंत्रणा आणि कामकाजांचा समन्वय साधण्याची जबाबदारी आरोग्य उपसंचालकांकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामकाजाला गती मिळतानाच निर्धारित वेळेत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

जयंत पाटलांना पोलिस कोठडी

$
0
0
ट्रॅव्हल्स चालकाकडून १० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उपप्रादे‌शिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्यासह एजंट सुनील व्यास याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दिली विनापरवानगी जमीन

$
0
0
स्थायी समिती तसेच, महासभेने मंजुरी दिलेली नसताना महापालिका अधिकाऱ्यांनी परस्पर वीज मंडळाला जमीन वापरासाठी मान्यता दिल्याची बाब शनिवारी महासभेत समोर आली. यावरून सदस्यांनी प्रशासनावर आगपाखड केली. तसेच, महापौरांनी सदर कब्जा पावती रद्द करून मोबादला घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

साधुग्रामसाठी TDR

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात साकारण्यात येणाऱ्या साधुग्रामसाठी भूसंपादन करताना आता एकास सहा टीडीआर देण्याचा निर्णय महापौर अशोक मुर्तडक यांनी जाहीर केला आहे.

KBC:दोघींचा जामीन फेटाळला

$
0
0
तिप्पट परताव्याच्या आमिषाने केबीसी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक असलेल्या दोघींचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. सिंगापुरमधील चव्हाण दाम्पत्याला अटक करता यावी यासाठी स्टँडिग वॉरंट जारी करण्यात आल्याने दोघांच्या अटकेची शक्यता अधिक गडद झाली आहे.

नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे

$
0
0
राज्याच्या मंत्रिमंडळ स्थापनेच्या पहिल्या टप्प्यात स्थान न मिळवू शकलेल्या नाशिकमधील भाजपच्या इच्छुकांनी आता दुसऱ्या टप्प्यात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसऱ्या टप्प्यात नाशिकला एक मंत्रीपद मिळणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ते राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यापर्यत लॉबिंग केले जात आहे.

टाटाही कुंभमेळ्याच्या आखाड्यात

$
0
0
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पुढीलवर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचाही सहभाग असणार आहे. मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूटस ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)ने सुरु केलेल्या कुंभथॉन या मोहिमेला किमान दहा हजार डॉलर एवढा निधी देणार आहेत.

कॅलिग्राफीतून उमटल्या मनातील भावना

$
0
0
अक्षरांतील चित्रांचं, भावनांचं अक्षरातला आशय आपल्या प्रात्यक्षिकांतून प्रभावीपणे दाखवत अच्युत पालव यांनी कला रसिकांना सुलेखनाची अपूर्व भेट दिली. ‘पाऊस’ या शब्दांतील पावसाचे विभ्रम, ‘लता’ या शब्दांतील सुरांची तरलता, ‘सुंदर’ शब्दातील देखणेपण अशा अनेक रोजच्या व्यवहारातील अक्षरांना चित्ररुप दिले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images