Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वाडकरांवर गुन्हा दाखल

0
0
मिळकतीची खोटी कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गायक सुरेश वाडकर आणि अन्य चारजणांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला.

चला, जैवविविधता जपुया!

0
0
नाशिक जिल्ह्याचा समावेश हा पश्चिम घाटामध्ये होतो. याच घाटात जगविख्यात जैविक विविधता आढळते. ही विविधता जपण्यासाठी आपल्याला जाणिवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.

गृहस्वप्न साकारणारे शेल्टर प्रदर्शन डिसेंबरमध्ये

0
0
गृहस्वप्न साकारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे शेल्टर हे गृह प्रदर्शन येत्या १८ ते २१ डिसेंबरदरम्यान डोंगरे वसतीगृहावर होणार आहे. यंदा या प्रदर्शनाला १ लाख लोक भेट देण्याची शक्यता असून, ३०० हून अधिक स्टॉल्स बांधकाम क्षेत्राची माहिती देणार आहेत.

उद्योगांना संधींचे पंख!

0
0
हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) ओझर येथे सुखोई ३० विमानांची संपूर्ण दुरुस्ती आणि देखभालीचे केंद्र (आरओएच) सुरू केल्याने नाशिकच्या उद्योगांना विकासाचे पंख लाभणार आहेत. या केंद्राच्या निमित्ताने एचएएलने तब्बल एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

विकास आराखडाप्रश्नी कृती समितीचे मेळावे

0
0
नाशिक महापालिका क्षेत्रातील प्रस्तावित विकास आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यापार्श्वभूमीवर शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीतर्फे आरक्षणाने बाधित शेतकरी आणि मिळकतधारकांसाठी विविध भागात मेळावे होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे आणि उपाध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड यांनी दिली.

आनंदनगरला सापडेना वाट!

0
0
पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगर येथे डांबरी रस्ते नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक हवालदील झाले आहेत. या रस्त्यांवर केवळ खडी व मुरूम टाकलेला असल्याने पावसाळ्यात तेथे चिखलाचे साम्राज्य पसरते. इतर वेळी डांबरी रस्ता नसल्याने येथील नागरिकांना कसरत करतच खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागतो.

नाशिकरोड भागात कडकडीत बंद

0
0
दलित अत्याचार कृती विरोधी समितीतर्फे नगर जिल्ह्यातील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ बुधवारी नाशिकरोड परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. चोख पोलिस बंदोबस्त आणि नेत्यांच्या संयमित भूमिकेमुळे बंद शांततेत पार पडला. बंददरम्यान एकाची हत्या झाल्याची अफवा मात्र पसरली होती.

अनधिकृत होर्डिंगबाबत महापालिकेची चालढकल

0
0
शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याबाबत महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग ठोस कार्यवाही करताना दिसून येत नाही. नाशिक महानगरपालिकेच्या http://nashikcorporation.in या संकेतस्थळावर शहरातील अनधिकृत होर्डिंगबाबत अॅड. विलास देशमाने यांनी २३ ऑगस्ट रोजी ऑनलाईन तक्रार दाखल केली असता, त्यावर आजवर कोणतीही कार्यवाही केली गेली नसल्याची व्यथा त्यांनी `मटा`कडे मांडली आहे.

गितेंना पायघड्या घालणारे अडचणीत?

0
0
मनसेचे माजी आमदार वसंत गितेंना पक्षात प्रवेशासाठी पायघड्या घालणे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना महागात पडले असून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची कानउघाडणी केल्याचे वृत्त आहे.

कोट्यवधींची वाहने धुळखात

0
0
वर्षानुवर्ष धुळखात‌ पडलेल्या वाहनांमुळे शहरातील पोलिस स्टेशनच्या आवाराला बकाल रूप आले आहे. एकीकडे गुन्हेगारी रोखण्यासाठी धावाधाव करणाऱ्या पोलिसांना वर्षानुवर्ष ही बेवारस वाहनेही सांभाळावी लागत असून, अशा केसेसेचा निपटारा करण्याचे आव्हानही पोलिसांपुढे आहे.

जवखेडे हत्याकांडाचा सटाण्यात निषेध

0
0
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे गावात दलित समाजातील जाधव कुंटुबातील तिघांची हत्या करण्यात आली असून, अद्याप मारेकऱ्यांना अटक न केल्याने बागलाण तालुका बौध्द समाजाच्या वतीने जाहीर निषेध करून तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना निवदेन देण्यात आले.

मुंढेगावकरांनी बांधले ११ वनराई बंधारे

0
0
इगतपुरी तालुका हा पावसाळी भाग असूनही खडकाळ जमिनीमुळे पाणी जमिनीत संचित होत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यातील पाणी वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून अडविण्याचे धोरण मुंढेगाव ग्रामपंचायतीने स्वीकारले अन् यशस्वीपणे राबविले.

विकासासाठी कटिबध्द

0
0
येवला मतदारसंघातील लासलगावसह ४२ गावातील नागरिकांनी यावेळी मोठे मताधिक्य दिल्याने आपला विजय सुकर झाला. विरोधी पक्षात असलो तरी लासलगावसह ४२ गावांच्या विकासासाठी कटिबद्ध असून भरीव कामे केले जातील, असे आश्वासन येवला- लासलगाव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार छगनराव भुजबळ यांनी दिले.

गायी चोरीप्रकरणी येवल्यात निषेध

0
0
तालुका व शहर परिसरात गोवंश व पशुधनाच्या वाढत्या चोरीप्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन उपाय योजना करण्यात यावी, या मागणीसाठी शहरातील शनि पटांगण येथे बुधवारी, सकाळी ११ वाजता गो भक्तांतर्फे मूक निदर्शने करण्यात आले.

त्र्यंबक नगरपालिकेत नेतृत्व बदलाचे वारे

0
0
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत नेतृत्व बदलाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या विशेष सभेतील प्रकाराचे पडसाद आता उमटू लागले आहेत. सत्तेच्या सारीपाटात विकासकामांना शह नको, असे मत नगराध्यक्षा यशोदा अडसरे यांनी व्यक्त करीत राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

चारा, पाणीटंचाईचे नियोजन करा

0
0
यंदा पाऊस कमी झाल्याने चारा, पाणीटंचाई संदर्भात वेळीच नियोजन करा. भारत निर्माण योजनेची अपूर्ण कामे तत्काळ मार्गी लावा. येवला शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये पशुधनासह, वाहनांची चोरी होत असल्याच्या संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या गस्त वाढवा आणि भयमुक्त वातावरण निर्माण करा, अशा सूचना माजी मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मांजरपाडा प्रकल्पासाठी लढा उभारणार

0
0
येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागाला जलसंजीवनी ठरणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाच्या कामाला गती मिळावी, यासाठी शासन दरबारी लढा उभारण्याचा निर्णय येवला तालुका जलहक्क संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइन अर्ज

0
0
ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज- सादर करण्याचे आयोगाचे निर्देश अनेक अडचणींना तोंड देणारे ठरत आहे.

नाशिककरांनो, बाळगा सावधानता!

0
0
डेंग्यू जातीचे डास साठलेल्या पाण्यात वाढतात. कुंड्या, टायर, नारळाच्या कवट्या, प्लास्टिकची भांडी आदि घराच्या अवतीभवती आढळणाऱ्या वस्तूंमध्ये ते वाढतात. त्यामुळे घरात अन् आजूबाजूला पाण्याचे साठे होणार नाहीत, याची काळजी नाशिककरांनी घ्यायला हवी.

प्रेस प्रमोशनबाबत अन्याय केला दूर

0
0
भारत प्रतिभूती आणि चलार्थ मुद्रणालयातील कामगारांवर अन्यायकारक प्रमोशन पद्धती लादण्यात आली होती. कामगार २५ ते ३० वर्षे एकाच ग्रेडमध्ये राहत होते. एखादे प्रमोशन मिळाल्यानंतर निवृत्त होत होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images