Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मनमाडच्या थिएटरमध्ये आग

$
0
0
शहरातील सर्वात जुने सिनेमागृह असा लौकिक असलेल्या अलंकार सिनेमागृहास रविवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागून संपूर्ण थिएटर जळून खाक झाले. प्रेक्षकांनी तातडीने बाहेर धाव घेतल्याने जीवितहानी झाली नाही.

सटाण्यात दीड तास रास्तारोको

$
0
0
सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर - शहादा प्रकाशा राज्य महामार्गावरील वळण रस्ता प्रलंबित असल्याकारणाने नाहक निष्पाप जीवांचा बळी जात आहे. या रस्त्याचे काम लवकर मार्गी लावण्यात यावे, या मागणीसाठी संतप्त शहरवासीयांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ दीड तास रास्तारोको आंदोलन केले.

पाणीटंचाईसाठी १८ कोटी

$
0
0
ग्रामीण भागातील पाणीटंचाईसाठी १८ कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेला तब्बल तीन स्मरणपत्रे देण्यात आली होती. आता या आराखड्यानुसार काम केले जाणार आहे.

कन्नमवार पुलाचे काम लवकरच

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्गालगत गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या कन्नमवार पुलाला ५० वर्षे पूर्ण झाली असून या पुलाचा स्लॅब काही ठिकाणी धोकादायक बनल्याामुळे या पुलाचे काम लवकर हाती घेतले जाणार आहे.

वर्षभरापूर्वी खोदलेल्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात

$
0
0
सातपूर कॉलनी परिसरातील वीस हजारच्या स्कीममधील वर्षभरापासून खोदून ठेवलेल्या रस्त्यांच्या समस्येबाबत ‘मटा’ने प्रकाश झोत टाकला होता. या वृत्ताची दखल घेत महापालिकेने खोदलेल्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली आहे.

७ किलोमीटरच्या रस्त्यात २७ ठिकाणी क्रॉसिंग पॉइंट

$
0
0
नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वरकडे जाणारा रस्ता बाराही महिने रहदारीचा असतो. परंतु, महापालिका हद्दीतील त्र्यंबकनाका ते पपया नर्सरीपर्यंत त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तब्बल २७ ठिकाणी रस्ता क्रॉसिंग ठेवण्यात आले आहेत.

दारात आला बिबट्या; वनविभागाकडे नाही पिंजरा

$
0
0
बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील महिरावणी गावातील लोक धास्तावलेले आहेत. रविवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यामुळे गायीचे वासरू जखमी झाले. मात्र, बिबट्या पकडण्याचा पिंजराच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत वनविभागाने जबाबदारी ढकलली आहे.

मजुरांच्या कुटुंबीयांना न्याय द्या

$
0
0
गंगापूररोडवरील सोमेश्वरजवळ महापालिकेच्या मुख्य सांडपाण्याच्या ड्रेनेज लाईनचे चोकअप काढतांना तीन मजुरांचा नुकताच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्या, अशी मागणी कामगार कृती समितीच्या वतीने कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे.

फाळके स्मारकाला ‘CSR’ची प्रतीक्षा

$
0
0
नाशिक शहराचे भूषण असलेल्या दादासाहेब फाळके स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीच्या ठेक्याकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली. अनेकदा निविदा प्रसिध्द केल्या; मात्र ठेकेदारांना या कामात रसच नसल्याचे दिसून आले.

‘इंग्रजी शाळांवरील बंदीने मराठीचा प्रश्न सुटणार नाही’

$
0
0
मराठीसाठी इंग्रजी शाळांवर बंदी घालण्याच्या जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमांडेच्या मागणीने मराठीचा प्रश्न सुटणार नसल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली. मराठी शाळामंध्ये उत्कृष्ठ इंग्रजी शिकवले तर मराठी शाळांचाही दर्जा सुधारेल असे सांगत त्यांनी नेमांडेच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

ट्रकच्या धडकेने मोटरसायकलस्वार ठार

$
0
0
भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्यामुळे मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाला तर, त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. म्हसरूळ येथील बजाज शोरूम समोर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

अनुदान लाटणाऱ्यांवर गुन्हे

$
0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विहीरीचे अनुदान लाटणाऱ्या सिन्नर तालुक्यातील एकूण ३२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीनंतर फौजदारी कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

अतिक्रमणावरून कुरघोडीचा प्रयत्न

$
0
0
बोरगड येथील महापालिकेच्या सुमारे २५ एकर जागेवरील अतिक्रमण हटवण्यावरून पोलिस आणि महापालिका एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिस बंदोबस्तासाठी अनेक वेळा पत्र व्यवहार केला असून, पोलिसांकडून सकारत्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप महापालिका अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

हरित महाराष्ट्रात नाशिक प्रथम

$
0
0
हरित महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करणाऱ्या नाशिकच्या सामाजिक वनीकरण विभागाचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. नाशिक विभागाने २९ हजार ४५७ रोपांचे वाटप तर १२ हजार ९२६ रोपांची विक्री केली होती.

पोलिस आयुक्तांना साकडे

$
0
0
शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठीच्या प्रयत्नांत वाहतुकीचे काटेकोर नियोजनही करावे लागेल. शहराचे बकालपण दूर करण्यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमण निर्मूलनाच्या मोहिमेला पोलिसांनी मुबलक पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे व्यक्त केली.

अनामत रक्कम ‘ऑफलाइन’च

$
0
0
कम्प्युटर विभागाने अनामत रक्कम ऑनलाइन स्वीकारण्यासाठी केलेला बदल स्वीकारण्यास प्रशासनातील इतर अधिकारी तयार नसल्याचे रविवारी पुन्हा एकदा समोर आले.

परीक्षा गेली पुढे...

$
0
0
चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगचे विद्यार्थी परीक्षेचा पेपर देऊन आले आणि संध्याकाळी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कळलं, की त्यांचे पुढचे काही पेपर्स डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहेत.

व्यापाऱ्यांचे अकाऊंट सील!

$
0
0
एलबीटी व विविरण पत्र भरण्यास दिरंगाई करणाऱ्या आणखी १०० व्यापारी तसेच उद्योजकांचे खाते बंद करण्यासाठी महापालिकेच्या एलबीटी विभागाने सोमवारी बँकांना सु​चित केले. यापूर्वी बंद करण्यात आलेल्या ८० खातेधारकांपैकी २१ जणांनी दंडाची रक्कम भरून विवरणपत्र सादर केली आहेत.

पीएफ कार्यालयातही आधारकार्ड

$
0
0
पीएफकरीता युनिव्हर्सल खात्यासाठी कामगाराला आधारकार्डची नोंदणी आवश्यक असते. यासाठी पीएफधारकांना जागेवरच आधारकार्ड मिळावे, यासाठी आयुक्त जगदीश तांबे यांनी पीएफ कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये आधारकार्ड काढण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सायकल अन् पालखीसाठी मार्ग

$
0
0
नाशिक ते त्र्यंबक रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान सायकल आणि पालखी मार्गही साकारला जात आहे. अडीच मीटर रूंद आणि २३ किलोमीटर लांबीचे हे दोन्ही मार्ग चौपदरी रस्त्याच्या कडेला असणार आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images