Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘ते’ अर्थसहाय्य कर्जरूपाने

$
0
0
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताई सूतगिरणीस राज्य शासनाकडून जाहीर झालेले अर्थसहाय्य कर्जस्वरूपात मिळणार असून, त्यातील सर्व रक्कम राज्य सरकारला परत करणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

‘अंकुर’ने पकडली समाजाची नस

$
0
0
उपेक्ष‌ित जीवनाशी झगडणाऱ्यांच्या समस्या सोडव‌िण्यासाठी शॉर्ट फ‌िल्म सारखी नवमाध्यमं क‌िती प्रभावी ठरू शकतात, याचा प्रत्यय अभ‌िव्यक्ती संस्थेतर्फे आयोज‌ित अंकुर च‌ित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात आला.

थंडीचा कडाका वाढला

$
0
0
अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील थंडीचा कडाका दूर झाल्यानंतर आता पुन्हा थंडीचे पुनरागमन झाले आहे. गुरुवारी नाशकात सर्वात कमी म्हणजे ११.५ अंश सेल्सिअस इतक्या तपमानाची नोंद झाली आहे.

वेबसाईटमुळे परीक्षार्थी हैराण

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) वेबसाईट ओपन होत नसल्याने उमेदवार हैराण झाले आहेत. आयोग यासंदर्भात कुठलीही दखल घेत नसल्याने अर्ज भरण्याची शेवटची मदत जवळ आली असताना उमेदवार चिंतेत सापडले आहेत.

रंगणार शास्त्रीय संगीत महोत्सव

$
0
0
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कला संचालनालयातर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ व ४ डिसेंबर यादिवशी कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

धडे वेदिक गणिताचे..

$
0
0
महाराष्ट्र टाइम्स व पराग थिएटर्सतर्फे स्मरणशक्ती आणि वेदिक गणित या विषयावर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. कालिदास कलामंदिर येथे झालेल्या वर्कशॉपला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. वेदिक गणिक याविषयावर शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सिमेंटचा वापर करा जपून!

$
0
0
बांधकामातील पायाभूत घटक म्हणजे सिमेंट, ‌स्टील आणि वाळू. सर्वसाधारणपणे सिमेंटमध्ये अन्य काही प्रकार असतील याच माहिती सर्वसामान्यांना असत नाही. मात्र सिमेंटमध्येही विविध प्रकार असतात आणि गरजेनुसार त्यात्या प्रकारच्या सिमेंटचा वापर करावा लागतो.

चोऱ्यांना आळा घालण्याची मागणी

$
0
0
वणी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक दिवसांपासून दुचाकी, सोनसाखळी चोरी, मंगळवारच्या आठवडे बाजारात मोबाइल चोरी, खिसेकापूंचे वाढते प्रमाण व रोडरोमिओंना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी वणी पोलिस ठाण्यात निवेदनाव्दारे केली आहे.

ट्रेलरच्या धडकेने मोटरसायकलस्वार ठार

$
0
0
सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर - शहादा प्रकाशा राज्य महामार्गावरील विधायक कार्य समितीजवळ दुपारी एक वाजेच्या सुमारास भरधाव ट्रेलरने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. यात ट्रेलरच्या मागच्या चाकात सापडल्याने कंधाणे येथील मोटरसायकलस्वार बापू केदा देवरे (वय ५५) हे जागीच ठार झाले.

टाकळीला तंटामुक्तीचा ७ लाखांचा पुरस्कार

$
0
0
निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर ग्रामपंचायतीला महात्मा गांधी तंटामुक्त आदर्श गाव योजनेत ७ लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच या बक्षिसाचे वितरण लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. सानप यांच्या हस्ते सरपंच मारुती राजगिरे व ग्रामस्थांना प्रदान करण्यात आले.

आर. सी. फर्टिलायझर्स कंपनी बंद करा

$
0
0
लखमापूर येथील आर. सी. फर्टिलायझर्स कंपनीतून बाहेर पडणारे दूषित पाणी, विषारी वायू व तंतूमय धुलीकणांमुळे लखमापूर, परमोरी परिसरातील शेती, नागरिक व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गुंतवणूक करताना सावधानता बाळगा

$
0
0
येवला शहरात बाहेरगावच्या पतसंस्थाच्या शाखा मोठ्या संख्येने येत आहेत. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. कोणीही गुंतवणूक व आयुष्याची पुंजी अशा पतसंस्थेत गुंतवू नये, असे आवाहन व सावधानतेचा इशारा भाजपा नेते धनंजय कुलकर्णी यांनी दिला आहे.

वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. देवरे

$
0
0
पिंपळगाव बसवंत वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. जनार्दन देवरे, उपाध्यक्षपदी अॅड. उत्तमराव गायकवाड, सचिवपदी अॅड. तुषार घुमरे, खजिनदारपदी अॅड. प्रवीण हाडोळे, सदस्यपदी अॅड. महेश पवार व अॅड. श्रीराम भडांगे तर, महिला सदस्यपदी अॅड. हर्षाली ठुबे यांची निवड झाली आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा

$
0
0
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. दुष्काळ, अवकाळी पाऊस, वीज भारनियमन, कांदा व कापसाला हमीभाव नाही, या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नांदगाव तहसील कार्यालयात सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

एलईडी प्रकरणात अनियमितता

$
0
0
नाशिक महापालिकेच्या वादग्रस्त एलईडी प्रकरणात माजी आमदार नितीन भोसले यांनी चौकशी करण्याची मागणी केली असताना विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनीही त्यांचीच री ओढली आहे.

७० कंपन्यांमध्ये दिले सुरक्षेचे धडे

$
0
0
महाराष्ट्र सरकारच्या औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालयाकडून सुरक्षेबाबत कारखान्यांमध्ये मॉकड्रीलची प्रात्यक्षिके कामगारांना दाखविण्यात आली. या प्रसंगी औद्योगिक आरोग्य व सुरक्षा विभागाचे सहसंचालक अशोक डोंगरे यांनी सहा महिन्यात ७० कारखान्यांमध्ये अधिकारी व कामगारांना सुरक्षेचे धडे दिले असल्याचे सांगितले.

‘भोसला’च्या व‌िद्यार्थ्यांना ५१ हजारांचे पारितोष‌िक

$
0
0
गुरू गोव‌िंदस‌िंह पॉल‌िटेक्निक कॉलेजमध्ये आयोज‌ित प्रेरणा २०१४ या व‌िज्ञान प्रदर्शनात भोसला म‌िलीटरी कॉलेजच्या ज्युन‌िअर व‌िभागातील व‌िद्यार्थ्यांनी ५१ हजारांचे पारितोष‌िक पटकाव‌िले.

व‌िनेश नायर याची ग‌िनिज बुकमध्ये नोंद

$
0
0
मव‌िप्रच्या केटीएचएम कॉलेजमध्ये संगीताचे श‌िक्षण घेणारा व‌िद्यार्थी व‌िनेश नायर याने व‌िख्यात वादक श‌िवमणी यांच्या मार्गदर्शनाखाली समूह वादनात सहभाग घेत ग‌िनिज बुकमध्ये नाव नोंदव‌िले.

ग्रामीण विद्यार्थिनींच्या एसटी सेवेला घरघर

$
0
0
मानव विकास निर्देशांक वाढविण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या बससेवेला घरघर लागण्याची शक्यता बळावली आहे.

सुझलॉन कंपनीतर्फे स्वच्छता अभियान

$
0
0
सुझलॉन कंपनीतर्फे सिन्नर जिल्ह्यातील चंद्रपूर आणि खापराळे या गावांमध्ये नुकतेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पांढुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे डेंग्यूविषयी जनजागृती आणि औषध फवारणी करण्यात आली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images