Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

...तर खासगी डॉक्टर्सवर कारवाई

$
0
0
डेंग्यू आजारावर उपचार घेण्यासाठी बहुसंख्य नागरिक खासगी हॉस्पिटल्सकडे धाव घेतात. मात्र संबंधीत डॉक्टर्स या पेशंटची माहिती महापालिकेला देत नाहीत.

सिंहस्थ कामांना प्रथम प्राधान्य

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे पूर्ण करण्यासाठी अवघे काही महिने हाती आहेत. नियोजनाच्या दृष्टिकोनातून या कामांना गती देणे आवश्यक असून, यापुढे सिंहस्थालाच प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रवीण गेडाम यांनी स्पष्ट केले.

बोट क्लब पुढील वर्षीच कार्यान्वित

$
0
0
गंगापूर धरणाच्या ठिकाणी प्रस्तावित असलेले बोट क्लब पुढील वर्षीच सुरू होण्याची शक्यता आहे. जलसंपदा आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्यात करार होणे आवश्यक असून, त्याचा प्रस्ताव मंत्रालयात गेला आहे. त्यामुळे बोट क्लब नक्की कधी सुरू होणार याबाबत संदिग्धता आहे.

जगाचा पोशिंदा काकुळतीला

$
0
0
लांबलेला खरीप हंगाम नंतर खोळंबलेला पाऊस यामुळे शेतपिकांची पुरती वाट लागली. परतीचा पुरेसा पाऊस न झाल्याने मका, बाजरीचे दाणे न भरल्याने पिकांचा कडबा झाला आहे.

पावसामुळे भातपिकावर संक्रांत

$
0
0
इगतपुरी तालुक्यात घोटी व परिसरात मंगळवारी सायंकाळी अर्धा तास पाऊस झाल्याने उरल्यासुरल्या भातपिकाचेही नुकसान झाले आहे. रोगराई व पावसाअभावी उत्पन्न घटलेल्या भात उत्पादकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

सत्संगाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल

$
0
0
मनमाड शहरातील श्री दत्तोपासक मंडळ गेल्या कित्येक वर्षांपासून संत्सगाच्या माध्यमातून अवघे मनमाड शहर आळंदीमय करण्याचा अनोखा ध्यास आपल्या कृतीतून जपत आहे.

अखेर ‘तो’ खड्डा बुजविला

$
0
0
इंदिरानगर पोलिस स्टेशनसमोरील एका खासगी जागेवरील खड्डा नगरसेवक सतीश सोनवणे यांनी पुढाकार घेऊन बुजवून टाकला. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांनी का सहन करायचा, असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला.

‘ईएसआयसी’ देणार रुग्णांना योग्य सुविधा

$
0
0
औद्योगिक वसाहतीतील कामगार रुग्णालयाकडून (ईएसआयसी) रुग्णांना योग्य सुविधा पुरविल्या जातील, असे आश्वासन ‘ईएसआयसी’च्या आयुक्त सीमा व्यास यांनी खासदार हेमंत गोडसे यांना दिले. तसेच अन्य मुद्यांबाबत गांभीर्याने लक्ष देणार असल्याचेही सांगितले.

ही वृक्षतोड विकासासाठीच?

$
0
0
आगामी सिंहस्थासाठी प्रस्तावित अनेक विकासकामांसाठी शहराच्या विविध भागात अनेक वृक्ष रडारवर आहेत. सिंहस्थ जवळ येवून ठेपला तरी विकासकामे होत नसल्याने काहीशी निराशा व्यक्त होत आहे.

श‌िक्षण संघर्ष या‌‌त्रा आज नाशकात

$
0
0
श‌िक्षणाचा अध‌िकार पुनर्स्थापित करण्यासाठी अख‌िल भारत श‌िक्षा अध‌िकार मंच या संघटनेच्या वतीने देशभरात संघर्षयात्रेला सुरुवात झाली आहे. मंगळवारी ही श‌िक्षण संघर्ष यात्रा संगमनेर परिसरातील बोटा, चंदनापुरी आण‌ि बोटा यामार्गे नाश‌िकनज‌िक पळसे येथे पोहचली.

सच, अॅन अपॉर्च्युनिटी!

$
0
0
सचिनचे आत्मचरित्र, अपेक्षेप्रमाणेच खूप गाजतेय, आत्मचरित्राच्या खपाचे रेकॉर्ड पण आता सचिनकडेच येणार आहे निश्चित! मात्र, दर्जेदार ‘क्लासिक्स’मध्ये गणले जाणारे आत्मचरित्र लिहिण्याची खूप छान संधी सचिनने गमावली असे मी म्हणेन.

चेहडीतील शेतकऱ्यांनी एकत्रित लढा द्यावा

$
0
0
प्रदुषणमुक्त रहावी यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लढा उभारावा, असे आवाहन शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीचे सल्लागार उन्मेष गायधनी यांनी केले.

फॉगिंग मशिन्स गेल्या कुठे?

$
0
0
महापालिकेकडे एकूण २० फॉगिंग मशिन्स असून २ माऊंड व्हेईकल आहेत. मात्र, सध्या फक्त चार फॉगिंग मशिनद्वारे धूर फवारणीचे काम सुरू आहेत. यातील काही काम सुरू होण्याआधीच बंद होतात.

‘सरचार्ज’मधून ७४ कोटींचा महसूल

$
0
0
महापालिका हद्दीत प्रॉपटी खरेदी-विक्रीवर जमा होणाऱ्या एक टक्का सरचार्जच्या माध्यमातून महापालिकेला १९ महिन्यात तब्बल ७४ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गत वर्षीच्या तुलनेत रिअल इस्टेटमध्ये थोडे चांगले चित्र निर्माण झाल्यामुळे या उत्पन्नात यंदा ०.८ टक्के वाढ झाल्याचे दिसते.

जिल्ह्यात २५० बालके अतिकुपोषित

$
0
0
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध उपाययोजना करूनही जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यामध्ये कुपोषणाच्या गंभीर अशा चौथ्या श्रेणीतील २५० बालके सर्वेक्षणात आढळून आली आहेत. तर तिसऱ्या श्रेणीतील बालकांची संख्याही चिंताजनक आहे.

सर्वोत्तम भाग‌िदारीसाठी हवी त्र‌िसूत्री

$
0
0
‘भारतीय हवाई दलाला स्वयंसिद्धता येण्यासाठी सर्वोत्तम भागीदाराची आवश्यकता आहे. ही भा‌िगदारी एकमेकांबद्दल आदर, विश्वास व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे.’ असे प्रतिपादन एअर मार्शल सुखचैनसिंग यांनी केले.

गंगापूर धरणाच्या सुरक्षिततेचे काय?

$
0
0
गंगापूर धरणाच्या ठिकाणी सी प्लेनसेवा प्रस्तावित असली तरी मातीचे धरण असलेल्या गंगापूरच्या सुरक्षिततेचे काय, असा सवाल जलसंपदाचे निवृत अधिकारी हरीश भंडारी यांनी उपस्थित केला आहे.

‘प्रेस’ला अपेक्षा आधुनिकीकरणाची

$
0
0
दर्जा आणि सेवा याबाबत संपूर्ण भारतात नावलौकिक मिळवून असलेल्या नाशिकरोडच्या प्रतिभूती आणि चलार्थ मुद्रणालयाला सरकारकडून अपेक्षा आहे ती आधुनिकीकरणाची, कच्चा माल वेळेत उपलब्ध होण्याची आणि न्याय्य कामगार धोरणाची.

आयुक्तांनी घेतला आढावा

$
0
0
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मंगळवारी बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा घेऊन रिंगरोडची पाहणी केली. सोमवारी हजर होणाऱ्या आयुक्तांनी लागलीच साधुग्रामची पाहणी करून कामाचा आढावा घेतला होता.

पिसाळलेल्या श्वानाचा धुमाकूळ

$
0
0
नवीन सिडको भागात संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक पिसाळलेल्या एका कुत्र्याने तब्बल १८ जणांपेक्षा अधिक व्यक्तिंना चावा घेऊन गंभीर जखमी केले. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. या भागात ‘श्वान’ दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images