Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राजेश टोपेंकडून प्राध्यापकांची दिशाभूल

$
0
0
प्राध्यापक संघटनेसोबत १८ मार्चला बैठक करण्याचे आश्वासन देणाऱ्या उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपेंनी प्राध्यापकांची दिशाभूल केल्याचा आरोप 'पुक्टो'च्या नाशिक जिल्हा ‌शाखेमार्फत करण्यात आला आहे.

स्थायीच्या नियुक्त्या २८ मार्चला

$
0
0
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक १ मार्चपर्यंत होणे आवश्यक असताना ही निवडणूक घेण्यास महापौर टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप स्थायी समितीचे माजी सभापती संजय चव्हाण यांनी केला होता.

नावाला मोठी, कारवाई खोटी

$
0
0
केबल चालकांनी दिलेल्या ग्राहक संख्येच्या पडताळणीसाठी करमणूक कर विभागाने हाती घेतलेल्या मोहिमांचा वरवर मोठा गाजावाजा केला जात असला तरीही, कारवाई मात्र खोटीच असल्याचे उघडकीस आले आहे. करमणूक कर विभागाने छुपे कनेक्शन शोधून काढत गेल्या वर्षभरात शहरातील ३३ केबल ऑपरेटरविरुद्ध कारवाई केली होती, असे असतानाही विभागाच्या नोंदीत मात्र एकाही कनेक्शनची भर पडली नाही.

महंताना विश्वासात घेऊनच निर्णय

$
0
0
कुंभमेळ्याचे नियोजन करताना सर्व साधू महंत आणि पुरोहित संघाला विश्वासात घेऊनच पोलिस आपल्या योजना राबवतील, असे आश्वासन पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी दिले. पुरोहित संघाच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी आयो​जित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

महापौरांचा प्रतिहल्ला

$
0
0
मनसेचे नेते अतुल चांडक यांनी यापूर्वीच आयुक्तांना पत्र देत आपल्या जागेत मलनि:सारण केंद्र (एसटीपी) बांधण्यास हरकत नाही, असे कळविले होते. त्यामुळे दिनकर पाटील यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगतानाच महापौर अॅड. यतीन वाघ यांनी पाटील यांच्या हेतूवरच पुन्हा एकदा शंका घेतली.

'क्रशर'कडून १ कोटी दंडवसुली

$
0
0
नाशिक तालुक्यातील ७० पैकी १६ क्रशरने जिल्हा प्रशासनाकडे तब्बल १ कोटी ८ लाख रुपये दंड भरला असून, त्यामुळे तयार झालेली खडी बाजारात विकण्याचा मार्ग खुला झाला आहे. जिल्ह्यातील क्रशर्स सील केल्यापासून त्याचा बांधकाम क्षेत्रावर थेट परिणाम झाला आहे.

शेतक-यांकडून कर्ज वसुली थांबवा

$
0
0
राज्यभरात पडलेल्या दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी व चाराटंचाई निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्येही पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई भासते आहे.

नसलेला घोटाळा

$
0
0
पतसंस्थेच्या कामात व्यस्त असलेल्या एका तरुणाचा मोबाईल वाजतो आणि तो बोलायला सुरुवात करतो. नंबर अनोळखी असला तरीही, समोरचा व्यक्ती याला थेट नावाने ओळखत असल्याने त्याच्या परिचयात न जाता थेट संवाद सुरू होतो.

सिडको परिसरात डासांचे साम्राज्य

$
0
0
सिडको परिसरात सध्या डासांचे साम्राज्य पसरले असून या भागात गेल्या वर्षभरापासून धुराळणीच झाली नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. डासांच्या भितीमुळे सायंकाळी सातनंतर घराबाहेर पडणेही मुश्किल झाले असून आठवड्यातून एकदा का होईना धुराळणी करावी अशी मागणी होत आहे.

सारडा सर्कलचीच कोंडी

$
0
0
औरंगाबादकडून व्दारकामार्गे शहरात येताना सारडा सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते आहे. सारडा सर्कल ते दूधबाजार या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा विषय वर्षानुवर्ष डोकेदुखी ठरला आहे.

'इको टुरिझम'च्या वाटा मोकळ्या करणार

$
0
0
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अभयारण्यांवर नियंत्रण असणाऱ्या नाशिक वन्यजीव विभागाच्या अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी अनिल मोहन यांची नुकतीच नियुक्ती झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त होते.

इंजिनिअरींगच्या निकालाने विद्यार्थ्यांना दिलासा

$
0
0
तब्बल अडीच महिन्यांपासून विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अडकलेला इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाचा (एसई) निकाल अखेर १९ फेब्रुवारीला (मंगळवारी) संध्याकाळी विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आला आहे.

यंदाच्या रंगपंचमीला द्या माणुसकीचा रंग

$
0
0
राज्यात दुष्काळाची​ परिस्थिती असल्याने नाशिककरांनी धूलीवंदन आणि रंगपंचमीला पाण्याचा वापर करू नये, आम्ही पाण्याचा अपव्यय करणार नाही, असा निर्धार नाशिकरोड परिसरातील तरुण मंडळांनी केला आहे.

पाण्यासाठी महिला आक्रमक

$
0
0
सातपूर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पाणीच न आल्याने महिलांना आक्रमक व्हावे लागले. तर गंगापूर रोडवरील पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिकांना आज ड्राय डे अनुभवला तर याच भागातील डी. के. नगर परिसरात गढूळ पाणी आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

बागलाण क्रीडा संकुल लवकरच

$
0
0
बागलाण तालुका क्रीडा संकुलासाठी २०१२-१३ या आर्थिक वर्षात सुमारे एक कोटीचा निधी क्रीडा विभागाकडे वर्ग झाला आहे. त्यासाठी नामपूर ग्रामपंचायतीने जागाही उपलब्ध करून दिल्यामुळे क्रीडा संकुलाची मागणी पूर्णत्वास जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

बागलाणमधील ११ गावांना तंटामुक्त पुरस्कार

$
0
0
बागलाण तालुक्यातील ११ गावांना तंटामुक्त पुरस्कार जाहीर झाला आहे. सटाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी झालेल्या १४पैकी ४ गावे तंटामुक्त झाली. जिल्हा पोलिस प्रमुख प्रवीण कुमार पडवळ यांच्या हस्ते विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

५० लाख रोपांना उन्हाची धग

$
0
0
नाशिक जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यामध्ये १ कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दीष्ट होते. पण, पावसाची साथ न मिळाल्याने ही लागवड निम्मीच झाल्याने वनविकास महामंडळाने तयार केलेली तब्बल ५० लाख रोपे सध्या उन्हाचा तडाखा सहन करीत आहेत. आता या रोपांची लागवड येत्या पावसाळ्यात करण्यात येणार आहे.

'बीसीएल'मध्ये युनियन बदल

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील बी.सी.एल. फोर्जिंग कंपनी सुरू करण्यासाठी कामगारांनी चाँदबीबी झैदी यांचे नेतृत्व झिडकारून महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे यांचा हात धरला आहे.

सभापतीपदाचा निर्णय आज

$
0
0
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल हायकोर्टाच्या आदेशाने निवडणूक निर्णय अधिकारी पी. जी. देवरे गुरुवारी सकाळी ११ वाजता घोषित करणार आहेत.

डी के नगरात सापडले अनधिकृत कनेक्शन्स

$
0
0
गंगापूर रोडवरील डी. के. नगरातील एका नव्याने बांधलेल्या इमारतीत बिल्डरने परस्पर अनधिकृत नळ कनेक्शन्स घेतल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी पोहोचत हे सर्व कनेक्शन बंद केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images