Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

न्याय हवा... अन्याय नको!

0
0
न्यायासाठी कोर्टाचे उंबरठे झिजविणाऱ्या पक्षकारांच्याच वाहनांना कोर्ट आवारात प्रवेश नाकारणे हा त्यांच्यावर व्यवस्थेकडून होणारा अन्यायच आहे.

उच्च शिक्षण व रोजगारक्षमता

0
0
भारतातील १५ ते २४ या वयोगटातील तरुणांची संख्या २२ कोटी ४० लाख किंवा एकूण लोकसंख्येच्या १८ टक्के इतकी आहे. हिंदुस्थान हा तरुणांचा देश म्हणून जगभर आता ओळखला जातो. पण याच बरोबर तो आता सर्वाधिक बेरोजगारांचा देश म्हणूनही उल्लेखला जात आहे.

महापौरांची चेतनानगरला धाव

0
0
चेतनानगर परिसरात आरोग्य सेवा पुरवण्यात कोणतीही कसूर केली जाणार नाही. दोन दिवसात अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा सर्व परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन महापौर अशोक मुर्तडक यांनी ‘शितला’ अपार्टमेंटमधील तसेच चेतनानगरमधील रहिवाशांना दिले.

रस्ता रुंदीकरणाबाबत आज होणार निर्णय?

0
0
अशोकस्तंभ ते रविवार कारंजा या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याची चाचपणी करण्यासाठी सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी रविवार पेठेतील कालिका माता मंदिरात सायंकाळी पाच वाजता बैठक होणार आहे.

आयुक्त प्रवीण गेडाम आज स्वीकारणार पदभार

0
0
महापालिकेचे नूतन आयुक्त प्रवीण गेडाम सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी सकाळी आपल्या पदाचा कार्यभार स्व‌ीकारणार आहेत. सोमवारपासूनच आपले कामकाज सुरू करणार असल्याची माहिती गेडाम यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

भारनियमनाचा पिकांना फटका

0
0
बागलाण तालुक्यात विजेच्या वाढत्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांसह उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. भारनियमनाचा दैनंदिन व्यवहारावर विपरित परिणाम झाला आहे.

मालगाडीचे डबे नांदगावजवळ घसरले

0
0
भुसावळकडून नाशिककडे अपलाइनवर जात असलेल्या मालगाडीचे डबे नांदगाव रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी घसरले. एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात सदर मालगाडीद्वारे कोळसा नेण्यात येत असल्याचे समजते.

कळवणमध्ये पुन्हा पाच घरफोड्या

0
0
आठ दिवसांच्या अंतरात कळवण शहरात पुन्हा पाच ठिकाणी घरफोडी झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. चोऱ्या रोखण्यास अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत.

येवल्यात रेशीम पार्क उभारा

0
0
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत येवला येथे रेशीम पार्क उभारण्याची मागणी आमदार छगन भुजबळ यांनी रेशीम संचालनालय व सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

बिबट्याच्या डरकाळ्यांनी रोजच उडतो थरकाप

0
0
जंगले नष्ट झाल्याने वन्यजीवांना पाण्यासाठी व भक्षासाठी दूरवर भटकंती करण्याची वेळ येवून ठेपली आहे. भक्ष मिळत नसल्याने वन्यप्राणी हे पाळीव प्राण्यांसह माणसांवर हल्ले करू लागले आहेत. यामुळेच निफाड तालुक्यात गोदा काठावर गेल्या दोन तीन महिन्यात अनेक जणांवर बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या.

सराफ व्यावसायिकाला लुटले

0
0
कारागिरासह चाललेल्या सराफ व्यावसायिकाच्या वाहनाला धडक देऊन त्यांना जखमी करीत चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने हिसकावून नेले. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये हा जबरी चोरीचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

एमआयडीसीतील वृक्षतोडीची चौकशी

0
0
अंबड औद्योगिक वसाहतीतील सी-४१ या भूखंडावर शनिवारी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाल्याने महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून चौकशी होणार आहे. तसेच, याप्रकरणी उद्योग मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडेही तक्रार केली जाणार आहे.

श‌िक्षण संघर्ष या‌‌त्रा बुधवारी नाश‌‌कात

0
0
सर्वांसाठी श‌िक्षणाचा अध‌िकार पुनर्स्थापित करण्यासाठी अख‌िल भारत श‌िक्षा अध‌िकार मंच या संघटनेच्या वतीने देशभरात संघर्षयात्रेला सुरुवात झाली आहे. बुधवारी, ११ नोव्हेंबर रोजी ही यात्रा नाश‌िक शहरात येणार आहे.

नाशिकरोडचा बदलावा चेहरामोहरा

0
0
शहराचा महत्वाचा भाग झालेल्या नाशिकरोडचा चेहरामोहरा बदलण्याची गरज आहे. आमदारांनी त्यासाठी पाठपुरावा करण्याची अपेक्षा आहे. नाशिकरोडचा काही भाग नाशिक पूर्व मतदारसंघात तर बराचसा भाग देवळाली मतदारसंघात येतो.

ग्रामपंचायतींच्या अर्जांची आज छाननी

0
0
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवारी (१० नोव्हेंबर) होणार आहे. जिल्ह्यातील ७२ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक तर ८८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

सोनई हत्याकांडाची आज सुनावणी

0
0
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे २०१३ मध्ये घडलेल्या बहुचर्चित तिहेरी हत्याकांडांची सुनावणी आजपासून येथील जलदगती न्यायालयात सुरू होणार असल्याचे समजते. जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडावरून राज्यभर रान उठले असताना या सुनावणीकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

वनभरतीचा आज शेवटचा दिवस

0
0
नाशिक वनविभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या वनरक्षक भरती अंतर्गत उमेदवारांच्या धावण्याच्या परीक्षेत रविवारी ५५१ उमेदवारांनी सहभाग घेतला. गेल्या दोन दिवसात १०४५ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.

गोंदे-भिवंडी प्रवास बनला खडतर

0
0
देशातील तिसऱ्या क्रमांकाचा आणि नुकताच चौपदरी झालेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील गोंदे ते भिवंडी हा प्रवास अत्यंत खडतर बनला आहे. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक हैराण झाले असून, राष्ट्रीय हायवे प्राधिकारणाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

केंद्राच्या सौर योजनेत नाशिक

0
0
केंद्र सरकारने देशातील एकूण २७ शहरांमधून २६ मेगावॅट सौर विजेची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, या योजनेत राज्यातील नाशिक, नागपूर आणि पुणे या तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. दिवसा विजेचा अधिक उपयोग करणाऱ्या संस्था तसेच उद्योगांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.

महापौरांना हवी ‘साजेशी’ कार

0
0
नूतन महापौर अशोक मुर्तडक यांना ‘साजेशी’ कार विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी १६ लाख रूपये खर्चून महापौरांसाठी विकत घेण्यात आलेली कार उपमहापौरांसाठी राखीव करण्यात येणार असून महापौरांसाठी ‘इनोव्हा व्हीएक्स’ खरेदी करण्याबाबतचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images