Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पोलिस असल्याचे भासवून लुटल्याच्या दोन घटना

$
0
0
पोलिस असल्याची बतावणी करून लुटल्याच्या दोन घटना पंचवटी आणि अंबड पोलिस स्टेशनच्या हद्द‌िमध्ये घडल्या. एका पाठोपाठ घडलेल्या या घटनांप्रकरणी पोलिसांकडून संशयितांची रेखाचित्रे तयार केली जात आहेत.

अत‌िरिक्त शिक्षकांचा प्रश्न कायम

$
0
0
राज्यभरातील अत‌िरिक्त श‌िक्षकांवर गंडांतर येऊ देणार नाही, अशी भूम‌िका नवन‌िर्वाचीत उच्च व श‌िक्षणमंत्री व‌िनोद तावडे घेत असले तरीही प्रत्यक्षात मात्र प्रशासनाने या अत‌िरीक्त पदांच्या समायोजनाचे आदेश द‌िले आहेत.

भाजपच्या आमदारांची नैतिकता गेली कुठे ?

$
0
0
जळगाव महापालिकेतील नगरसेवक आणि नव्याने आमदार म्हणून निवडून आलेल्या भाजपच्या सुरेश भोळे आणि शिवसेनेच्या प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी विधानसभेची पायरी चढताच आपल्या नगरसेवकपदाचे राजीनामे दिले आहेत.

फेसबुकप्रकरणी मालेगावात गुन्हा दाखल

$
0
0
राष्ट्रपुरुषांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह शब्दप्रयोग करून छायाचित्राची विटंबना केल्याप्रकरणी राजेश शर्मा गौतवाली नामक अज्ञात व्यक्तिविरुध्द मालेगाव कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढकांबे, सप्तशृंग गड टोलनाका बंद करा

$
0
0
ढकांबे व सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या दोन टोल नाक्यावर सर्रासपणे बेकायदेशीर पावत्या देऊन सामान्य जनतेची लूट होत आहे. ही लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी दिंडोरीच्या सरपंच छबूबाई वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिंडोरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

वणी-सापुतारा रस्त्याची दुरवस्था

$
0
0
वणी-सापुतारा रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी अवस्‍था झाली आहे. वाहनधारकांनी वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. वणी व सापुतारा येथे पर्यटकांची कायम वर्दळ असते.

मोकळ्या भूखंडांवर अस्वच्छतेचा कळस

$
0
0
शहरातील नववसाहत परिसरातील पाठक मैदान, शिवनेरी नगरी, शिवाजी नगर, गणपत नगर, या भागातील मोकळ्या भूखंडावर अस्वच्छता पसरली आहे. यामुळे डेंग्यूसारख्या आजारांना आमंत्रण मिळत आहे.

नुकसानग्रस्त भात‌शेतीचे त्वरित पंचनामे करा

$
0
0
परतीचा पाऊस पुरेसा न झाल्याने तसेच, रोगराईमुळे इगतपुरी - त्र्यंबकेश्वर या आदिवासी मतदारसंघातील भात शेती पूर्णता नष्ट झाली आहे. अशा परीस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित पंचनामे करून भरपाई द्या, अशी मागणी आमदार निर्मला गावित यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

लासलगाव येथे कडकडीत बंद

$
0
0
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषधार्थ सोमवारी लासलगाव येथे स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला. लासलगाव येथील जातीय अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शहरातील वैद्यकीयसेवा वगळता सर्वच घटकांनी प्रतिसाद दिला.

जवखेडे हत्याकांडाच्या निषेधार्थ आंदोलन

$
0
0
तालुक्यातील अंदरसूल येथे जवखेडे येथील दलित कुटुंबीयांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले. हत्याकांडाचा निषेध करीत सोमवारी सकाळी १० वाजता सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते नाशिक-औरंगाबाद महामार्गावर उतरले.

भाडे दर निश्चितीला जिल्हाधिकाऱ्यांची प्रतीक्षा

$
0
0
साधुग्रामसाठी अधिग्रहीत करावयाच्या जमिनीचे भाडे समितीने निश्चित केले असले तरी त्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. जिल्हाधिकारी सध्या रजेवर असल्याने पुढील आठवड्यातच त्यास मंजुरी मिळणार आहे.

धूर फवारणी यंत्रासाठी ‘भीक मागो’ आंदोलन

$
0
0
डासांचा बंदोबस्त करण्याकरिता महापालिकेला धुराळणी यंत्रे खरेदी करण्यासाठी संभाजी बिग्रेडतर्फे नाशिकरोड येथे सोमवारी ‘भीक मागो’ हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

नऊ बाजार समित्यामंध्ये निवडणुकांचे वारे

$
0
0
संचालक मंडळाची मुदत संपूनही केवळ तत्काल‌िन सहकारमंत्र्यांच्या मुदतवाढीच्या आशीर्वादाने कारभार हाकत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील नऊ बाजार समित्यांमध्ये आता निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.

मुंबईतील शक्तीप्रदर्शानपासून नाशिकच्या मनसेने राखले अंतर

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर विश्वास व्यक्त करण्यासाठी मनसेच्या वतीने सोमवारी मुबंईत झालेल्या शक्तीप्रदर्शनाकडे नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. रितसर निरोप नसल्याने पदाधिकारी गेले नसल्याचा दावा पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी केला असून आम्ही पक्षासोबतच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कामाच्या व्याप्तीनुसार इंजिनीअर्सची संख्या वाढवा

$
0
0
साधुग्रामच्या कामाची व्याप्ती मोठी असून ३२४ एकरपैकी ५४ एकरवर विविध कामे सुरू करण्यात आली आहे. लवकरच जमी‌न उपलब्धतेचा मुद्दा निकाली निघण्याची शक्यता असून कामाच्या वाढत्या व्याप्तीबरोबर याठिकाणी इंजिनीअर्सची संख्या वाढवावी अशी सूचना आयुक्त प्रवीण गेडाम यांनी संबंध‌ित विभागाला केली.

आयुक्तांमुळे महापालिका झाली ‘सक्रिय’

$
0
0
कायमस्वरूपी आयुक्त नसल्याने सहा महिन्यांपासून ‘सुस्त’ झालेल्या महापालिकेत सोमवारी कायमस्वरूपी आयुक्त हजर होताच अधिकाऱ्यांसहीत पदाधिकाऱ्यांच्या हालचाली गतीमान झाल्या. पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच दिवशी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी बैठकांचा सपाटा लावला.

हिंस्र श्वापदाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

$
0
0
इगतपुरी तालुक्यात खेडभैरव परिसरातील पडवळवाडी येथे हिंस्र्र श्वापदाच्या हल्ल्यात आदिवासी शेतकरी ठार झाला. बहिरू पांडू धादवड (वय ६२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली.

एचएएल सोसायटीसाठी उपोषण

$
0
0
एचएएल सोसायटीच्या भ्रष्ट संचालकांवर कारवाई करण्यासह सोसायटीच्या पुनरुज्जीवनासाठी सोसायटी नवनिर्माण कृती समितीने सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सभासदांनी ठराव करूनही सहकार विभागाने सोसायटीच्या सचांलकावर कारवाई करण्याचे टाळत, ठेवीदारांचे आणि सभासंदाचे नुकसान केले आहे.

‘सार्वजनिक’चे धाबे दणाणले

$
0
0
बांधकामांमध्ये फ्लाय अॅशच्या विटांचा वापर आजवर केला नसल्याचा नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा सत्य आहे का हे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करा, असे आदेश पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशामुळे बांधकाम विभागाचे धाबे दणाणले आहेत.

खासगीकरणाने एसटी सेवा अडचणीत

$
0
0
‘केंद्र शासनाने रस्ते वाहतूक व सुरक्षा कायदा २०१४ मधील भाग ७ मध्ये प्रवासी वाहतुकीसंदर्भात अनेक बदल सूचविले आहेत. खासगी आणि सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची एकसारख्याच गणनेचे धोरण एसटी महामंडळाला मारक ठरणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images