Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘आयटीआय’चा निकाल लांबला

$
0
0
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाकडून घेतल्या जात असलेल्या राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) सुमारे लाखभर विद्यार्थ्यांचे निकाल लागू शकलेले नाहीत.

एलबीटी, जकात १५ दिवसांत हद्दपार

$
0
0
एलबीटी आणि जकात या दोन्ही करपद्धती येत्या १५ दिवसांत राज्यातून हद्दपार होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना दिली आहे. या दोन्ही करांच्या बदल्यात अस्तित्वात येणारा नवा कर व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच निश्चित केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे.

वाहनांवर पोलिसांची वक्रदृष्टी

$
0
0
कोर्टाबाहेर अनधिकृतपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी दंड थोपटले आहेत. येथील वाहतुकीला होणारा अडथळा, त्यातून बळावणारी अपघातांची शक्यता दूर करतानाच वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी येथे वाहने उभी करण्यास बुधवारपासून मज्जाव करण्यात आला आहे.

गेडाम यांची आयुक्तपदी नियुक्ती

$
0
0
तब्बल सात महिन्यांपासून रिक्त असलेल्या नाशिक महापालिकेला नव्या सरकारच्या स्थापनेनंतर पूर्णवेळ कारभारी मिळाला आहे. सोलापुरचे जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थायी समितीच्या सदस्य निवडीवरून गोंधळ

$
0
0
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे अपेक्षेप्रमाणे प्रभार वाटप झाले असले तरी, स्थायी समितीच्या सदस्यांवरून राष्ट्रवादीत साठमारी सुरू झाली आहे.

कलावंतांच्या अडचणी सोडवू

$
0
0
नाशिकचे उदयोन्मुख कलाकार मोठे होण्यासाठी व त्यांना लागणाऱ्या सुविधा तसेच कालिदासचा चेहरामोहरा पूर्णतः बदलता येईल. याकरिता मनपातील सर्वपक्ष, गटनेते, पदाधिकारी, नाट्य परिषदेचे पदाधिकारी यांच्याशी एकत्रित चर्चा करून कलावंताच्या अडचणी सोडवल्या जातील, असे आश्वासन महापौर अशोक मुर्तडक यांनी दिले.

रंगभूमीद‌िनी कलाव‌िष्कारांचा जागर

$
0
0
च‌ित्तवेधक नृत्याव‌िष्कारासह मनाचा ठाव घेणारे काव्यवाचन, अभ‌िनेत्याच्या भाव‌व‌िश्वावर प्रकाश टाकणारे नाट्यसादरीकरण अन् अंतर्मनात डोकावण्यास लावणारे कथावाचन अशा व‌िव‌िधांगी कलाव‌िष्कारांचा जागर कलाप्रेमींनी घडवून आणला. न‌िम‌ित्त होते रंगभूमी द‌िनाचे.

त्र्यंबक मंदिरात श्रीफळ, फुलांना बंदी

$
0
0
बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ठिकाणी श्रीफळ आणि फुलांना बंदी केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय ट्रस्टच्या बैठकीत घेण्यात आला असून, येत्या १ डिसेंबर किंवा १ जानेवारीपासून हा निर्णय लागू केला जाण्याची शक्यता आहे.

आजपासून कार्तिक महोत्सव

$
0
0
पंचवटीतील पुरातन कार्तिक स्वामी मंदिरात काशी नाट्टाकोटीनगर छात्रम मँनेजिंग सोसायटीच्या वतीने आजपासून (दि. ६) कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

डेंग्यूच्या तापाने ओलांडली शंभरी

$
0
0
नाशिक शहरात अस्वच्छेतेचे साम्राज्य पसरल्याने डेंग्यूनेही आपले पाय घट्ट पसरवले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करूनही शहरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याने महिनाभरात तब्बल २७६ डेंग्यू सदृश्य संशयित रुग्ण आढळून आहेत.

डॉक्टरबंधूंची सायकलभरारी

$
0
0
चार वर्षांपूर्वी हौसेखातर सायकल चालवणाऱ्या डॉ. महेंद्र आणि डॉ. हितेंद्र महाजन या नाशिकमधील बंधूंनी सायकलिंगला आव्हान मानत जगातील मानाच्या सायकल रेसपैकी असलेल्या ‘रॅम’मध्ये (रेस अक्रॉस अमेरिका) धडक मारली आहे.

रुग्णालय, नाट्यगृहापासून वंचित

$
0
0
अनेक वर्षांपासून महापालिकेच्या रुग्णालयाची सिडकोवासियांची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. महापालिकेचे अन्य विभागात १०० ते २०० बेड्सचे रुग्णालय आहेत. मात्र, सिडकोवासिय रुग्णालय, नाट्यगृह अश्या अनेक मागण्यांपासून उपेक्षितच आहेत.

रस्ता होईल, पार्किंगचे काय?

$
0
0
अशोक स्तंभ ते रविवार कारंजा या एकेरी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, यात रुंदीकरणाचा विचार करण्यात आला नसून याचा फटका स्थानिक व्यापाऱ्यांसह सर्वसामन्यांना बसणार आहे.

भुजबळांना `सर्वपक्षीय` साकडे

$
0
0
केंद्रापाठोपाठ राज्यातही नवे सरकार स्थापन झाले तरी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या महापालिकेतील सत्ताधिकाऱ्यांनी निधीसाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व आमदार छगन भुजबळ यांना साकडे घातले आहे.

शिवसेना नगरसेवकांमध्ये जुंपली

$
0
0
मनसेचे माजी आमदार वसंत गितेंची भेट घेणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या भूमिकेवर भाष्य करणारे विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांच्यावरच नगरसेवकांनी आता आक्षेप घेतला आहे.

सावानाचे आवार बनले ‘दीन’

$
0
0
सुमारे पावणेदोनशे वर्षांचा इत‌िहास सांगणारे सार्वजन‌िक वाचनालयाचे आवार या संस्थेच्या पदाध‌िकाऱ्यांच्या आपसातील लाथाळ्यांमुळेच दीन बनले आहे. तब्बल दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली फोडून ठेवलेले हे आवार दुरुस्त करण्यासाठी व अग्न‌िशमन यंत्रणेसाठी आतापर्यंत तब्बल ४५ लाख रुपयेही अदा करण्यात आले आहेत.

कम्युनिटी कॉलेज सुरू करणार

$
0
0
मुक्त विद्यापीठाद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील काळात अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून बहुतांश अभ्यासक्रमातील बदल करण्यात येतील.

ग्राहकांसाठी आता सुवर्णयोग

$
0
0
धनत्रयोदशीनंतर सोन्याच्या भावामध्ये सुरू झालेली घसरण अद्याप थांबलेली नाही. तुलसी व‌िवाह पार पडल्यानंतर आता वधू आण‌ि वरप‌ित्यांच्या नजरा व‌िवाहमुहूर्तांकडे लागल्याने सराफ बाजारातील गर्दी वाढू लागली आहे.

‘पर्ल्स’मध्ये ५०० कोटींच्या ठेवी

$
0
0
पर्ल्स ग्रुपच्या पीएसीएल लिमिटेड या कंपनीमध्ये नाशिकच्या ३१ हजार गुंतवणुकदारांच्या सुमारे ५०० कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. कंपनीचे शहरातील कार्यालय नियमित सुरू असले तरी सेबीच्या निर्बंधांमुळे तेथील ठेवी अडकून पडल्याने प्रत्येक घडामोडीगणिक गुंतवणूकदारांची धडधड वाढतेच आहे.

प्रशासनाचे वरातीमागून घोडे

$
0
0
डेंग्यूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या ​जितेंद्र कुलकर्णी यांचे शितला अपार्टमेंटमध्ये घर आहे. या भागात अस्वच्छतेमुळे अनेक समस्या उद्भवल्या असून, याबाबत महापालिकेच्या हेल्पलाईनवर तक्रार देखील केली. मात्र, आजवर त्यावर कारवाई झाली नाही.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images