Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रावळगावचे बॉयलर पुन्हा पेटणार कधी?

$
0
0
मालेगाव तालुक्यातील गिसाका (आर्मस्ट्राँग) कारखान्याची गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असताना तालुक्यातील दुसरा रावळगाव खासगी साखर कारखाना मात्र गेल्या तीन वर्षापासून बंद अवस्थेत आहे. या वर्षीदेखील गळीत हंगामात कारखान्याचा बॉयलर प्रज्वलित होण्याची शक्यता कमीच आहे.

वसाकाची चाके अडकली कर्जाच्या फेऱ्यात

$
0
0
तत्कालीन चेअरमन डॉ. जे. डी. पवार यांच्या हातून झालेल्या अयशस्वी शस्त्रक्रियेमुळे विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचा ऑक्सिजन पूर्णत: बंद पडल्याने कारखाना निपचित पडला आहे.

मालेगावची सिनेमागृहे झाली हायटेक

$
0
0
मालेगावात करमणुकीची साधनं कोणती? अशा प्रश्न जर मालेगावात कोणी विचारला तर त्याला पटकन उत्तर मिळेल ते म्हणजे चित्रपटगृह! सुमारे पन्नास वर्षांपूर्वीही करमणुकीच्या बाबतीत ही परिस्थिती होती अन् आजही कायम आहे.

येवला ग्रामीण रुग्णालयातील सेवा सुरळीत

$
0
0
शहरातील बहुचर्चित ग्रामीण रुग्णालयातील असुविधांबाबत रुग्ण कल्याण समितीनेच लक्ष घातल्याने अखेर रुग्णांना सुरळीत व सुलभ सेवा मिळू लागली आहे. विशेष म्हणजे केवळ वायर जळाल्याने बंद पडलेले एक्स-रे मशिन देखील आता सुरळीत सुरू झाले आहे.

नागरिकांना रस्त्यांची प्रतीक्षा

$
0
0
म्हाडाच्या कॉलनीतील वीस हजार स्किमच्या लोकवस्तीतील खोदलेले रस्ते पुन्हा नव्याने कधी दुरुस्त केले जाणार याची स्थानिक रहिवाशांना प्रतीक्षा लागली आहे. महापालिकेने गेल्या वर्षी सांडपाण्याची लाईन टाकण्यासाठी या कॉलनीतील रस्ते खोदून ठेवले.

अतिक्रमण हटविण्याबाबत स्थानिक गावकरी आग्रही

$
0
0
‘लांडगा आला रे आला’ या मराठीतील म्हणीप्रमाणे सातपूर गावातील अतिक्रमणधारक व्यावसायिक सध्या धास्तावलेल्या मनस्थितीत आहे. दोन दिवसांपासून ते व्यवसाय करण्यासाठी येतात, मात्र विक्रीचे साहित्य झाकूनच उभे राहतात.

बांधकाम विभागाच्या भांडाराला ठोकले टाळे

$
0
0
नविन नाशिक, सिडकोतील आरोग्याच्या प्रश्नाबाबत बांधकाम विभागातील भांडाराचे कर्मचारी कामच एकत नसल्याचा आरोप करीत नगरसेविका रत्नमाला राणे व डी. जी. सूर्यवंशी यांनी दिव्या अॅड लॅबसमोरील बांधकाम विभागाच्या भांडाराला गुरुवारी टाळे ठोकले.

दहशतवाद्यांविरुद्ध पोलिसांचा कृती आराखडा

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिकमध्ये दहशतवादी हल्ल्यासारखी घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. दहशतवादी कारवायांच्या बिमोडात अग्रणी भूमिका बजावणाऱ्या फोर्स वनच्या अधिकाऱ्यांना या प्लॅनची माहिती देण्यात आली.

भ्रष्टाचार रोखण्यासह विकास करून दाखवा

$
0
0
काँग्रेसचा पांरपारिक मतदार असलेल्या राज्यातील आदिवासींनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीशी उभे राहून विकासाच्या मुद्याला मत दिले आहे. त्यामुळे आदिवासी विभागातील बोकाळेला भ्रष्टाचार कमी करण्यासह योजना सर्वसामान्य आदिवासींपर्यंत पोहचवाव्यात, अशी अपेक्षा नव्या सरकारकडून व्यक्त केल्या आहे.

‘थँक यू डे’ निमित्त महाराष्ट्र टाइम्सतर्फे स्पर्धा

$
0
0
कोणीतरी कधीतरी आपल्या जगण्याचा मार्ग सुकर करतं. ती मदत, तो मदतीचा हात त्यांच्या दृष्टीने छोटा असतो कदाचित; पण आपल्या दृष्टीनं त्या वेळी तो खूप मौल्यवान असतो. नेमकं त्यावेळी त्यांचे आभार मानणं राहून जातं. आभार मानायचे असतील, तर खास त्यांच्यासाठीचा दिवस म्हणजे ‘थँक यू डे’.

‘द वेव्हज्’ गृहप्रकल्पाचा शुभारंभ

$
0
0
नव्याने झपाट्याने विकसित होत असलेल्या पाथर्डी परिसरात नाशिकच्या वैभवात भर पडेल असा प्रकल्प साकारत असून ग्राहकांना उत्तम जीवनशैली निर्माण करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत जिग्नेश्वर कन्स्ट्रक्शनचे संचालक प्रवीण जैन यांनी व्यक्त केले.

सोनोग्राफी केंद्रांची विशेष तपासणी

$
0
0
जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची आगामी दोन दिवस तपासणीची विशेष मोहिम राबवावी, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सायंकाळी बैठक झाली. त्यामुळे अवैध काम करणाऱ्या केंद्रांचा भांडाफोडही यानिमित्ताने होण्याची शक्यता आहे.

साधुग्रामसाठी ७ एकर जागा अधिग्रहीत

$
0
0
तपोवनात प्रस्तावित असलेल्या साधिग्रामच्या जागेचे अधिग्रहण करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. यासंदर्भात प्रशासनाने नोटिसा बजावल्यानंतर आता ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी सात एकर जागेचा ताबा प्रशासनाने घेतला आहे.

कर्मचाऱ्यांसाठी आता अच्छे दिन!

$
0
0
महापालिका सेवेत १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासाठी ६८ विभागातील कर्मचाऱ्यांचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्यासंबंधीचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी प्रशासनाला दिले.

अतिक्रमणधारकांची दगडफेक

$
0
0
म्हसरूळ परिसरातील बोरगड येथील महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या दीडशे ते दोनशे झोपड्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी हट‌व‌िल्या. यावेळी संतप्त जमावाने अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

शहरावर डेंग्यूचे संकट जैसे थे

$
0
0
महापालिका हद्दीतील १०५ घरांमधील १६९ भांड्यामध्ये डेंग्यू आजाराच्या फैलावास कारणीभूत ठरलेल्या डासांच्या अळ्या आढळून आल्या असल्याची बाब समोर आली आहे. वैद्यकीय विभागाने गत सप्ताहात केलेल्या सर्व्हेक्षणात डेंग्यूचा फैलाव जोमाने होत असल्याचेही दिसून येते.

सामाजिक आशयघन ‘दंगल’

$
0
0
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ५४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये गुरुवारी शिरीष जोशी ‌लिखित व संदेश सावंत, मिलिंद मेधणे दिग्दर्शित ‘दंगल’ हे नाटक सादर झाले.

डेंग्यू आता विशेष महासभेत!

$
0
0
आयुक्त आणि आरोग्य अधिकारी हजर नसल्याचे सांगत गुरूवारी महासभेत सादर झालेल्या डेंग्यूवरील लक्षवेधीवर कोणतीही चर्चा झाली नाही. विरोधी पक्षाने याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र विशेष महासभेचे आयोजन करण्याचे आश्वासन देत महापौर अशोक मुर्तडक यांनी हा विषय गुंडाळून टाकला.

हस्तकारागिरी!

$
0
0
संबलपूरची साडी, कोल्हापुरी चप्पल, बांबूपासून बनवलेलं सुप आणि यासारख्या परंपरेतून आलेल्या आणि हाताने बनवलेल्या काही वस्तू आपण वापरत असतो, आपल्याला त्या माहीत असतात. पण काही प्रश्न आपण कधीच विचारात नाहीत. आज आपण ते विचारायचे. या वस्तू आपल्याला काय सांगतात ते ऐकायचं चालेल ना?

पंचवटीच्या प्रवाशांसोबत खासदार गोडसेंचा प्रवास

$
0
0
नाशिककर चाकरमान्याची गाडी म्हणून ओळख असलेल्या पंचवटी एक्सप्रेसच्या प्रवाशांच्या समस्यांची खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईपर्यंत प्रवास करून दखल घेतली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images