Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कालिदास कलामंदिरात 'डिझाइन डायलॉग'

0
0
नाशिकमधील इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, एन्व्हायरमेंट अँड आर्किटेक्चरमार्फत (आयडिया) '‌डिझाइन डायलॉग' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ मार्चला, मंगळवारी महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

डिसेंबरमध्ये आदिवासींसाठी राष्ट्रीय संमेलन

0
0
देशातील आदिवासी बांधवांच्या ‌उत्थानासाठी कार्यरत असणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाच्या षष्ठ्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त नाशिकला १० हजार आदिवासींचे राष्ट्रीय संमेलन होणार आहे. आश्रमाच्या माध्यमातून या संमेलनासह विविध उपक्रमही राबविण्यात येणार असल्याची महिती आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेव उरॉव यांनी दिली.

मुक्त विद्यापीठातर्फे ५३ जणांना कॅम्पस प्लेसमेंट

0
0
शिक्षण घेतानाच अधिकाधिक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी सध्या प्रत्येक कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट आयोजित केले जात आहेत. मुक्त विद्यापीठानेही असा उपक्रम सुरू केला असून नुकतेच पुणे येथे ५३ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली.

चिमण्यांसाडी बनवली चिमुकल्यांनी घरटी

0
0
जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत सिडको परिसरा‌तील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी चिमण्यांसाठी कृ‌त्रिम घरटी बनवली. लाकूड, पुठ्ठा, पत्र्याचे डबे, वाळलेले शहाळे यापासून चिमण्यांनी ही घरटी बनवली.

चित्रपट महामंडळाच्या शाखेसाठी जागा मिळेना

0
0
नाशिक हे चित्रपटाचे जन्मदाते शहर आहे. चित्रमहर्षि दादासाहेब फाळके यांनी याच ठिकाणी चित्रपट व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली, परंतु ज्या नगरीतून चित्रपटाने कोट्यवधींची चकाचोंद दाखवली त्याच नगरीत अखिल भारतीय चित्रपट महामंडळ शाखेच्या कार्यालयासाठी जागा मिळत नसल्याची नामुष्की ओढावली आहे.

गोदावरीला प्रदूषणमुक्त कसे करणार आहात?

0
0
गोदावरी नदीच्या प्रदूषणासंदर्भात मुंबई हायकोर्टाने बुधवारी नाशिक महानगरपालिकेला चांगलेच फैलावर घेतले.

'त्या' अधिका-यांवर खटले दाखल करण्याची मागणी

0
0
सरकारच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीय व्यक्ती, वस्त्या तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी निधीची तरतूद केली जाते. परंतु काही अधिकारी हा निधी वर्षभर न खर्च करता तो इतरत्र वर्ग करून त्याचा विनियोग करतात, असे आरोप जनता दलामार्फत करण्यात आला आहे.

मुक्त विद्यापीठाला हवी ५०० एकर जागा

0
0
सध्या दीडशे एकर जागेतून कारभार चालवित सुमारे चार लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या मुक्त विद्यापीठाला तब्बल ५०० एकर जागेची गरज आहे, अशी मागणी आमदार नितीन भोसले यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

कुंभमेळ्यासाठी दमडीही नाही

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात कुठलीच तरतूद केली नसल्याने कुंभमेळ्याच्या कामांबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याप्रकरणी पुरोहित संघासह सर्वच स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून राज्य सरकार कुंभमेळ्याविषयी गंभीर नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

६६ टक्के नाशिककरांकडे सेट टॉप बॉक्स

0
0
नाशिक शहरात १ लाख ४४ हजार केबल धारकांपैकी ९५ हजार २७० अर्थात ६६ टक्के केबल धारकांनी 'एसटीबी' (सेट टॉप बॉक्स) बसविले आहेत. ही यंत्रणा बसविण्यासाठी नाशिककरांच्या हातात अवघे दहा दिवस राहिले आहेत.

शहरात अपघातांची मालिका

0
0
शहरात अपघातांची मालिका सुरूच असून अपघातांच्या विविध घटनांत चार जण जखमी झाल्याचे बुधवारी समोर आले. शिलापूर येथील विष्णु नथु कहांडळ केटीएचएम कॉलेजसमोरून पायी जात असताना, कालिका मंदिर परिसरात राहणाऱ्या सायली अभंग या तरुणीने त्यांना जोरदार धडक दिली.

पांगरी खुर्देत स्फोटकांचा साठा

0
0
सुरुंगासाठी वापरल्या जाणा-या स्फोटकांचा ७ लाख ५७ हजार ७६० रुपये किमतीचा साठा ग्रामीण पोलिसांनी बुधवारी जप्त केला. पोलिसांच्या छाप्यात माठात लपविलेले ७६४ डिटोनेटर्स व विनापासिंग ट्रॅक्टरमध्ये १२ जिलेटीनच्या कांड्या सापडल्या.

भरतीसाठी आलेल्यांना मनसेचा हात

0
0
देशसेवेच्या तळमळीने सैन्यात भरती होण्यासाठी राज्यभरातून आलेल्या तरुणांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीचा साथीदार बनली आहे.

शनिवारी अर्थ अवर!

0
0
वसुंधरेच्या संरक्षणासाठी जगभरात चिंता व्यक्त केली जात असून काही आशादायक प्रयत्नही सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून वैश्विक पातळीवर वसुंधरेसाठी एक तास अशा संकल्पनेतून ‘अर्थ अवर’ मोहीम राबविली जात आहे. येत्या शनिवारी होणाऱ्या या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी एक तास व‌िजेच्या वापराला फाटा द्यायचा आहे.

कामटवाडा रस्त्यावर वाहतात पाण्याचे लोट

0
0
शहरासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असून पाण्याबाबत अद्यापही प्रशासन व पर्यायाने नागरिक गंभीर नाही अशी परिस्थिती कामटवाडा भागात आहे.

आता कळतेय एकेका झाडाची किंमत!

0
0
मुंबई-आग्रा हायवेच्या विस्तारीकरणाचे काम करतेवेळी या मार्गालगत असलेल्या असंख्य झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली. याबदल्यात नव्या मार्गाच्या लगत झाडे लावणे बंधनकारक होते.

'आरोग्याच्या विविध वाटा' वर उद्या व्याख्यान

0
0
स्पर्धेच्या युगात वाढत्या तणावांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी अनेक उपचार उपलब्ध असून पैकी अॅलोपॅथी अधिक गुणकारी असल्याचे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. या पॅथीमध्ये अनेक उपचारपध्दती अस्तित्त्वात असून त्यांचा परिचय करून देण्यासाठी युनिव्हर्सल स्मायलिंग होम या संस्थेतर्फे शनिवारी (२३ मार्च) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंचांगशुक्रवार, २२ मार्च २०१३भारतीय सौर १

0
0
पंचांगशुक्रवार, २२ मार्च २०१३भारतीय सौर १ चैत्र शके १९३५, फाल्गुन शुक्ल दशमी सायं ४११ पर्यंत, चंद्रनक्षत्रः पुनर्वसु सकाळी ७...

लागली गोडी 'ऑडिओबुक्स'ची

0
0
वाचनाची आवड असणाऱ्यांची आपल्याकडे आजिबात कमतरता नाही. जशी आवड तशी पुस्तके आज सर्वत्र आणि सहज उपलब्ध आहेत. बाजारपेठेचाही विचार करता पुस्तकविक्रीची बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे.

ई-ऑक्शनची ठेकेदारांना रिअॅक्शन

0
0
वाळू ठेक्यांची ई-ऑक्शनची प्रक्रिया वाळू ठेकेदारांनी सपशेल अपयशी ठरविल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाने पारंपरिक पद्धतीने वाळू लिलाव करण्याचे निश्चित केले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया जिल्हा नियोजन भवनात अत्यंत कडेकोट बंदोबस्तात होणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images