Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दुष्काळग्रस्त सहाय्यता अभियान

$
0
0
भूगर्भातील बेसुमार पाणी उपशामुळेच पाण्याचे राज्यात मोठे दुर्भिक्ष्य आहे. या पाणी उपशावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक पिकाला ठिंबक सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान देण्याची मागणी कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडे करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले.

'त्या' गार्डचे जबाब नोंदवले

$
0
0
सिव्हील हॉस्पिटलच्या कैदी वॉर्डात उपचार घेणा-या संशयिताच्या झडती दरम्यान सापडलेल्या मोबाइलची गंभीर दखल वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी घेतली असून याबाबत गार्डचे काम पाहणा-या चार पोलिस कर्मचा-यांचे जबाब नोंदवण्यात आले.

अहिराणी साहित्य संमेलन स्थगित

$
0
0
माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांच्या जवाहर समूहाने गाजावाजा करून चर्चेत आणलेले अहिराणी साहित्य संमेलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्यातील दुष्काळाची स्थिती लक्षात घेऊन उत्सव, संमेलन अशा कार्यक्रमांवर खर्च करणे उचित ठरणार नाही.

पाडसाला मिळाली पुन्हा आईची उब

$
0
0
एक दिवसाच्या पाडसाची आपल्या आईपासून ताटातूट झाली होती पण, नऊ तासानंतर हे पाडस आपल्या आईच्या कळपात अलगद विसावलं आणि आईची उबही त्याला मिळाली... ही सुखद घटना घडली ती येवल्यापासून सात किमीवर असलेल्या बनेगावात. या पडसाला आई मिळूवन देण्याचे श्रेय गावच्या शेतकऱ्यांचे आणि वन अधिकाऱ्यांचे!

'राइट टू एज्युकेशन'चा धसका

$
0
0
बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार देणारा अधिनियम लागू करण्यासाठी देशभरातील शाळांना ३१ मार्च २०१३ पर्यंत मुदत देण्या‌‌त आली आहे. या अधिनियमानुसार सुधारणा करण्यासाठी काही महिन्यांपासून प्रयत्न करणा-या शाळांच्या आ‌ता नाकी नऊ आले आहेत.

कुंभमेळ्याच्या कामांना निवडणुकीचा पाश

$
0
0
आगामी काळात येणारा पावसाळा, त्यानंतरची आचारसंहिता व लोकसभा निवडणूका लक्षात घेता प्रशासनाला कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी फारच कमी अवधी मिळण्याची शक्यता आहे.

'एचपीटी'च्या विद्यार्थ्यांचा गुजरात दौरा

$
0
0
एचपीटी आरवायके कॉलेजच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकताच गुजरात राज्याचा अभ्यास दौरा पूर्ण केला. या अभ्यास दौ-यात गुजरातच्या विकासात बहुमोल योगदान देणा-या उद्योग समूहांसह गुजरातचे बहुचर्चित मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचीही भेट विद्यार्थ्यांनी घेतली.

नॉन होम ब्रँच शुल्क बेकायदेशीर

$
0
0
कोअर बँकींगच्या काळातही बँका नॉन होम ब्रँचच्या नावाने छुपे शुल्क ग्राहकांकडून वसूल करीत असल्याचा प्रकार बेकायदेशीर असल्याची बाब पुढे आली आहे. अशा प्रकारच्या शुल्कास रिझर्व्ह बँकेने कुठलीही परवानगी दिलेली नसल्याने या शुल्काची रक्कम वेगवेगळ्या स्वरुपात आकारली जात आहे.

चिमण्या वाचवण्यासाठी बोहरी समाजाचा पुढाकार

$
0
0
लहान मुलांना भरविताना 'चिऊताई, चिऊ ताई दार उघड' ही कवितेची ओळ हमखास गायली जाते. चिऊताईला दाखवित आई आपल्या मुलांना भरविते. मात्र यापुढील काळात चिऊताई कवितेपुरतीच राहिली तर नवल वाटायला नको, कारण चिमण्यांची घटती संख्या चिंतेचे कारण बनू लागली असून त्यांना वाचविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून बोहरी समाजाने पुढाकार घेतला आहे.

अधिकृत रस्त्यासाठी सापडेना मुहूर्त

$
0
0
शहरात कुठे काँक्रिटीकरण, तर कुठे रस्त्यांवर डांबराचे थर लावले जात असताना पंचवटीतील के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजच्या तिनही बाजूच्या रस्ते विकासासाठी महापालिकेला मात्र अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.

पुणे हायवेचा अडथळा दूर

$
0
0
नाशिक-पुणे हायवेवरील खेड-सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणाला केंद्र सरकारच्या मुलभूत सुविधा समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नाशिक-पुणे हायवेच्या कामाला अधिक गती मिळणार आहे.

मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधावी?

$
0
0
पावसाने झोडपले किंवा राजाने मारले तर दाद कुणाकडे मागणार? याचा अर्थ ज्या व्यवस्थेवर जी जबाबदारी आहे, ती व्यवस्था त्या जबाबदारीच्या उलटच वागू लागली म्हणजे लोकांचीही पंचाईत होते. मात्र, त्यावरही मात करणारे जागृत लोक लोकशाहीचा धडा शिकवितात.

तीन ग्रामपंचायती बिनविरोध

$
0
0
तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तसेच काही ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. त्यापैकी करंभेळ (क), सर्लेदिगर, कोसवन या ग्रामपंचायत ‌निवडणुका बिनविरोध झाल्या.

उद्दिष्टापेक्षा अधिक पतपुरवठा

$
0
0
प्राथमिकता क्षेत्रासाठी रिझर्व्ह बँकेकडून नाशिक जिल्ह्यासाठी देण्यात आलेले पतपुरवठ्याचे उद्दिष्ट केवळ नऊच महिन्यांत साध्य झाले आहे. एवढेच नव्हे तर केवळ डिसेंबरपर्यंतच एकूण उद्दिष्टाच्या १२५ टक्के पतपुरवठा करण्यात जिल्ह्यातील बँका यशस्वी झाल्या आहेत.

नाशिकरोड परिसरात उघड्यावर कचरा

$
0
0
मनपा प्रशासनाने कचरा जमा करण्यासाठी प्रभागनिहाय घंटागाड्या सुरू केल्या असल्या तरी नाशिकरोड परिसरातील काही नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहेच शिवाय प्लॅस्टिक पिशव्या टाकल्या जात असल्याने प्रदूषणातदेखील वाढ होत आहे.

आडगाव शिवारात दोन ठार

$
0
0
आडगाव परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोनजण ठार झाले. रविवारी रात्री झालेल्या या अपघाताबाबत आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल केला.

जिप घोटाळा : १५ जणांविरोधात गुन्हा

$
0
0
जिल्हा परिषदेतील लघुपाटबंधारे विभागामार्फत सुरू असलेल्या योजनेमधून बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे १५ जणांविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हाधिका-यांच्या अनुपस्थितीने उद्योजक संतप्त

$
0
0
गेल्या सहा महिन्यांत तीनदा झालेल्या जिल्हा उद्योग मित्रच्या बैठकीला (झूम) जिल्हाधिकारी केवळ एकदाच उपस्थित राहिले. तर, जिल्हाधिका-यांचीच वेळ घेऊन मंगळवारी प्रस्तावित केलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी अनुपस्थित राहिल्याने उद्योजक संतप्त झाले.

सिन्नर रेल्वेला अखेर शेतक-यांची संमती

$
0
0
एकलहरा ते गुळवंच दरम्यान प्रस्तावित असलेल्या सिन्नर रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचा तिढा सुटण्यास अखेर सुरुवात झाली आहे. नायगावच्या बहुतांश प्रकल्पग्रस्तांनी रेल्वे मार्गासाठी सरकारने जाहीर केलेला दर मंजूर असल्याचे जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

मराठी युवकांना लष्करात संधी

$
0
0
देवळाली कॅम्प येथील लष्करी विभागात जिल्ह्यासह राज्यातील युवकांसाठी विविध पदांकरिता मंगळवारपासून (दि. १९) २६ मार्चपर्यंत मुंबई लष्कर भरती कार्यालयामार्फत भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images