Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उच्च शिक्षण : गुणवत्तेचा तिढा!

$
0
0
हावडा जिल्ह्यातील शिबपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग सायन्सेस अॅण्ड टेक्नालॉजी येथे बोलताना राष्ट्रपती मा. प्रणव मुखर्जी यांनी हिंदुस्थानातील विद्यापीठे जगातील अव्वल दर्जा असलेल्या विद्यापीठांमध्ये पहिल्या २०० क्रमांकात नसल्याबद्दल अलीकडेच खंत व्यक्त केली.

चळवळ बनावी लोकचळवळ!

$
0
0
पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या घटना घडतात तेव्हा आपण नेमके कोणत्या दिशेने चाललो आहोत, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. मृतदेहाचे मुंडके छाटण्यासारखी इगतपुरीतील घटना तर हा विटंबनेचा कळस.

गोदाकाठ परिसरात बिबट्याची पुन्हा दहशत

$
0
0
निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील गावांमध्ये बिबट्याचा उपद्रव वाढला असून, पाळीव जनावरांवरील हल्ल्यांपाठोपाठ आता या परिसरात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यांनी माणसांवरही हल्ले सुरू केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

नात्यागोत्यांनी जपली भारतीय संस्कृती

$
0
0
आपल्याला लहानपणी झालेल्या जखमेवर मलमपट्टी करणारी आपल्या शेजारची मावशी, आजी, काकू आहे हे महत्वाचे मानतो म्हणुनच आजही आमची भारतीय संस्कृती महान आहे.

कमळ रूप पाहता लोचनी !

$
0
0
नाशिकहून मुंबईकडे जाताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ ला मुंढेगावच्या पुढे रस्त्याच्या दुतर्फा, दारणा धरणाच्या प्रतिप्रवाहात (बॅकवॅाटरमध्ये) सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात हजारो पांढऱ्या ते गुलाबी रंगाच्या छटा असलेले कमळ (वॅाटरलिली) फुलतात.

अतिरिक्त आयुक्तांचीही प्रतीक्षा

$
0
0
दिवाळीनंतर लागलीच हजर होण्याची शक्यता असलेल्या अतिरिक्त आयुक्तांचीही प्रतिक्षा करण्याची वेळ आता प्रशासनावर आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात सम‌ीर उन्हाळे यांची नियुक्ती झाल्याची चर्चा होती.

‘तबला ‌चिल्ला’तून अभिनव कृतज्ञता

$
0
0
तबला साधकांचे गुरु पं. कमलाकर वारे, पं. नाना मुळे, पं. नारायण जोशी या ज्येष्ठ नाद साधकांचा अमृतमहोत्सवी सत्कार रविवारी कुसूमाग्रज स्मारकाच्या विशाखा दालनाल संपन्न झाला.

‘डीआयसी’ची आता तालुकावारी

$
0
0
उद्योगांना सरकारी सवलती तसेच लाभ मिळावा यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने (डीआयसी) विशेष मोहीम उघडली आहे. याद्वारे आता प्रत्येक तालुक्यात शिब‌िर घेण्यात येत असून उद्योगांना तालुका पातळीवरच सवलतींसाठी अर्ज सादर करता येणार आहेत.

कुंभमेळ्यात यांत्रिक सफाईवर भर

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील साफसफाईचे काम यांत्रिक पध्दतीने करण्यासाठी महापालिका आग्रही आहे. प्रत्येक विभागासाठी एक अशा पध्दतीने साफसफाई करणारे आधुनिक मशिन थेट खरेदी करण्याचा किंवा भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रयत्न महापालिकेने सुरू केला आहे.

सी प्लेनला आळंदी, वालदेवीचा पर्याय

$
0
0
सी प्लेनसाठी वादात सापडलेल्या गंगापूर धरणाऐवजी आळंदी किंवा वालदेवी धरणाचा पर्याय पुढे आला आहे. यासंदर्भात नाशिकमधील संघटनांनी पुढाकार घेत नाशिकला सी प्लेन सेवा सुरू करण्यासाठी आग्रह धरला असून यामुळे नाशिकच्या पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची चिन्हे आहेत.

शहरात प्रीपेड रिक्षा सेवा

$
0
0
येत्या सिंहस्थापूर्वी शहरात मीटर व टेरीफ नुसार, प्रीपेड सेवा व शेअर रिक्षा प्रमाण‌ित भाड्यानुसार मिळावीत म्हणून नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीतर्फे शहराचे पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांना मागणी केली होती.

डासांसाठी दिवसाला ६३ हजारांचा फवारा

$
0
0
आकाराने किरकोळ समजल्या जाणाऱ्या डासांना रोखण्यासाठी महापालिका पाण्याप्रमाणे पैसे खर्ची घालत आहे. मागील १२ महिन्यांच्या कालावधीत प्रशासनाने दिवसाला ६३ हजार ३३३ रूपयांप्रमाणे महिन्याला १९ लाख तर वर्षात अडीच कोटी रूपये ठेकेदारांच्या घशात घातले.

शिवाजी स्टेड‌ियम ताब्यात घेण्याच्या हालचाली

$
0
0
जिल्हा परिषदेकडून जिल्हा क्रिडा संकुल समितीकडे वर्ग करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी स्टेड‌ियम जिल्हा परिषदेच्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नवनिर्वाचीत अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी स्टेड‌ियमसह जिल्हा परिषदेच्या गाळयांची माह‌िती मागीतली आहे. त्यामुळे पुन्हा स्टेड‌ियमसह गाळ्यांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गोंदे टोलवसुली बंद होणार?

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेच्या चौपदरीकरणाअंतर्गत गोंदे येथे होत असलेली टोल वसुली बंद होण्याची दाट शक्यता आहे. गोंदे ते वडपे यादरम्यान हायवेची स्थिती अत्यंत दयनीय असल्याने याप्रकरणी दाखल जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

`एटी` थकले; पाटलांची पराभवाची हॅटट्रिक

$
0
0
राष्ट्रवादीचे ए. टी. पवार यांनी नऊ वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. मात्र, त्यांचा शेवट पराभवाने झाला आहे. वयाची साथ न राहिल्याने त्यांच्याकडे आपल्या वारसांना बळ देण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

अतिरिक्त शिक्षकांच्या नजरा सरकारकडे

$
0
0
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतरांचे लक्ष आता नूतन सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या इतर समस्या देखील सोडवण्यास सरकारने प्राधन्य द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दोन दिवसात १४५९ जणांची परीक्षा

$
0
0
वन विभागाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या वनरक्षकाच्या १0३ जागांसाठी भरतीसाठी गेल्या दोन दिवसात १४५९ जणांनी परीक्षा दिली आहे. सोमवारी शारी‌रिक चाचणीचा अंतिम दिवस असून त्यास ७०० ते ८०० परीक्षार्थी हजर राहण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेचे संचालक मोकाट?

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौकशीच अडथळ्यांची शर्यत उभ्या करणाऱ्या माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जाता जाता भ्रष्ट संचालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तीन वर्षाचा फेरलेखापरिक्षण अहवाल हर्षवर्धन पाटील यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच रद्द केल्याचा प्रकार समोर आला आहे.

‘चोपडी’त मिळतात हरवलेली नाती

$
0
0
विवाहयोग सुरु झाला की गोत्र, नाडी याबरोबरच गणगोताचाही शोध सुरू होतो. घरात वडिल मंडळी नसेल तर आजोबा, पणजोबा कधी, कधी खापरपणजोबा यांचे नाव शोधण्यासाठी मदत घेतली जाते ती विधी पार पाडणाऱ्या ब्रह्मवृंदाची. आडनावाची माहिती घेऊन आपल्या खापरपणजोबांपर्यंतचा इतिहासच ते सांगतात.

कौशल्याधारीत शिक्षणक्रमांना प्राधान्य देणार

$
0
0
विद्यार्थ्यांना केवळ पदवी शिक्षण देऊन न थांबता कौशल्य विकसित करणारे शिक्षण देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. पुढील शैक्षणिक वर्षापासून तंत्रज्ञानाची मदत घेऊन पारंपरिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीनेच मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यास एकाच वेळी अधिक कौशल्ये आत्मसात करणारे शिक्षण मुक्त विद्यापीठातर्फे सुरु करण्यात येतील.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images