Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शेतकऱ्यांमागे अवकाळी साडेसाती

$
0
0
नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पाऊस आणि अचानक बदलेल्या हवामानामुळे जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब या फळपिकांसह कांदा, टोमॅटो व भातपिकाचे सुमारे पन्नास टक्के नुकसान झाले आहे.

पाचशे लेटलतिफांवर कारवाई

$
0
0
पदभार स्विकारल्यानंतर महापालिकेतील कामांची माह‌तिी घेण्यासह शहराचा दौरा केल्यानंतर नवनियुक्त आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपला मोर्चा पालिकेतील कामचुकार अधिकारी व कर्माचाऱ्यांकडे वळवला आहे.

‘त्यांच्या’ कर्तृत्वाला सलाम

$
0
0
देशावर बाका प्रसंग ओढवलाय…, परकीय सेनेने घुसखोरी केली आहे... त्यांना चारही मुंड्या चित करण्यासाठी हेलिकॉप्टर्स, पॅराशूटमधून सैनिक उतरतात. शत्रूच्या छावण्यांवर तुटून पडतात अन् भारत मातेचा जयघोष करीत तेथे अभिमानाने भारताचा झेंडा रोवतात.

पिकांचे दोनशे कोटींचे नुकसान

$
0
0
नाशिक जिल्ह्यात शनिवारी, सलग तिसऱ्या दिवशी पडलेला अवकाळी पाऊस आणि बदलेल्या हवामानामुळे द्राक्ष, डाळिंब या फळपिकांसह कांदा, टोमॅटो व भातपिकाचे सुमारे ५० टक्के नुकसान झाले आहे. हे नुकसान सुमारे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांच्या वर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आनंदवल्लीत साडीवाटप

$
0
0
आनंदवल्ली गावातील प्रसिद्ध असलेल्या नवश्या गणपती ट्रस्टच्या वतीने परिसरातील गरजू महिलांना साडींचे वाटप करण्यात आले. सामाजिक भावनेतून असे अनेक उपक्रम हाती घेतल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव यांनी याप्रसंगी सांगितले.

औद्योगिक वसाहतीतही होणार स्वच्छता अभियान

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे आवाहन केल्यानंतर नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातही हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उद्योजकांना आवाहन केले असून येत्या काही दिवसातच औद्योगिक क्षेत्रात हे अभियान जोरदारपणे राबविली जाण्याची शक्यता आहे.

बालगोपाळांचेही स्वच्छ अभियान

$
0
0
अशोक स्तंभाजवळील बालाजी विहार सोसायटीतील बालगोपाळांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. रविवारच्या सुटीच्या दिवशी स्वच्छता राबवून बालगोपाळांनी आगळा वेगळा आनंद घेतला.

स्वच्छ नाशिक उपक्रम

$
0
0
सनविवि फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त ‘स्वच्छ व निरोगी नाशिक’ या उपक्रमाला शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुरुवात करण्यात आली.

पिसाळलेल्या कुत्र्याचा पाच जणांना चावा

$
0
0
पिसाळलेल्या श्वानाने सातपूर कॉलनीत पाच जणांना चावा घेतल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी परिसरातील संतापलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पिसाळलेल्या कुत्र्याचा पाठलाग करत त्याला ठार केले.

शिवनेरी गार्डनमध्ये साफसफाई

$
0
0
नवीन नाशिकमधील रायगड चौकातील महापालिकेच्या शिवनेरी गार्डेनमध्ये एकनिष्ठ फाउंडेशन यांच्यातर्फे रविवारी धूर फवारणी आणि साफसफाई माहीम राबविण्यात आली. स्थानिक तरुणांनी हातात झाडू घेत उद्यानातील सर्व कचरा गोळा केळा आणि त्याची विल्हेवाट लावली.

महिन्यातून ३० वेळा सातपूरला पाणीगळती

$
0
0
सातपूर भागात जवळपास सर्वच भागात पिण्याचे पाणी नागरिकांना वेळेवर मिळत आहे. परंतु महिन्यातून तब्बल ३० वेळा जलवाहिनींकडून पाण्याची गळती होत असल्याचे प्रकार घडत आहेत.

सीपीसाहेब, जरा दमानं...

$
0
0
पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी गत आठवड्यात उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील पोलिस चांगलेच धास्तावले आहेत.

उच्च शिक्षणातील प्रकाश वाटा : कम्युनिटी कॉलेज

$
0
0
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशात ९८ कम्युनिटी कॉलेजेस उघडण्यासाठी देशातील विद्यापीठांना २०१४-१५ पासून परवानगी दिली आहे. कौशल्यावर आधारित असे ६ महिने ते २ वर्षापर्यंतचे अभ्यासक्रम या कॉलेजेसमध्ये चालविता येतील.

`स्वच्छ भारत`साठी नाशिककरांचा पुढाकार

$
0
0
स्वच्छता अभियानाच्या जनजागृतीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित नाशिक गोवा सायकल रॅलीला रविवारी सकाळी पाथर्डी फाटा येथून झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

विसातर्फे महिलांसाठी रॅली

$
0
0
वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने (विसा) खास महिलांसाठी यॉर्क वुमेन्स रॅली २०१४ चे आयोजन केले असून, ही रॅली दुचाकी आणि चारचाकी या विभाग होणार आहे.

संदीप फाऊंडेशनमध्ये आजपासून कार्यशाळा

$
0
0
संदीप फाऊंडेशनमधील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन शाखेच्यावतीने आजपासून २४ नोव्हेंबरपर्यंत 'रिसर्च मेथडॉलॉजी आणि `आय. पी. आर' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्याचा पीकपाणी अहवाल सादर करा

$
0
0
मराठवाड्यात एकीकडे पडलेला दुष्काळ आणि दुसरीकडे राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पीक आणि पाण्याच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शिक्षण संघर्ष यात्रेची भेट

$
0
0
बेघर वस्तीतील मुलांसाठी चालव‌ण्यिात येणारी पण, पुरेशा मदतीश‌विायही आदर्श ठरलेल्या कसबे सुकेण्यातील ज‌ल्हिा परिषद शाळेला शन‌विारी श‌क्षिण संघर्ष यात्रेने भेट द‌िले.

फ्लेमिंगोसाठी सी प्लेन तारक की मारक?

$
0
0
गंगापूर धरणाच्या ठिकाणी सी प्लेन सेवेची चाचणी नुकतीच घेण्यात आली. मात्र, याच धरणाच्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगोंचा वावर असतो. विशेष म्हणजे, हे फ्लेमिंगो दूरदेशीचे आणि स्थलांतराच्या प्रवासात नाशिक हा त्यांचा मुक्काम असल्याने फ्लेमिंगो हे नाशिकचे पाहुणेच आहेत.

लेखी परीक्षेला ७५८ जणांची दांडी

$
0
0
वन विभागाच्यावतीने २१ जागांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेला ७५८ उमेदवारांनी दांडी मारली. त्यामुळे एकूण २४०४ उमेदवारांपैकी १६४६ उमेदवारच परीक्षेला हजर होते. वनभरतीच्या लेखी परीक्षेत पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गस्त होती.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images