Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नामकोच्या संचालकांना झटका

$
0
0
नामको बँक बरखास्तीच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला आव्हान देणारी संचालकाची याचिका मुबंई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. बँकेची कारवाई कायदेशीर ठरवत संचालकांची याचिका फेटाळल्याने तत्काल‌िन संचालकांना मोठा झटका बसला आहे.

एकास सहा TDRचा निर्णय फसणार?

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात साकारण्यात येणाऱ्या साधुग्रामसाठी भूसंपादन करण्याकरीता महासभेने जमीन मालकास एकास सहा टीडीआर देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयास कोणताही आधार नसल्याने राज्य सरकार पुन्हा महासभेचा प्रस्ताव विखंडीत करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

‘त्या’ शेतकऱ्याचा खूनच

$
0
0
इगतपुरी तालुक्यात खेडभैरव परिसरातील पडवळवाडी येथील आदिवासी शेतकरी बहिरू पांडू धादवड (वय ६२) यांचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

गंगापूर रोडला युवकाचा खून

$
0
0
गंगापूररोड परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरूणाची टोळक्याने हत्या केली. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. यानंतर मृत तरूणाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने गंगापूर रोडवरील ह‌िराबाग परिसरात तणावाचे वातावरण न‌िर्माण झाले होते.

कुंभ निधीचा फैसला लांबला

$
0
0
देशातील धार्मिक उत्सवांसंदर्भात यादी तसेच या उत्सवांना निधी देण्याचे निकष केंद्र सरकारकडून पुढील आठवड्यात जाहीर होणार आहेत. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील निधीचे चित्रही पुढील आठवड्यातच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

श्वानाचा सिडकोत १८ जणांना चावा

$
0
0
नवीन सिडको भागात पिसाळलेल्या कुत्र्याने मंगळवारी सायंकाळी १८ जणांना चावा घेतल्याचा प्रकार घडला. जखमींमध्ये मुख्यत्वेकरून लहान मुलांचा समावेश आहे. या प्रकारानंतर भटक्या कुत्र्यांची समस्या ऐरणीवर आली आहे.

फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0
अस्सल पैठणी खरेदी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी पैठणी विणकरांनी येवला तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विंचूरला भारनियमनाची वेळ बदला

$
0
0
निफाड तालुक्यात विंचूर परिसरात सकाळच्या सत्रात भारनियमन केले जाते. यामुळे महिलांबरोबरच शेतकऱ्यांनाही अडचणी येत आहेत. भारनियमनाची ही वेळ बदलून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सटाणा शहर भारनियमनमुक्त

$
0
0
सटाणा शहरातील वीज भारनियमन तातडीने बंद करण्याचे आदेश वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक अजय मेहेता यांनी देले आहेत. ही माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.

नवे सरकार भारनियमनमुक्ती देईल का?

$
0
0
ऐन रब्बी हंगामात होणारा कमी-अधिक दाबाचा वीजपुरवठा, रोहित्रातील बिघाड, क्षणाक्षणाला खंडित होणारा वीजपुरवठा अशा समस्यांनी त्रस्त झालेल्या पश्‍चिम आदिवासी पट्ट्यातील बोरदैवत, देवळी, बिलवाडी, जामले, चिंचपाडा, खिराड येथील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

बेशिस्त रिक्षाचालकांना आवरा !

$
0
0
सिडकोतील लेखानगर चौकात काही बेशिस्त रिक्षाचालक रस्त्यावरच रिक्षा थांबवत असल्याने वाहनधारक आणि पादचारी त्रस्त झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी या रिक्षाचालकांना समज देऊन त्यांना रिक्षा थांब्यासाठी योग्य जागा निर्देशित करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सिडकोतील नागरिक धास्तावले

$
0
0
जुने सिडको परिसरातील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटाने त्रस्त झाले आहेत. मंगळवारी १८ नागरिकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढविल्याच्या घटनेनंतरही महापालिकेने परिसरात कुत्र्यांना जेरबंद करण्यासाठी कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दोन तासानंतर वीजपुरवठा सुरळीत

$
0
0
कल्याणजवळील पडघा येथील विद्युत केंद्राच्या १३२ केव्ही लाईनमध्ये बिघाड झाल्याने मंगळवारी शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला तब्बल दोन तास लागले. मध्यरात्री सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला.

खेळाडूंची नोकरीसाठी फरफट

$
0
0
राज्यात खेळाला चांगले दिवस यावेत यासाठी सरकारतर्फे खेळाडूंसाठी विविध प्रकारच्या योजना आखल्या जातात. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे खेळाडूंना आपला चरितार्थ चालविण्यासाठी शासनाच्या विविध खात्यात नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातात.

कृषी पर्यटन; विकासाचा उत्तम पर्याय!

$
0
0
गेल्या २५ वर्षात शेतीत विज्ञान आणि श्रम यांच्या समन्वयाने नैसर्गिक साधनांचा उत्पादक वापर करीत खेड्याच्या विकासाची पर्यायी योजना कृषी पर्यटन असू शकते, याची मला खात्री पटली आहे.

मेळावे घेण्यापेक्षा दर्जेदार सेवा द्या

$
0
0
भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ग्राहकांना दर्जेदार सेवा दिली तर अशा प्रकारे ग्राहक जागरुकता मेळावा घेण्याची गरजच राहणार नाही, अशा स्पष्ट शब्दात ग्राहकांनी थेट बीएसएनएलच्या महाव्यवस्थापकांनाच सुनावले.

‘हायटेक’ चे स्वप्न अजूनही कित्येक मैल दूर

$
0
0
जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे. पाणी, अस्वच्छता, शेतकरी निवास सदन, ऑनलाइनचा अभाव, भावात असलेली तफावत, व्यापारी अन् शेतक-यांबरोबरच हमाल-मापारी यांचे प्रश्न सुटू शकलेली नाहीत.

वृक्षतोडीला स्थगिती कायम

$
0
0
आगामी सिंहस्थाच्या विकासकामांसाठी नाशिक शहरातील २४०० झाडांच्या तोडीला मुंबई हायकोर्टाने स्थगिती कायम ठेवली आहे. महापालिकेने अतिक्रमण आणि वन वे यांच्यासंदर्भातील माहिती कोर्टासमोर सादर करावी, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

रेडिरेकनरचे दर वाढवू नका

$
0
0
जमिनींचे सरकारी मूल्य (रेडिरेकनर) अवास्तवरित्या यंदा वाढविण्यात आल्याने अनेकांचे गृहस्वप्न भंगले आहे. त्यामुळे २०१५ या वर्षात रेडिरेकनरचे दर ‘जैसे थे’च ठेवावे, अशी आग्रहाची विनंती नाशकातील नवनिर्वाचित आमदार व क्रेडाई पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे. या प्रश्नी मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

समाजाने व‌िवेकाची उपासना करावी

$
0
0
‘खरे आण‌ि खोटे, चांगले आण‌ि वाईट यातील भेदाभेदाची जाणीव करून देणारा व‌िवेकवादच आज आधुन‌िक समाजाच्या वैचारिकतेतून नष्ट झाला आहे. तो पुन्हा प्राप्त करून समाजातील व‌िधायकतेची घडी स्थ‌िर राखण्यासाठी समाजाने व‌िवेकाची उपासना करावी’, असा उपदेश श्रुत‌िसागर आश्रमाचे आचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images