Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मुंडे चुकून भाजपात: पतंगराव


पवार काका-पुतणे पाणी चोर: जोशी

$
0
0
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुष्काळावर दररोज वक्तव्य करतात. मात्र हीच मंडळी पाणी चोर आहेत, असा थेट आरोप शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी धुळे येथे केला आहे.

जळगावच्या आर. आर. विद्यालयाची बाजी

$
0
0
दहाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत जळगाव-अमरावती केंद्रातून जळगावच्या आर. आर. विद्यालयाने ‘आम्ही ध्रुव उद्याचे’ या नाटकाने प्रथम, औरंगाबादच्या स्नेहांकीत संस्थेने सादर केलेल्या ‘सिद्राम सुडोकू’ या नाटकाने व्दितीय तर आकोटच्या यशोगाथा फाऊंडेशनच्या ‘पुन्हा नाही येणे’ या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला.

धुळ्यात ऑक्सिटोसिनची अवैध विक्री

$
0
0
दूध देणाऱ्या जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिटोसिन औषधावर बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या धुळ्यातील तीन दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे.

टेंडर काढूनही कामगार संघटना गप्प

$
0
0
क्लीनर पदांच्या भरतीला खो घालत प्रशासनाने सुरू केलेल्या खासगीकरणाला तीव्र विरोध होणे अपेक्षित असताना, एसटीतील कामगार संघटना मात्र मौन धारण करुन बसल्या आहेत. लहान-सहान प्रश्नी रस्त्यावर उतरणा-या या संघटनांतील अनेक पदाधिका-यांना आजही या विषयाचे गांभीर्य समजलेले नाही.

चित्रपटाचा शतकपूर्ती समारंभ नाशिकला

$
0
0
भारतीय चित्रपटाला शंभर वर्ष पूर्ण होत असून या घटनेचे औचित्य साधत चित्रपट विकास महामंडळ व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने यंदा ८ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोपान हॉस्पिटलचा लवकरच विस्तार

$
0
0
सोपान हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजी, हॅण्ड सर्जरी, हेअर ट्रान्सप्लान्ट, नेत्रसेवा हे विभाग अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह कार्यरत असून, लवकरच हॉस्पिटलमध्ये स्लीप लॅब, ऑडिटोरियम, रिहॅबिलेशन सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय वराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अंबड परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास

$
0
0
अंबड परिसरात मोकाट कुत्र्यांच्या त्रास वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अंबड गाव, भाजीबाजार, एक्सएलओ पॉईंट, महालक्ष्मीनगर, डीजीपी नगर परिसरात मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिक धास्तावले आहेत.

प्रवासी संघटनेच्या वतीने वेळापत्रकांचे वाटप

$
0
0
नाशिक जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे आणि एसटीच्या वेळापत्रकाची घडीपत्रिका तयार करण्यात आली असून, तिचे प्रकाशन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

अंध विद्यार्थ्यांनी केले पॅरासेलिंग

$
0
0
पक्षांसारखे आपल्याला हवेत उडता आले असते तर ही कल्पनाच आनंददायी असते. त्यातही ज्यांना काहीच दिसत नाही, अशा मुला-मुलींना हवेत उडण्याचा अनुभव किती परमोच्च आनंद देणारा असतो, त्याचा प्रत्यय नॅब संस्थेच्या पंधरा विद्यार्थ्यांनी घेतला.

मातृभाषेतील शिक्षण सशक्त होण्याची गरज

$
0
0
‘हिंदी किंवा इंग्रजी या भाषा सर्वांनाच अवगत नसल्याने देशातील मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित रहात आहे. त्यामुळे सर्वांना समान शिक्षण देण्यासाठी त्या त्या प्रदेशातील मातृभाषेतील शिक्षण सशक्त होण्याची अत्यंत गरज आहे’, असे मत शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिल सदगोपाल यांनी व्यक्त केले.

संघटना हेच यशवंतरावांचे अधिष्ठान

$
0
0
बहुजन सामाजिक न्यायाची मागणी करताहेत मात्र राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीला विरोध करून तो न्याय मिळविण्याला अर्थ नाही, असा विचार अत्यंत कोवळ्या वयात करून यशवंतराव चव्हाण यांनी आपल्यातील मुत्सद्दीपणा दाखवला, संघटना हेच अधिष्ठान मानत त्यांनी राजकीय वाटचाल सुरू ठेवली, असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

‘एमसीआय’ला करणार चौकशीची विनंती

$
0
0
राज्यातील खासगी मेडीकल कॉलेजांमधील रद्द झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशमुळे संबंधित विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. परंतु प्रवेश नियंत्रण समितीच्या या निर्णयावर कोणाचाही अंकुश नसल्याने विद्यार्थ्यांना कोर्टाचा अधार घ्यावा लागण्याची शक्यता आहे.

साहेब, काल काय झालं?

$
0
0
पत्रकारांना नेहमीच कुठल्याना कुठल्या ऑफिसमध्ये बातमीसाठी जावे लागतं, काही वेळा महत्त्वाची बातमी असल्यास डायरेक्ट ऑफिसरला भेटल्यावर कधी वरिष्ठ पातळीवरची तर कधी खालच्या स्तरावरच्या घडामोडींची माहइती मिळून जाते.

दुधाच्या सुरक्षिततेची ‘डिग्री’ रामभरोसे

$
0
0
अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार दूधाची ‘डिग्री’ योग्य नसेल तर संबंधितांवर गुन्हा दाखल केला जातो. मात्र, दूध तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) मनुष्यबळ नसल्याने दूधाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हनुमानवाडीत ३ घरे भस्मसात

$
0
0
पंचवटीत परिसरातील हनुमानवाडीत मंगळवारी दुपारच्या सुमारास एका लाकडी चाळीला लागलेल्या आगीत तीन घरे भस्मसात झाली. सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी याठिकाणी राहणाऱ्या कुंटुंबांचे सर्व सामान जळून खाक झाले.

नाशिक फेस्टिव्हलवर दुष्काळाचे सावट

$
0
0
सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या नाशिक फेस्टिव्हलवर यंदा दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळस्थितीत अशा प्रकारचा रंगारंग कार्यक्रम घेऊन टीकेचा धनी होण्यापेक्षा या कार्यक्रमासाठी जमा झालेल्या निधीतील काही भाग दुष्काळग्रस्त भागांवर खर्च करण्याचे नियोजन सुरू असल्याचे कळते.

नव्या अभ्यासक्रमाला करिअरची जोड

$
0
0
पारंपरिक अभ्यासक्रमातून करिअरच्या संधी दुरावत असल्याची बाब खासगी क्लासेस आणि स्पर्धा परीक्षेच्या संयोजकांनी हेरल्याने या मंडळींनी व्यवसायाभिमूख अभ्यासक्रमावर भर दिला आहे.

सहकारी क्षेत्रातून मिळणार १ हजार टाक्या

$
0
0
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना जिल्हा प्रशासनापुढे टँकर्स उपलब्धतेचा नवा प्रश्न उभा राहीला आहे. यावर मात करण्यासाठी सोमवारी झालेल्या बैठकीत तब्बल १ हजार प्लास्टिकच्या टाक्या देण्याचे आश्वासन सहकारी क्षेत्राकडून जिल्हा प्रशासनाला मिळाले.

जिल्हा बँकेवर सहकार विभाग करणार कारवाई

$
0
0
कम्प्युटर खरेदी स्थगित करण्यात आल्याचे लेखी कळवतानाच कम्प्युटर खरेदीसाठी निविदा मागवून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दुटप्पी भूमिका घेत असल्याचे पाहून सहकार विभागाकडून जिल्हा बँकेवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची चिन्हे आहेत. तसे सूतोवाच विभागीस सहनिबंधक गौतम भालेराव यांनी दिले आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images