Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

`स्थानिक समितीसमोर पीक कापणी प्रयोग करावेत`

0
0
पीक कापणी प्रयोगाचा दर्जा वाढविण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक डॉ. कैलास मोते यांनी मुळेगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथील भात पीकाचे सर्वक्षण केले. पीक कापणी प्रयोग गाव पातळीवरील समितीसमोर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तरीही ट्रॅफिक जामच ना!

0
0
नाशिक शहराचा झालेला विस्तार लक्षात घेता वाहतूक समस्या सोडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आणि नाशिक महापालिका यांनी संयुक्तपणे राबवलेला प्रकल्प म्हणजे नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण व उड्डाणपूल.

आधी रुंदीकरण; मगच काँक्रिटीकरण

0
0
महापालिकेने रविवार पेठेचे काँक्रिटीकरण सुरू केले आहे, ते त्वरित थांबविण्यात यावे. या रस्त्याचे आधी रुंदीकरण त्यानंतर काँक्रिटीकरण करण्यात यावे.

उघडा नाला ठरतोय धोकादायक

0
0
प्रभाग क्रमांक तीनमधील सरस्वती नगर परिसरात उघड्या नाल्यामुळे विविध समस्यांना आमंत्रण मिळत आहेत. हायवेलगत असलेला हा नाला नागरिकांसाठी धोकादायक ठरतोय. प्रमोद महाजन उद्यानातून जाणारा हा नाला पुढे के. के. वाघ कॉलेजसोमर उघडाच असल्याने विद्यार्थ्यांना जीव मूठीत धरून जावे लागते.

गळीत हंगामास सुरुवात

0
0
नाशिक जिल्ह्यातील सहकारी तत्वावरील एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याचे ३८ व्या गळीत जोरात सुरू होवून पूर्ण क्षमतेने गाळप सुरू झाले आहे. कर्जाच्या खाईतून बाहेर पडत कादवा आज उत्तमपणे सुरू आहे.

व्दारकाधीश वीज निर्मितीतही पुढे

0
0
बागलाण तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या पंधराव्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. बालगाण तालुक्यातील हा एकमेव खासगी कारखाना आहे.

पहिल्या हंगामासाठी केजीएस सज्ज

0
0
ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांच्या अथक परिश्रमातून निफाड तालुक्यात कादवा-गोदा कारखाना (केजीएस) कार्यरत झाला आहे. कादवा-गोदा शूगर अॅण्ड इन्फ्रो कार्पोरेशन लि. नावाने नोदंणी झालेला साखर कारखाना आपल्या पहिल्याच गळीत हंगामास सामोरा जात आहे.

रानवडला मिळाली खासगी करारातून ऊर्जा

0
0
साखर कारखानदारीतून परिसरासह शेतकरी, कामगार, ऊसतोडणी कामगार व अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना समृध्दी व प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या साखर उद्योगाचा ऊस गाळप हंगाम लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

गिरणाच्या चाकांना आर्मस्ट्राँगचे बळ

0
0
सन १९९२-९३ चा गळीत हंगाम कसाबसा पूर्ण करून गिसाकाची चाके जी थंडावली ती कायमचीच. सन २०१० पर्यंत कारखाना आणि कामगार हा विषय राजकीय क्षितिजावर अनेक कारणांनी चर्चेत राहिला.

त्र्यंबकला व्यावसायिकांनी स्वतःहून काढले अतिक्रमण

0
0
त्र्यंबक येथील अतिक्रमणाची नोटीस बजावलेल्या व्यावसायिक गाळेधारकांशी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी सुसंवाद साधल्याने व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले.

कोट्यवधींची उलाढाल ठप्प

0
0
लासलगाव बाजार समितीतील स्थानिक व्यापारी असोसिएशनचा सभासद नसलेल्या व्यापाऱ्याने लिलावात बोली लावल्याने लिलाव प्रक्रिया बंद होण्याचा तिढा शुक्रवारीही झालेल्या बैठकीतही सुटू शकला नाही.

त्र्यंबकमध्ये सिंहस्थ कामांना मिळणार गती

0
0
त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या कामांना वेग आला असून, रिंगरोडसह सर्वच रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. प्रातांधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या कामांसह वाहनतळ, साधुग्राम तसेच पोलिस कर्मचारी तात्पुरत्या निवासस्थानांच्या नियोजनाबाबत माहिती दिली.

महिलेला साडेचार लाखांचा गंडा

0
0
तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्यात येत आहे, असे सांगत बँक अकाऊंट आणि एटीएमची माहिती घेऊन एका महिलेला तब्बल साडेचार लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उपनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

एका दिवसात १९ कोटींचा महसूल जमा

0
0
स्थानिक संस्था कराला (एलबीटी) सक्षम पर्याय मिळेपर्यंत व्यापाऱ्यांना एलबीटी महसूल जमा करावाच लागणार, असे चित्र निर्माण होत आहे. त्यातच एलबीटी वसुलीसाठी महापालिका प्रशासन आक्रमक झाले असून, नोटिसा पाठवलेल्या व्यापारी उद्योजकांकडून दंडाची रक्कम वसूल करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे.

भाजपच्या मानगुटीवर बसून राज्याचा विकास करणार

0
0
राज्यात शिवसेना यापुढे सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असून, सरकार कमी पडेल तिथे शिवसेना भाजपच्या मानगुटीवर बसून राज्याचा विकास करेल. युतीसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे की, बंद हे भाजप नेत्यांनीच पहावे, असा टोला हाणत महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी शिवसेनेला सबुरीचा सल्ला देण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरीक्षण करावे.

पुणे विद्यापीठच करतेय पेपरफुटीत दिशाभूल

0
0
काही द‌िवसांपूर्वी शहरातील अभ‌ियांत्र‌िकी शाखेच्या व‌िद्यार्थ्यांच्या मोबाईल व्हॉटसअॅप या सोशल मी‌ड‌िया माध्यमातून प्रसा‌रीत झालेली प्रश्नपत्रिका व परीक्षेत विचारलेली प्रश्नपत्रिका वेगवेगळी असल्याचा साव‌ित्रीबाई फुले पुणे व‌िद्यापीठाचा दावा आहे.

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना पुन्हा ओव्हरलॅपचा ताप

0
0
साव‌ित्रीबाई फुले पुणे व‌िद्यापीठाची एम. कॉम सेम‌िस्टर आण‌ि द‌ी इन्स्ट‌िट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट ऑफ इंड‌िया यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आयसीडब्ल्यूए या अभ्यासक्रमाची परीक्षा यंदाही ओव्हरलॅप होत आहे.

महापालिकेतून BSNL लवकरच ‘नॉटरिचेबल’

0
0
महापालिका आयुक्तांपासून इतर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे असलेल्या महापालिकेच्या मोबाइलसाठी बीएसएनएलची सेवा खंडित करून आयडिया किंवा व्होडाफोन यापैकी एका दूरसंचार कंपनीची सेवा घेण्यात येणार आहे.

वर्क ऑर्डर निघाल्या, पण पैसा कुठंय?

0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित ६६९ कोटी रुपयांची एकूण ४६ कामे सुरू करण्यात आली आहेत. पण, निधीची वानवा असल्याने त्यांना गती देताना प्रशासनाची दमछाक होताना दिसते. निविदा प्रक्रियेत आणखी १२८ कोटी ७१ लाख रुपयांची कामे असून, निधीची उपलब्धता कळीचा मुद्दा ठरत आहे.

दुभंगलेले शिवसैनिक झाले एकत्र

0
0
राज्यात सत्तेतून बेदखल झालेल्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील आक्रमकता प्रथमच शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेता एकनाथ शिंदे यांना पहायला मिळाली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images