Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अन् कॉलच नव्हता!

$
0
0
ड्रेनेजचे चोकअप काढण्यासाठी खोल खड्ड्यात उतरलेल्या तिघा मजुरांचा सोमेश्वरजवळ बुधवारी मृत्यू झाला. प्रत्यक्षात ड्रेनेज सफाईच्या कामांसाठी महापालिकेने विकत घेतलेले रिसायक्लर मशीन बोलावण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाला कॉलच करण्यात आला नव्हता.

रिसायक्लर मशिनचा उपयोग काय?

$
0
0
नाशिक शहरातील वाढत्या लोकवस्तीत ड्रेनेजचेही जाळे पसरले आहे. परंतु, महापालिकेने ड्रेनेजचे चोकअप काढण्यासाठी खरेदी केलेल्या अत्याधुनिक ‘रिसायक्लर मशिन’चा उपयोग काय केला जातोय, असा सवाल तीन जणांचा ड्रेनेज चोकअप काढतांना मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी उपस्थित केला आहे.

संविधानाला हवा धर्मग्रंथाचा दर्जा

$
0
0
जगात महासत्ता असणा-या देशांच्या संविधानापेक्षा भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे. लोकशाही असलेल्या आपल्या देशात नागरिकांना मूलभूत हक्क आणि कर्तव्याची जाण संविधानाने करून दिली आहे.

मविप्र सांस्कृतिक महोत्सव दिंडोरी केंद्रात संपन्न

$
0
0
मविप्र सांस्कृतिक महोत्सव, जनता इंग्लिश स्कूल या केंद्रात संपन्न झाला. यावेळी झालेल्या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सभासद दौलतदादा उखर्डे होते.

कर्तव्य, जबाबदारीची संविधानातून जाण

$
0
0
भारताच्या संविधानाविषयी देशाच्या प्रत्येक व्यक्तीस आदर व निष्ठा असणे गरजेचे असून, संविधानातून आपल्याला कर्तव्य व जबाबदारीची जाणीव होते, असे प्रतिपादन कळवण महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. जी. भदाणे यांनी व्यक्त केले.

चाळीस मुलींना सायकलींचे वाटप

$
0
0
इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील ग्रामोदय शिक्षण संस्था संचालित आदर्श कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मानव विकास कार्यक्रमांतर्गत गुरूवारी ४० मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले.

विटी दांडू चित्रपटाविरुद्ध ब्राह्मण समाजाचा इशारा

$
0
0
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या विटी दांडू या चित्रपटातील गोविंदा गोविंदा गाण्यातील ब्राह्मण समाजाचा अवमान करणारा आक्षेपार्ह भाग त्वरित वगळण्यात यावा, अन्यथा समस्त ब्राम्हण समाजातर्फे चित्रपट निर्मात्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ युवा आघाडी परशुराम प्रतिष्ठानच्या स्थानिक पदाधिका-यांनी दिला आहे.

टोमॅटो आला पुन्हा रस्त्यावर

$
0
0
बेमोसमी पावसाच्या तडाख्यानंतर झालेल्या नुकसानीतून वाचलेल्या टोमॅटोला चांगला भाव मिळेल ही शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. टोमॅटोचे भाव गडगडल्याने टोमॅटो जागा दिसेल तेथे फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

संच मान्यतेविरोधात श‌िक्षक परिषदेचे धरणे

$
0
0
गेल्या शैक्षण‌िक वर्षाच्या संचमान्यतेनुसार राज्यभरात हजारो श‌िक्षक अत‌िरिक्त ठरत आहेत. या श‌िक्षक आण‌ि श‌िक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य श‌िक्षक परिषदेच्या नाश‌िक व‌िभागाने गुरूवारी धरणे आंदोलन केले.

वाचनामुळे विचारांची निर्मिती

$
0
0
ग्रंथाचे वाचन केल्यामुळे विचार तयार होतात आणि विचारने आचार तयार होतात, असे प्रतिपादन के. टी. एच. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप धोंडगे यानी केले.

ट्रेण्ड रनर

$
0
0
लिखाणाचा ट्रेंड बदलण्याची, नवे काहीतरी लिहून स्वत:चा एक बेंचमार्क, स्वत:ची स्वतंत्र स्टाइल सेट करण्याची उर्मी मनात घेऊन नवा लेखक इंडस्ट्रीत येतो. चांगले लिखाण करण्याचा आत्मविश्वास असतो. कट्टयावर चहा पिता-पिता जुन्या लिखाणावरून लेखकांवर टीका झालेली असते. त्यांच्या चुका आपण निस्तरून आधुनिक, चांगले, उत्तम लिखाण इंडस्ट्रीला देऊ अशा बाता झालेल्या असतात.

परंपरा जपणारे ‘फक्त प्रेक्षकांसाठी’

$
0
0
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ५४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये गुरूवारी प्रदीप कदम लिखित, दिग्दर्शित ‘फक्त प्रेक्षकांसाठी’ हे नाटक सादर करण्यात आले. नाटक ऋतुरंग फाऊंडेशन निर्मित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्राला नोटीस

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या सेतू केंद्राला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी नोटिस बजावली आहे. रेशनकार्ड प्रलंबित राहण्यासह पुरवठा विभागाने केलेल्या तक्रारींची दखल घेत ही नोटीस देण्यात आली आहे.

मृतांच्या नातलगांचा तीन तास ठिय्या

$
0
0
मृतांच्या नातेवाईकांना ठेकेदाराकडून तत्काळ प्रत्येकी २५ लाखांची मदत मिळावी, ठेकेदाराला अटक करावी आणि सोमेश्वर घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना महापालिकेने नोकरीत रूजू करून घ्यावे, अशा मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या जमावाने गुरूवारी त्र्यंबक रस्त्यावर सिव्हिल हॉस्पिटलसमोर तीन तास ठिय्या आंदोलन केले.

एलईडीप्रकरणी ठेकेदारावर फौजदारी दाखल करा

$
0
0
नाशिक महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या एलईडी बसविणाऱ्या ठेकेदाराला मनसेच्या पालिकेतील पदाधिकाऱ्याकडून झुकते माप दिले जात असताना, मनसेच्याच माजी आमदारांने आता प्रकल्पाच्या ठेकेदारावर फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.

खंडोबाच्या टेकडीवर भंडाऱ्याची उधळण

$
0
0
देवळाली कॅम्प येथील प्रसिध्द खंडोबाच्या टेकडीवर चंपाषष्ठी यात्रेनिमित्त येळकोट, येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करीत पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.

सिंहस्थ कक्षाला अखेर निधी मंजूर

$
0
0
गेल्या जून महिन्यात कार्यन्वित झालेल्या सिंहस्थ कक्षाला तब्बल सहा महिन्यांनंतर राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या वेतनासह जमीन अधिग्रहणही मार्गी लागणार आहे.

मल्हारी मार्तंडाच्या जयघोषात दुमदुमले शहर

$
0
0
‘सदानंदाचा येळकोट....’ अशा घोषाने गुरुवारी शहर आण‌ि परिसर दुमदुमले. चंपाषष्ठी न‌िम‌ित्त शहरातील व‌िव‌िध खंडेराव महाराजांच्या मंद‌िरात व‌िव‌िध धार्म‌िक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथील घनकचऱ्यामुळे गोदावरी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तातडीने पावले उचला, असे आदेश नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने दिले आहेत. यासंदर्भात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आठवड्याभरात परवानगी द्यावी, असे ट्रिब्युनलने सांगितले आहे.

चार लाखांची रोकड लांबविली

$
0
0
कारमधील बॅगत ठेवलेली चार लाखांच‌ी रोकड दोघांनी चोरून नेली. बुधवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास पंचवटीतील मार्केटयार्डाजवळ हा प्रकार घडला. संतोष सुरेश केदार (३१, रा. तुळसीपुजा सोसायटी, गुलमोहर नगर) यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images