Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिक मनसेला भाजपचा सुरूंग?

$
0
0
मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार वसंत गीते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती हाती येत आहे. गीतेंसह मनसेचे १८ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे मनसेचं 'नाशिक' धोक्यात आलंय.

येवल्यातील पूल बनला धोकादायक

$
0
0
येवला शहरातील पारेगाव रोडलगतच्या अनेक वसाहतींमधील नागरिकांसह शालेय विध्यार्थ्यांना मध्यममार्ग असलेला हुडको वसाहती जवळचा पूल गेल्या अनेक दिवसांपासून खचल्याने तेथून मार्गक्रमण करणाऱ्यांना तारेवरची मोठी कसरत करावी लागते आहे.

‘SMS’सेवेचे होणार पुनरुज्ज‌ीवन

$
0
0
शहर स्वच्छता मोह‌‌ीम परिणामकारतेने चालू ठेवण्यासाठी बंद पडलेल्या एसएमएस सेवेला गती देणे, तसेच सामाजिक संस्थाचा पुढाकार वाढवण्यासाठी प्रयत्न करणे याबाबत आज महापालिकेत झालेल्या बैठकी दरम्यान महापौर अशोक मुर्तडक आणि आयुक्त सोनाली पोंक्षे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.

मोकळ्या भूखंडाची अखेर महापालिकेने केली साफसफाई

$
0
0
‘मोकळे भूखंड ठरतायेत आजारांना निमंत्रण’ हे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष घालत सातपूर भागातील मोकळ्या भुखडांची साफसफाई सुरू केली आहे.

जयंत पाटलांना जामीन

$
0
0
ट्रॅव्हल्स चालकाकडून १० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक असलेल्या उपप्रादे‌शिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्यासह एजंट सुन‌ील व्यास यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे.

त्र्यंबकला होणार ‘फायटॅरॉईड’चा वापर

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे बंदिस्त करण्यात आलेल्या गोदावरी नदीवर फायटॅरॉईड तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय पर्यावरण इंजिनिअरींग इन्स्टिट्यूट (नीरी) च्या अधिकाऱ्यांनी नाशकात येवून चर्चा केली आहे.

जुने सिडकोत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

$
0
0
जुने सिडको परिसरातील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटाने त्रस्त झाले आहेत. रात्रभर भुंकणे आणि दिवसा वाहनधारकांच्या मागे धावणे, पादचाऱ्यांवर गुरगुरणे हाच त्यांचा दिनक्रम असतो. महापालिकेने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त नागरिक करत आहेत.

चौफुल्यांकडे लक्ष कोण देणार ?

$
0
0
मुंबई - आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेल चौकाबरोबरच या मार्गावरील अन्य चौफुल्यांचा प्रश्नही गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींनी सुस्त प्रशासनाला आंदोलन करुन जागे करण्याची गरज आहे. मात्र त्यांच्याकडूनही नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सी प्लेन चाचणीकडे MTDC ची पाठ

$
0
0
सी प्लेनच्या सेवेत सहआयोजक असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सोमवारच्या चाचणीकडे पाठ फिरविल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, शहरातील स्वयंसेवी संघटना आणि हॉटेल्सच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे या चाचणीवेळी सहभागी होत या सेवेला पाठिंबा दिला आहे.

... तरीही भुजबळांचा ' दबदबा ' कायम

$
0
0
गेली १५ वर्षे राज्यात एकमेकांच्या हातात हात घालत सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार गेलं. आघाडी सरकार पायउतार होतानाच गेली १० वर्षे पालकमंत्री अन् राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळणारे छगन भुजबळ यांचंही मंत्रीपद राहिलं नाही.

न्हाई, कंत्राटदाराला नोटीस

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्गातील गोंदे ते वडपे या दरम्यान असलेली रस्त्याची दुरवस्था आणि फुकटच्या वाहनांची शहानिशा या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (न्हाई) व रस्ता कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे.

डॉक्टरांची काश्मीरमध्ये रुग्णसेवा

$
0
0
जम्मू-काश्मिर राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शहरातील बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनसोबत २० डॉक्टरांचे एक पथक नुकतेच रवाना झाले. या मदत पथकाला महापौर अशोक मुर्तडक यांनी आयुर्वेद कॉलेजच्या प्रांगणातून हिरवा झेंडा दर्शवला.

दलित संघटना उतरल्या रस्त्यावर

$
0
0
‘हो रहे दलितोंपे अत्याचार, क्यूँ सो रही गूंगी सरकार’, ‘अरे का झाले षंढ, करा अन्यायाविरुध्द बंड’, यासारख्या आक्रमक घोषणांद्वारे हजारो दलित बांधवांनी नाशिक शहर दणाणून सोडले. अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना निलंबित करा, दलित अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयामध्ये चालवा यांसारख्या अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

ट्रक चालकाला लुबाडले

$
0
0
मी पोलिस निरीक्षक असून, तू मला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक केला आहे, असे सांगत ट्रक चालकाजवळील लायसन, मोबाईल आणि रोख रक्कम असा १३ हजारांचा मुद्देमाल लांबविण्यात आला. ना‌‌शिक-पुणे महामार्गावर दारणा पूल ते नाशिकरोड यादरम्यान रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

... तरीही महापौर कायम

$
0
0
मनसेचे माजी आमदार वसंत गिते यांनी सोमवारी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. यानंतर गिते यांच्यासह पक्षाचे १५ ते १७ नगरसेवक भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले.

नगरसेवकांनीच फोडला गितेंचा फुगा

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या तोंडावर सरचिटणीसपदाचा राजीनामा देवून ठाकरेंवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या वसंत गितेंच्या प्रयत्नांना त्यांच्या समर्थकांसह पक्षातील नगरसेवकांनी खीळ घातली आहे.

बुडत्या जहाजातून उड्या...

$
0
0
बुडत्या जहाजातून उड्या मारण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जे काही चालले आहे ते या नैसर्गिक प्रवृत्तीशी नेमके मेळ साधत आहे. लोकसभा निवडणुकीपासून मनसेची पीछेहाट सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत तर पक्ष संपत चालल्याचीच चाहूल लागली आहे.

चर्चा भाजप प्रवेशाची

$
0
0
वसतं ग‌िते व त्यांच्या समर्थकांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.‌ भाजपाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय साने यांनी ग‌ितंेसह अठरा नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याची माह‌िती प्रसारमाध्यमांना दिली.

राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता

$
0
0
मुलीच्या अपघातानंतरही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नाशिकचा दौरा निश्चित होता. मात्र, वसंत गितेंच्या बंडामुळे ठाकरेंचा दौरा आता लांबणीवर पडला असून, या दौऱ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मुलगीच्या अपघातानंतरही ठाकरेंनी आपण ५ तारखेपासून नाशिकच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले होते.

लाडक्या प्रवीणची गरूडझेप

$
0
0
शेतकरी कुटुंबातून आलेला आणि अगदी साध्या पेहरावात असूनही आपल्या बीजगणित व विज्ञानातील हुशारीने तसेच नवे ज्ञान आत्मसात करण्याच्या जिज्ञासेतून एके काळी शिक्षकांनाही अचंबित करणारा मनमाडचा प्रवीण दराडे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक म्हणून मोठ्या पदावर गेल्याने मनमाडच्या लौकिकात भर पडली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images