Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकला महिन्याभरात विमानसेवा

$
0
0
बहुप्रतिक्षीत असलेली विमानसेवा नाशिककरांना येत्या महिन्याभरात मिळण्याची दाट शक्यता आहे. पुढील आठवड्यात विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांची एचएएलमध्ये होत असलेली बैठक आणि सी प्लेनची सोमवारी झालेली चाचणीच नाशिकच्या विमानसेवेचे संकेत देत आहे.

आत्महत्या नसून विवाहितेचा खूनच

$
0
0
रविवार कारंजा येथील निवासी घरामध्ये झालेला विवाहितेचा मृत्यू गळफासामुळे नव्हे तर गळा आवळल्यामुळे झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीसह सासरकडील मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे.

वाडकरांवर गुन्हा दाखल करा

$
0
0
खोट्या करारनाम्याच्या आधारे मिळकतीचे महसूल बेकायदेशीरपणे लावून तसेच दस्ताचा गैरवापराद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी गायक सुरेश वाडकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करा, असे आदेश न्यायालयाने उपनगर पोलिसांना दिले आहेत.

'राज' गड ढासळला

$
0
0
दिवाळीनंतर मनसेत अपेक्षेप्रमणे फटाके वाजायला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ना‌शिक दौऱ्यापूर्वीच नाट्यमय घडामोडी घडल्या असून प्रदेश सरचिटणीस वसंत ग‌िते यांच्यासह जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश दायमा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

'राज'गड ढासळला

$
0
0
दिवाळीनंतर मनसेत अपेक्षेप्रमाणे फटाके वाजायला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ना‌शिक दौऱ्यापूर्वीच नाट्यमय घडामोडी घडल्या असून प्रदेश सरचिटणीस वसंत ग‌िते यांच्यासह जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश दायमा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

ग्रंथ पोहोचणार नेदरलँड दारी

$
0
0
कुसुमाग्रज प्रतिष्ठानने वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी सुरू केलेला ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, सिल्व्हासामार्गे दुबई, ओमान, बहारिनमध्ये पोचला असतानाच, हा उपक्रम आता त्यापुढचे पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे.

इगतपुरी तालुक्यात वनराई बंधाऱ्यांची उभारणी

$
0
0
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ग्रामपंचायतींनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन वनराई बंधारे उभारले आहेत. बेलगाव त-हाळे, धामनगाव, खेड, मोडाळे, शिरसाठे, शेवगेडांग व वाडीवर्हे या ग्रामपंचायतींनी मोठ्या संख्यने बंधारे बांधून नदीक्षेत्रातील पाणी अडविले आहे.

शॉर्टसर्किटमुळे आग लागून कळवणला ट्रकचे नुकसान

$
0
0
कळवण शहरातील संभाजी नगर (गावठाण) येथे मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास कुमार जंगम यांच्या मालकीच्या माल ट्रकला वाहनातील शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सोबतच शेजारी उभ्या असलेल्या किशोर जंगम यांच्या मालट्रकचेही आगीमुळे नुकसान झाले.

व्यावसायिकांचे पंतप्रधानांकडे गाऱ्हाणे

$
0
0
पार्किंग आणि तत्सम परवाना नसलेल्या व्यावसायिकांनी जबरदस्तीने दुकाने बंद ठेवण्यास पोलिसांकडून भाग पाडले जात आहे. पोलिसांच्या या अरेरावीला शहरातील व्यावसायिक वैतागले असून ही समस्या सुटावी यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साकडे घातले आहे.

३५० कोटींच्या कर्जावर शिक्कामोर्तब

$
0
0
महापालिकेच्या कर्ज उभारणीच्या प्रस्तावावर अखेर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. सिंहस्थ कामे तसेच घरकुल योजनेसाठी महापालिका ३५० कोटी रूपयांचे कर्ज घेणार आहे. दिर्घकालीन कर्जापोटी महापालिका ६० कोटी रूपयांचे व्याज द्यावे लागणार आहे.

टर्मिनलचा प्रश्न आठवडाभरात मार्गी

$
0
0
ओझर विमानतळाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पॅसेंजर टर्मिनलच्या हस्तांतरणाचा तिढा आठवड्याभरात सुटण्याची दाट शक्यता आहे. या टर्मिनलची मालकी घ्यायची की भाड्याने यासंबंधीचा निर्णय हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या बोर्ड मिटींगवर ठेवण्यात आला असून संरक्षण उत्पादन सचिवांनी दिलेल्या निर्देशानंतर येत्या आठवड्याभरात बोर्ड यासंबंधीचा निर्णय घेणार आहे.

वसंत गितेंवर शिवसेनेचेही जाळे

$
0
0
मनसेत नाराज असलेल्या आणि प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलेल्या वसंत गिते यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपासह शिवसेनेत आता चढाओढ लागली आहे. राजीनाम्यानंतर पक्षाकडून दुर्लक्षित झालेल्या गितेंवर मंगळवारी शिवसेनेसह भाजप नेत्यांनी जाळे टाकत त्यांना पक्षप्रवेशासाठी पायघड्या घातल्या.

मुक्त विद्यापीठ देणार मोबाईलद्वारे शिक्षण

$
0
0
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील निरनिराळ्या स्तरातून शिक्षण घेणारे विद्यार्थीही मागे राहणार नाहीत. पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रयोगिक तत्त्वावर एक शिक्षणक्रम मोबाईलद्वारे उपलब्ध करून देणार असल्याची माह‌िती कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.

गिते, ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे राज यांनी स्वीकारले

$
0
0
विधानसभा पराभवामुळे पक्ष संघटनेतील बदलापूर्वीच पक्षावर दबाव टाकण्याच्या हेतूने माजी आमदार वसंत गितेसह त्यांच्या समर्थकांनी दिलेले पदाचे राजीनामे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वीकारले आहेत.

पाच मोटारसायकलची चोरी

$
0
0
शहर आण‌ि परिसरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी पोल‌िसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. गंगापूर रोडवरील रह‌िवासी रव‌ींद्र आंधळे यांनी त‌िवंधा चौक परिसरात काळ्या रंगाची ह‌िरो होंडा स्प्लेंडर गाडी उभी केली होती.

बंड मनसेत, धूमशान शिवसेना-भाजपात

$
0
0
पक्षांतर्गत विरोधकांचा काटा काढण्यासाठी ‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त’ या उक्तीचा प्रत्यय सध्या नाशिकच्या शिवसेना आणि भाजपामध्ये पहायला मिळत आहे. मनसेचे माजी आमदार वसंत गितेंना पक्षात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपात धूमशान सुरू झाले असून दोन्ही पक्षातील गटबाजी या निम‌ित्ताने पुन्हा उफाळून आली आहे.

आम्ही जम‌िनी विकल्या हो..!

$
0
0
नाशिक महापाल‌िकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यात आरक्ष‌ित केलेल्या शेतकऱ्यांच्या जम‌िनी शेतकऱ्यांनी विकल्याचे फकल शेतकऱ्यांनी लावले आहेत. शेतजमीनींवर आरक्षण पडल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी महापाल‌िकेच्या प्रस्तावित आराखड्यातून मुक्ती कधी मिळणार अशी हाक प्रशासनाला घातली आहे.

श‌िक्षण आयुक्तपद रद्द करा

$
0
0
राज्याच्या श‌िक्षण व्यवस्थेत न‌िर्माण झालेला गोंधळ टाळण्यासाठी श‌िक्षण आयुक्तपद रद्द करण्यात यावे, यासह व‌िव‌िध ठराव महाराष्ट्र राज्य माध्यम‌िक व उच्च माध्यम‌िक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्यावतीने आयोज‌ित ५४ व्या अध‌िवेशनात मंजूर करण्यात आले.

जिल्ह्याला डेंग्यूचा `ताप`

$
0
0
नाशिक जिल्ह्यात मलेरिया पाठोपा डेंग्यूचा हैदोस सुरूच आहे. दूषित पाण्यामुळे डेंग्यूबरोबरच कावीळ, टॉयफाईड, डायरिया या आजाराचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर आढ़ळून येत आहेत.

साधुग्रामबाबत आज सुनावणी

$
0
0
साधुग्रामसाठी आवश्यक जमिनीच्या अधिग्रहणाबाबत मुंबई हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर बुधवारी (५ नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे. प्रशासनाने त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले असून, सरकारी वकील बुधवारी बाजू मांडणार आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images