Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

संगणक परिचालकांकडून ‘जिप’च्या सीईओंना घेराव

0
0
नाशिक जिल्हा परिषदेत अंतर्गत ग्रामपंचायतीत महाऑनलाईनचे संगणक परिचालकांना कमी केल्याचा निषेधार्थ आयटक परिचालक कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

भावनाप्रधान ‘...या वळणावर!’

0
0
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ५४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये मंगळवारी महेश डोकफोडे लिखित ‘या वळणावर’ हे नाटक सादर करण्यात आले.

भुजबळांनी मिरवला पालकमंत्र्याचा बडेजाव!

0
0
राज्यात भाजपचे सरकार आले असले आणि नाशिकचे पालकमंत्री अद्याप निश्चित झाले नसले तरी जिल्हाधिकारी व प्रशासन छगन भुजबळ यांनाच पालकमंत्री मानत असल्याचे दिसून आले. स्वतः भुजबळांनीही तसाच बडेजाव मिरवला आणि अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यानेही त्यांची सरबराईच केली.

दहावी २९, बारावीचा २४ टक्के निकाल

0
0
ऑक्टोबरच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत नाश‌िक व‌िभागाचा दहावीचा न‌िकाल २९ टक्के तर बारावीचा न‌िकाल २४.३६ टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यम‌िक व उच्च माध्यम‌िक मंडळाच्या वतीने दहावी आण‌ि बारावीच्या व‌िद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ऑक्टोबर मह‌िन्यातील पुनर्परीक्षेच्या न‌िकाल मंगळवारी जाहीर झाला.

‘राष्ट्रवादी’ची थेट नजर

0
0
नाशिक जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांमध्ये आर्थिक विषयावरून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला चाप लावण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी घेतला आहे.

पालखेडचे आवर्तन १ डिसेंबरपासून

0
0
येवला, नांदगावसह इतर तालुक्यांसाठी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या १ डिसेंबरला सोडण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याच बैठकीत मनमाडच्या पाणीप्रश्नावर चर्चा करताना व‌िजेच्या समस्येवर शेतकऱ्यांनी प्रचंड आगपाखड केली.

राष्ट्रवादीचे भाजपप्रेम

0
0
भाजपवर दोन महिन्यापूर्वी कडाडून टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या त्याच भाजपबद्दल भरभरून बोलतांना पाहून सगळेच थक्क होत आहेत. भाजपला राज्यात काम करण्याची मोठी संधी असल्याचे सांगत ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भाजपविरोधात ब्र शब्द काढायलाही तयार नाहीत.

८० व्यापाऱ्यांची बँक खाती सील

0
0
महापालिकेने पाठवलेल्या नोटिसांना उत्तर न देणाऱ्या ८० व्यापारी/उद्योजकांचे बँक खाते बंद करण्याची​ कार्यवाही सुरू झाली आहे. प्रशासनाने तसे पत्रच बँकांना दिले असून, यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

बिनदिक्कत घ्या कोरे रेशनकार्ड!

0
0
नाशिकच्या धान्य वितरण कार्यालयात विविध प्रकारचे ‘आदर्श’ कामकाज सुरू असून, सेतू आणि महा ई सेवा केंद्राच्या कर्मचाऱ्यांना चक्क कोरे रेशनकार्ड देवून ‘तुम्हीच लिहा आणि वितरण करा’, असा कार्यक्रम सुरू केला आहे.

आरोग्य लाभो प्रत्येकास!

0
0
​नाशिकला लाभलेल्या नैसर्गिक देणगीचा आपण योग्य तो पुरस्कार करण्याची अत्यंत गरज आहे. नाशिकमध्ये मेडिकल टूरिझम झपाट्याने वाढते आहे. त्यात शहर परिसरात वेगवेगळे ख्यातनाम हॉस्पिटल, तज्ज्ञ डॉक्टर मंडळी यांचा मोठा सहभाग आहे.

बदल स्वीकारलेच पाहिजे

0
0
नाट्य सादर करण्याच्या दृष्टीने ऋतुरंगचा हॉल तितकासा योग्य नाही, काही त्रुटी आहेत. ‘कालिदास’सारखी तांत्रिक अंगे इथे नाहीत पण आहे त्या परिस्थितीत काही वेगळे नाट्यप्रयोग सादर करण्याचा ऋतुरंगचा मानस आहे, त्यादृष्टीने प्रयत्नही होत आहेत.

माँटेसरीत इंग्रजी कसं शिकतात ?

0
0
माँटेसरी शाळेमुळे मुलांना होणार फायदे जाणून घेतले. या लेखाद्वारे माँटेसरी पद्धतीनं, इंग्रजी मातृभाषा नसली तरीही, मुलं इंग्रजी भाषा कशी शिकतात हे या शेवटच्या लेखातून जाणू घेऊया.

निफाड कृषी अधिकाऱ्याला दहा हजार रुपयांचा दंड

0
0
निफाड येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांना नाशिकच्या राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाने दोन वेगवेगळ्या निकालांमध्ये एकूण १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सिन्नरच्या `फ्लाय ओव्हर`साठी कोकाटेंचे गडकरींना साकडे

0
0
नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण करताना सिन्नर शहरातून जाणाऱ्या रस्त्यासाठी फ्लाय ओव्हर ब्रिज करावा किंवा ज्या ठिकाणी क्रॉसिंग आहे अशा ठिकाणी ओव्हर ब्रिज करावा तसेच पळसे ते सिन्नर रस्त्याच्या रुंदीकरणात नगरपालिकेची पाण्याची पाइपलाईन शिफ्ट करावी लागणार आहे.

तंटामुक्त पुरस्कारांचे कळवणला वाटप

0
0
राज्य सरकारच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेअंतर्गत कळवण तालुक्यातील कळवण पोलीस ठाणे हद्दीतील ९ गावांना २०१२-१३ चा तंटामुक्त पुरस्कार प्रांतधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

डेंग्यू रोखण्यासाठी पिंपळगावला विशेष मोहीम

0
0
डेंग्यूचा प्रभाव वाढू नये म्हणून खबरदारी घेत पिंपळगाव ग्रामपंचायतच्यावतीने शहरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पिंपळगाव शहर, उपनगरे, वाडी-वस्ती आदि भागांत औषधे तसेच तणनाशकाची फवारणी केली जात आहे.

रावते वस्तीवरील शाळेला ठोकले कुलूप

0
0
गेल्या दोन वर्षांपासून शाळेला शिक्षक देण्याची मागणी करूनही येवला पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने गांभीर्याने न बघितल्याने संतप्त झालेल्या पालक व ग्रामस्थांनी अखेर रावते वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला टाळे ठोकले.

घोटी बाजार समितीला सर्वोतपरी सहकार्य करू

0
0
राज्यातील सहकार विभाग व पणन मंडळाने राज्यातील दोन बाजार समित्यांना विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात घोटी बाजार समितीचा समावेश आहे.

मालधक्का मुद्द्यावरून रेल्वेच्या ‘बाबूं’ना घेराव

0
0
कुभंमेळा काळात मालधक्का सहा महिने बंद ठेवण्याच्या वृत्तामुळे नाराज झालेल्या माथाडी कामगारांनी मध्य रेल्वेचे सहाय्यक उपमहाप्रबंधक बी. पी. त्रिपाठी आणि भुसावळ मंडल प्रबंधक महेशकुमार गुप्ता यांना घेराव घातला आणि त्यांना निर्णयावर फेरविचार करण्याचे बुधवारी निवेदन दिले.

आरक्षित भूखंड २० वर्षांपासून पडूनच

0
0
नाशिक महापालिकेच्या स्थापनेनंतर सातपूर परिसरात अनेक ठिकाणी जमिनींवर आरक्षणे टाकण्यात आली. २० वर्षांहून अधिक काळ होऊन आरक्षित भूखंड पडून आहेत. यातील सुमारे ३० मोठे भूखंड महापालिकेने ताब्यातच न घेतल्याने वापराविना आहेत. यासाठी महापालिकेने तत्काळ आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन ते विकसित करण्याची मागणी सातपूरकर करत आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images