Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बंद गाळ्यामध्ये व्यसनाधिनांचा मुक्काम

$
0
0
महापालीकेने सातपूर काँलनीत उभारलेल्या खोका मार्केटचे लिलाव केलेल्या गाळ्यांपैकी निम्मे गाळे पडूनच आहेत. यातील बंद गाळ्यांमध्ये दररोज रात्री व्यसनाधिनांचा मुक्काम असतो. या बंद गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे. लि‌लावाच्या माध्यमातून गाळा ताब्यात घेऊनही व्यवसाय सुरू न करणाऱ्यांकडून महापालिकेने गाळा परत घ्यावा आणि तो गरजूंना द्यावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविणार

$
0
0
नाशिक महापालिकेच्या हद्दीत विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही कारवाईचे संकेत आयुक्तांनी दिले असून एलबीटी वसुली संदर्भात व्यापाऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईचे डॉ. गेडाम यांनी समर्थन केले आहे.

डेंग्यूवर ४ डिसेंबरला विशेष महासभा

$
0
0
नाशिक महापालिकेचे मिळकत धोरण ठरविण्यासह डेंग्यूंच्या प्रलंबित लक्षवेधीवर आता येत्या ४ डिसेंबरला विशेष महासभा घेण्यात येणार आहे. महापौरांनी बुधवारी घेतलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नव्या मिळकत धोरणातून व्यायामशाळा, अभ्यासिका व लोकोपयोगी जागांवरील वाढीव कर आकारणी वगळण्याची मागणी केली आहे.

असं कसं बडेजाव असणारचं !

$
0
0
‘मी माजी उपमुख्यमंत्री व अनेक खात्यांचा मंत्री राहिलो आहे. जिल्ह्याच्या राजकारणात माझे आजही वजन आहे. त्यामुळे व्यवस्थेवर माझी पकड म्हणजेच बडेजाव असणारचं...!’ अशी मनातील खदखद आमदार छगन भुजबळ यांनी येवला दौऱ्यादरम्यान ‘ऑफ दी रेकॉर्ड’ व्यक्त केली.

धान्य वितरण कार्यालयाची चौकशी

$
0
0
नाशिकच्या धान्य वितरण कार्यालयाच्या बेशिस्त कारभाराची गंभीर दखल घेत या कार्यालयाच्या कामकाजाची विशेष चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले आहेत. तसेच, याप्रकरणी धान्य वितरण अरुण अधिकारी उजागरे यांची विभागीय चौकशीही होण्याची शक्यता आहे.

पेठरोडला आज खंडेराव यात्रोत्सव

$
0
0
पेठरोडवरील पंचवटीचा मल्हारी राजा देवस्थानच्या वतीने गुरुवारी, २७ नोव्हेंबर रोजी श्री खंडेराव महाराज यात्रोत्सव व बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल, अशी माहिती जय मल्हार सेवाभावी संस्थेचे संस्थापक रविंद्र निकम यांनी दिली.

‘येळकोट... येळकोट’चा आज जयघोष

$
0
0
चंपाषष्ठीच्या न‌िम‌ित्ताने आज (द‌ि. २७) शहर आण‌ि परिसरात ‘....येळकोट’च्या घोषाने शहर आण‌ि परिसर दुमदुमणार आहे. या न‌िम‌ित्त शहर आण‌ि ज‌िल्ह्यातील खंडेराव मंदिरांमध्ये यात्रोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. या न‌िम‌ित्त खंडेराव महाराज मंद‌िरांच्या व्यवस्थापनांनी अन्नदान आण‌ि व‌‌िव‌िध धार्म‌िक कार्यक्रम होणार आहेत.

आदिवासी विभागही श्वेतपत्रिकेच्या दिशेने

$
0
0
आदिवासींच्या विकासासाठी कोटयवधींचा निधी खर्च होवूनही विकास होत नसल्याने नव्या आदिवासी विकास मंत्र्यांनी १९८२ पासून ते आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आणि विकासाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. निधी खर्चाचा शोध घेण्यासाठी हा आढावा घेतला जात असल्याने वित्त विभागापाठोपाठ भाजप सरकारचे पाऊल आता आदिवासी विभागाची श्वेतपत्रिकेच्या दिशेने पडण्याची चिन्हे आहेत.

राज ठाकरेंचे आज आगमन

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा बहुप्रतिक्षित नाशिकचा दौरा गुरूवार, २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून सांयकाळी ७ वाजता नाशिकमध्ये त्यांचे आगमन होणार आहे. तर दुसरीकडे माजी आमदार वसंत गिते या दौऱ्यापासून लाबंच राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

...तर केबलचे दर दुप्पट होणार

$
0
0
स्टार कंपनीने अ. ला. कार्ट पद्धतीने चॅनल्स बंद केल्याने या चॅनल्सची सेवा आता द्यायची असल्यास शहरातील केबलचे दर दुप्पट होतील, असा इशारा केबल ऑपरेटर्सनी दिला आहे. यासंदर्भात ऑपरेटर्सनी बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. स्टार कंपनीचा हा एकप्रकारे मनमानी कारभार असून केबल ग्राहक यामुळे वेठीस धरले गेल्याची भावनाही ऑपरेटर्सनी यावेळी बोलून दाखविली आहे.

सामुग्री का पुर‌विली नाही?

$
0
0
ड्रेनेजचे चोकअप काढण्यासाठी उतरविण्यात आलेल्या मजूर, सुपरवायझरसह जेसीबीचालकाचा एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात गुदमरून मृत्यू झाला. महापालिका ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि सुरक्षाविषयक साधने न पुरविल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातलगांनी केला आहे.

बिबट्या अखेर जेरबंद

$
0
0
देवळालीगावा शेजारील रोकडोबावाडीतील डोबी मळ्यात बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनखात्याला बुधवारी यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

ड्रेनेज सफाई बेतली जिवावर

$
0
0
ड्रेनेजचे चोकअप काढण्यासाठी उतरविण्यात आलेल्या मजूर, सुपरवायझरसह जेसीबीचालकाचा एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात गुदमरून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास गंगापूर रोडवर सोमेश्वरनजीक ही र्दुदैवी घटना घडली.

आज पेपर ज्वेलरी वर्कशॉप

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’तर्फे ‘ट्रेण्डी लाईटवेट पेपर ज्वेलरी’ वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध प्रकारच्या पेपर ज्वेलरी पाहायला मिळणार आहेत.

‘लस्ट फॉर लाईफ’

$
0
0
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नाशिक व दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी यांतर्फे ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार (२९ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्हिन्सेन्टी मिनेली (युनायटेड स्टेटस) यांचा ‘लस्ट फॉर लाईफ’ हा इंग्रजी भाषेतील चित्रपटाचा शो होणार आहे.

थरारक अध्यायाची सह्यपरिक्रमा

$
0
0
१५ दिवसांत पाच हजार किलोमीटर्सचा प्रवास असणारी सह्यपरिक्रमा ही मोहीम पुण्यातले २५ युवक राबवत आहेत. यावर ‘छत्रपती संभाजीराजे’ हा माहितीपट तयार होणार आहे.

झाली अनोखी भेट...

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘कल्चर क्लब’ या उपक्रमांतर्गत ‘सेलेब भेट’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘मटा कल्चर क्लब’च्या शौनक जाखडी, अनुपम पवार, प्रीतम नाईक, प्राची पवार, रसिका भानोसे या सदस्यांना सेलिब्रेटींना भेटण्याची अनोखी संधी मिळाली.

बांधकाम कामगारांची नोंदणी आवश्यक

$
0
0
केंद्र व महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. परंतु, यासाठी बांधकाम कामगारांनी बांधकाम मंडळात नोंदणी करणे आवश्यक असल्याचे बांधकाम कामगार फेडरेशनचे उपाध्यक्ष एम. एच. शेख यांनी सांगितले.

औद्योगिक विकासात कामगार सहभाग महत्त्वाचा

$
0
0
औद्योगिक विकास अथवा कुठल्याही क्षेत्रातील प्रगतीला कामगारांचा सहभाग महत्त्वाचा असतो. अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) आयोजित कामगार व्यवस्थापन यामधील कामगारांची भूमिका या चर्चासत्रात मान्यवरांनी मते माडतांना सांगितले.

आठ स्लिपर कोच बसचे निलंबन, नोंदणी रद्द

$
0
0
स्लिपर कोच बसेसमध्ये अनधिकृतरित्या फेरफार करून त्या प्रवासी सेवेसाठी वापरात आणल्या जात असल्याचा गंभीर प्रकार प्रादेशिक परिवहन विभागाने राबवलेल्या तपासणी मोहिमेमध्ये उघडकीस आला आहे. अशा चार बसेसवर निलंबनाची तर अन्य चार बसेसवर नोंदणी रद्दची कारवाई करण्यात आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images