Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वनभरतीसाठी धावले ४९४ परीक्षार्थी

$
0
0
नाशिक वनविभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या वनरक्षक भरती अंतर्गत उमेदवारांच्या धावण्याच्या चाचणी परीक्षेला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. शनिवारी ४९४ उमेदवारांनी सहभाग घेतला असून, रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी एकूण १२५१ उमेदवार परीक्षा देणार आहेत.

अनधिकृत टोमॅटो खरेदी केंद्र होणार बंद

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे फाटा येथे टोमॅटो भावावरून झालेल्या रास्तारोकोच्या आंदोलनानंतर बाजार समितीने तातडीने बैठक घेत तालुक्यातील सर्व अनधिकृत खरेदी विक्री केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांना लागणार व्यायामाचा लळा

$
0
0
कायदा आणि सुव्यवस्था राखायची तर पोलिसांची फिटनेसही चांगला असायला हवा. ढेरपोटे पोलिस नेहमीच चेष्ठेचा विषय ठरतात. धकाधकीच्या जीवनशैलीतही पोलिसांना दोन घटका व्यायाम करता यावा, यासाठी पोलिस स्टेशनच्या आवारातच ग्रीनजीम विकसित करण्यात आली आहे.

चूक पोस्टाची, भोगतोय खातेदार

$
0
0
पोस्टाच्या बॅंकेत जमा केलेले ५३ हजारांचे दोन धनादेश पोस्टाकडून गहाळ झाल्यामुळे खातेदार हवालदिल झाला आहे. गेल्या वीस दिवसांपासुन समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा खातेदाराने पोस्टाला दिला आहे.

‘महिंद्रा’च्या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत सहभागी होणाऱ्या महिंद्र अॅण्ड महिंद्र या कंपनीने आज स्वच्छता मोहिमेस सुरूवात केली.

पेन्शनवाढीसाठी सरकार प्रयत्नशील

$
0
0
बॉश सेवानिवृत्त कल्याण मंडळाच्या लेखी निवेदनाची दखल घेत सेवानिवृत्तांना तीन हजार रुपये पेन्शनवाढीसाठी सरकार प्रयत्नशिल असून त्यात सध्या एक हजार रुपयांची वाढ करणार असल्याचे आश्वासन केंद्र‌ीय सूचना व प्रसारण तसेच पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंडळास दिले असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चेतन पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

कुंभमेळा राष्ट्रीय उत्सव

$
0
0
कुंभमेळा हा राष्ट्रीय उत्सव असून मनसेने महापालिकेत राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रीय उत्सवात सर्वांच्या सहभागाने रंग भरू शकतो, याची मनसे गटनेते अशोक सातभाई यांनी जाणिव ठेवावी, अशी टीका पंचवटी विभागाचे अध्यक्ष देवांग जानी केली.

कुंभमेळा निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा

$
0
0
शिखरसमितीच्या बैठकीत आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जाईल. नाशिकचा कुंभमेळा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल असून, निधीची उपलब्धता वेळेत आणि जास्तीत जास्त करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका शिष्टमंडळास दिले.

लामरोडकरांची पहाट

$
0
0
पहाटेच्या सुमाराला व‌िठ्ठलाच्या मंद‌िरातील मंद घंटानाद परिसरातील रह‌िवाशांच्या कानी पडू लागतो अन् काकड्याच्या मंगल स्वरांच्या द‌िशेने देवळाली परिसरातील लामरोडकरांची पावले मंद‌िराच्या द‌िशेने पडू लागतात.

२० झाडांवर कुऱ्हाड?

$
0
0
वडनेर येथील महादेवाचे मंदिराशेजारील वीस झाडे महापालिका तोडणार आहे. ही झाडे का आणि कोणाच्या परवानगीने तोडली जाणार आहेत. याबाबत मात्र कोणीही बोलायला तयार नाही. झाडे तोडली जाणार असल्याने परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध केला असून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

डेंग्यूच्या फैलावाला हलगर्जीपणा कारणीभूत

$
0
0
चेतनानगरमध्ये फैलवणाऱ्या डेंग्यूस प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. इंदिरानगर पोलिस स्टेशनसमोर एका मोठ्या खड्ड्यात मागील दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून पाणी साचले असून वारंवार तक्रारी केल्यानंतरही त्याकडे डोळाझाक केली जात आहे.

नाश‌िक कॅम्पसच्या वाट्याला उपेक्षाच!

$
0
0
नाश‌िक कॅम्पसच्या लॅबरोटरी इनस्ट्रुमेंट्ससाठी व‌िद्यापीठ अर्थसंकल्पात सुमारे अडीच कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षे उलटली तरी तेव्हा गवगव्यासह करण्यात आलेली ही तरतूद कागदावरच आहे. उपकेंद्रासाठी मोठी आर्थ‌ि‌क तरतूद करूनही चार वर्षांत चार वेळा न‌िधी परत गेला आहे.

'स्वीकृती भाग-२' चा उद्योजकांनी घेतला लाभ

$
0
0
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी नुकताच 'स्वीकृती भाग-२' उद्योजकांचा मेळावा घेण्यात आला. त्यात ५० उद्योजकांना लाभ मिळाला.

श्रीफळ, फुले बंदीला विरोध

$
0
0
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ठिकाणी श्रीफळ आणि फुलांना बंदी घालण्याच्या ट्रस्टचा निर्णयाला काही विश्वस्तांनी विरोध केला आहे. यामुळे भाविकांच्या भावना व श्रद्धा यांना ठेच पोहोचेल, असा मुद्दाही विश्वस्तांनी उपस्थित केला आहे.

शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच

$
0
0
शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. शहरातील विविध भागांमधून चार मोटरसायकली चोरीस गेल्या. एनडी पटेल रोड येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या डेपो एकच्या आवारातून मोटरसायकल चोरीस गेली आहे.

आयटी पार्कसाठी राखीव क्षेत्र हवे

$
0
0
महापालिकेसाठी विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचे काम सध्या सुरू असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आयटी पार्क क्षेत्र, ६० मीटर डी. पी. रस्त्यालगत दोन्ही बाजूस वाणिज्य तसेच, रहिवासी क्षेत्र आणि पांजरपोळ ट्रस्टच्या चुंचाळे शिवारातील जागेवर औद्योगिक क्षेत्र राखीव करण्यात यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी सहसंचालक नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाकडे केली आहे.

संशोधनावर लक्ष केंद्रित करावे

$
0
0
कौशल्याधारीत मनुष्यबळाची नि‌िर्मती आणि काळानुरूप अभ्यासक्रम सुरू करण्याची जबाबदारी विद्यापीठांवर आहे. व‌िद्यापीठांशी न‌िगडीत प्राध्यापक वर्गाने श‌िक्षणा सोबतच संशोधनास महत्त्व द्यावे.

महापालिकांचा ४० टक्के खर्च कचऱ्यात

$
0
0
देशातील ५९ महापालिकांचे सर्वेक्षण नीरी संस्थेने केले असून, महापालिकांचा सरासरी ४० टक्के खर्च हा कचऱ्याच्या व्यवस्थापनावर होत असल्याची माहिती नीरीचे शास्त्रज्ञ डॉ. राजेश बिनीवाले यांनी दिली. अंबडच्या इंजिनीअरींग क्लस्टरमध्ये आयोजित दोन दिवसीय ग्रीह परिषदेत ते बोलत होते.

चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

$
0
0
निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील गावांमध्ये बिबट्याचा उपद्रव काही केल्या थांबत नसून सायखेडा येथे शनिवारी बिबट्याने एका सहा वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला चढविला. यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी नाशिकच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोनई हत्याकांड खटल्याची सुनावणी

$
0
0
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे २०१३ मध्ये घडलेल्या बहुचर्चित तिहेरी हत्याकांडांची सुनावणी उद्या, सोमवारपासून नाशिक येथील जलदगती न्यायालयात सुरू होणार असल्याचे समजते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images