Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्थायीचा तिढा सुटता सुटेना!

$
0
0
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या रिक्त दोन जागासांठी बिनविरोध निवडणूक करण्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना यश येत नसल्याने दोन जागांसाठी निवडणूक आता अटळ मानली जात आहे.

बॅँकांच्या संपामुळे नागरिकांचे हाल

$
0
0
राष्ट्रीयीकृत बॅँकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांनी बुधवारी पुकारलेल्या एक दिवसीय संपामुळे नागरिकांचे हाल झाले. अनेकांना संपाची कल्पना नसल्याने बॅँकेच्या प्रवेशद्वारापासून माघारी फिरावे लागले.

महापालिकेलाच झालाय डेंग्यू

$
0
0
नाशिक शहरात एकीकडे डेंग्यूचा कहर सुरू असतानाच स्वच्छतेसह दैनंदिन गरजेची कामेही होत नसल्याने सदस्यांच्या संतापाचा बांध बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत फुटला.

शाळांच्या नफेखोरीला लगाम घाला

$
0
0
‘भांडवलदारांकडून चालव‌िल्या जाणाऱ्या शाळा अत्यंत चाणाक्षपणे श‌िक्षणासारख्या सामाज‌िक क्षेत्रातही प्रचंड नफेखोरी करतात आण‌ि मुलांच्या श‌िक्षणाच्या हक्कावर गदा आणतात, या स्थ‌ितीला रोख लावण्यासाठी शाळांच्या मनमानीपणे केल्या जाणाऱ्या नफेखोरीला संघटीतपणे पालकांनीच लगाम घालावा,’ असा सूर श‌िक्षण संघर्ष यात्रेतील परिसंवादांमधून प्रकटला.

दरवर्षी होणार कृषी प्रदर्शन

$
0
0
मीडिया एक्झ‌िबीटर्स आणि ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दर दोन वर्षांनी होणारे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येत होते. आता तेच प्रदर्शन दरवर्षी होणार असून त्यासंदर्भात पुढील वर्षी होणाऱ्या प्रदर्शनासाठी विदेशातील काही कंपन्यांनी अॅडव्हान्स बुकिंग केली असल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

सिंहस्थात चिन्हांचे दिशादर्शक

$
0
0
सिंहस्थ काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरांतर्गत भागात ठिकठिकाणी लावण्यात येणारे दिशादर्शक हे ठराविक भाषेत लावण्याऐवजी ते चिन्हांच्या स्वरुपात लावण्याचे निश्चित झाले आहे. तसेच, परजिल्ह्यासह परराज्यातून येणाऱ्या एसटी बसेसचे सर्वंकष नियोजन करण्याचेही ठरविण्यात आले आहे.

तिसऱ्या दिवशीही आयुक्त ऑनफिल्ड

$
0
0
नाशिक महापालिकेच्या विविध विकासकामांचा फिल्डवर जावून आढावा घेण्याचा धडाका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवला आहे. बुधवारी आयुक्तांनी रविवार कारंजा, रामकुंड, इंद्रकुंड, पंचवटी, तपोवन, औरंगाबाद रोड, टाळकुटेश्वर मंदिर, टाकळी रोड परिसरात जावून पालिकेच्या सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली.

सात बाजार समित्यांवर प्रशासक

$
0
0
मुदत सपूंनही सहकार मंत्र्यांकडून मुदतवाढ घेवून राजकारण करणाऱ्या जिल्ह्यातील नऊपैकी सात बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला जिल्हा उपनिबंधकांनी बरखास्तीचा झटका दिला आहे.

चर्चा तर होणारच...

$
0
0
संपूर्ण निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली. अगदी उमेदवारी जाहीर होण्यापासून ते निकाल लागेपर्यंत सोशल मीडिया अॅक्टिव्ह होता. या सगळ्या प्रक्रियेत महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे सोशल मीडियावर फिरणारे जोक्स. राजकीय वातावरणातील प्रत्येक घडामोडीवर इथे एक से बढकर एक विनोद तयार होत राहिले आणि होत आहेत.

नदीत बुडून मायलेकराचा मृत्यू

$
0
0
येवला तालुक्यातील अंदरसुल येथील मन्याड नदीत बुडून आई आणि तिच्या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हे दोघेही मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेले होते. मुलगा पाय घसरून पाण्यात पडल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी आईने नदीत उडी घेतली. पण नदीने दोघांनाही कवेत घेतले.

एलईडी उडणार?

$
0
0
नाशिक महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या एलईडी प्रकल्पाचे काम ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे सध्या थंड बस्त्यात पडले आहे. सहा महिन्यांत ६९ हजार एलईडी दिवे बसविण्याचे उद्दिष्ट असताना गेल्या चार महिन्यांत शहरात केवळ तीन हजार एलईडी दाखल झाले असून, त्यापैकी केवळ ७० दिवे लावण्यात आले आहेत.

त्रिकुटांचा मेरूमणी

$
0
0
दक्षिणोत्तर पसरलेला माहुली तसा तीन किल्ले मिळून तयार झाला आहे. उजवीकडे म्हणजे उत्तरेकडे पळसगड किंवा छोटा माहुली तर डावीकडे म्हणजे दक्षिणेकडे चंदेरी म्हणजेच भंडारदुर्ग न मध्ये अफाट जंगलवेडा माहुली!

एक झोका…हजार फुटांवर!

एसएमएस स्पर्धेचे विजेते जाहीर

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित एसएमएस करा आणि जिंका कॉन्टेस्टचे निकाल जाहीर झाले असून या स्पर्धेतील विजेत्यांना ‘कळत नकळत’ या नाटकाचे फ्री पासेस बक्षीस मिळणार आहे.

'रेनमेकर' अंतिम फेरीत

$
0
0
स्व.श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ 'उंबरठा' या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका प्राथमिक स्पर्धेत नाशिक विभागातून अश्वमेध थिएटरची 'रेनमेकर' ही एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाली आहे.

बना शशांकचे फॅन नंबर वन

$
0
0
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला ‘श्री’ म्हणजेच अभिनेता शशांक केतकर याला भेटण्याची आणि गप्पा मारण्याची संधी त्याच्या फॅन्सना मिळणार आहे.

हरपलेले छत्र पुन्हा गवसले

$
0
0
खेळण्या बागडण्याच्या वयात पालकांचा हात हातातून निसटला तो कायमचाच. आई बाबा जिवंत आहेत की नाही त्यांना माहीत नाही. ते छत्र त्यांनी गमावले परंतू रक्ताचे नाते नसले तरी प्रेम देणारे आई, बाबा, भाऊ, बहीण अशी कितीतरी नात्यांचा मायेचा ओलावा त्यांना मिळाला.

चिमुरड्यांसाठी इन्फर्मेटव्ह अॅप्स

$
0
0
हल्ली घराघरात लहानग्यांच्या हातात आई-बाबांचे फोन आपल्याला दिसतात. ‘काय करतोय विचारले’ तर 'गेम खेळतोय' असे उत्तर आपल्या कानावर अनेकदा येते. त्यामुळेच आता मोबाइल यांच्या हातात द्यावा की नाही हा मोठा प्रश्न पालकांना पडतो.

दिंडोरीतही वनराई बंधारे

$
0
0
वसुंधरा संस्थेच्या पर्यावरण विभागातर्फे दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक परिसरात ग्रामपालिका व ग्रामस्थ यांच्या एकत्रित श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

ज्ञानेश्वर महाराज सोहळा

$
0
0
येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी उत्सव समितीतर्फे १४ ते २० नोब्हेंबरदरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी उत्सव सोहळा होणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images