Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकरोडला ऑफ स्ट्रीट पार्किंग

$
0
0
वाहतूक कोंडीच्या बजबजपुरीला वैतागलेल्या नाशिककरांना दिलासा मिळू शकेल असे पाश्चात्य देशांमधील पार्किंग व्यवस्थेप्रमाणे असलेले राज्यातील पहिले ऑफ स्ट्रीट पार्किंग नाशिकरोडला साकारणार आहे.

थकबाकीसाठी प्रशासनाची कसरत

$
0
0
चालू आणि मागील अशी मिळून २५ हजारापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या २ हजार ५३३ मिळकतधारकांना घरपट्टी विभागाने नोटी​सा बजावल्या आहेत. यातून तब्बल २५ कोटी १० लाख रुपयांची वसुली होणे महापालिका प्रशासनाला अपेक्षित आहे.

नियमावलीचा ‘उतारा’

$
0
0
शहरातील मोकळ्या भूखंडावरील अस्वच्छता रोखण्यासाठी आरोग्य विभाग नियमावली तयार करीत असून लवकरच ती मंजुरीसाठी महासभेला सादर करण्यात येणार आहे.

नाशिककरांना भरणार हुडहुडी

$
0
0
नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यासंबंधीचे पत्र विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. नाशिकचा पारा सध्या १२ अंश सेल्सिअसच्या आसपास असून त्यात आणखी घसरण होऊन तो निच्चांक गाठणार का, याबाबत उत्सुकता आहे.

फोटो झाले, कृती कधी?

$
0
0
एखादी मोठी मोहीम राबवायची असेल तर त्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची आणि झोकून देऊन काम करण्याची गरज असते. आपला देश सर्वांगसुंदर असावा यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या महत्वाकांक्षेने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.

औद्योगिक बससेवा : कौतुकास्पद उपक्रम

$
0
0
नाशिकची मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा कंपनीने कामगारांसाठी बससेवा सुरू केली आहे. वायू प्रदूषण, कामगारांची सुरक्षितता, इंधनांचे ज्वलन आणि वेळेची बचत या सर्वच स्तरांवर औद्योगिक क्षेत्रात बससेवा अत्यंत प्रभावी आहे.

मनमाड-इंदूर रेल्वे साकारणार

$
0
0
गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग साकारणार असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. यासंदर्भात धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी प्रभू यांची नवी दिल्लीत भेट घेतली आहे.

नियतीच्या नोबॉलचा ‘ह्युज’ब्लो..!

$
0
0
ज्या क्षणी आपल्या भावाइतक्याच जवळच्या असलेल्या मित्राला बॅटींग करतांना गंभीर दुखापत झाल्याचे कळले, त्याच क्षणी त्याचेही चित्त अस्वस्थ झाले. पुढच्याच मिनिटाला एससीजीवरील प्रेसबॉक्सला फोन करून त्याने हॉस्पिटलचे नाव विचारले आणि क्षणार्धात भरगाव वेगाने त्याची कार सेंट व्हिन्सेंट हॉस्पिटलच्या परिसरात दाखल झाली.

शिक्षकावरील कारवाई चुकीची

$
0
0
नाशिक महापालिकेच्या वडाळा गावातील शाळा क्रमांक १८ मधील शिक्षक शाह मुस्ताक सांडू यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक आहे. याबाबत फेरचौकशी करावी, अशी मागणी विविध ११ शिक्षक संघटनांनी केली आहे.

सुरक्षारक्षक युनियनचे बेमुदत उपोषण सुरू

$
0
0
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक युनियनच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास मंगळवारपासून सुरुवात झाली. हिन्दुस्तान नॅशनल ग्लास कंपनीत कामावरून कमी करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव भोसले यांनी केली आहे.

अतिक्रमित व्यावसायिकांचा सातपूरला विळखा

$
0
0
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील सातपूरला अतिक्रमित व्यावसायिकांचा विळखा पडला आहे. यात मशिद आणि महादेववाडी येथील व्यावसायिकांनीच पादचारी मार्गावर सर्वाधिक अतिक्रमण केले आहे.

रब्बीला आले बुरे दिन!

$
0
0
बागलाण तालुक्यातील सातत्याने घटणाऱ्या पर्जन्यमानाबरोबरच गेल्या सात ते आठ वर्षांपासून सातत्याने वाढलेल्या विजेच्या भारनियमनामुळे रब्बीक्षेत्र दिवसेंदिवस घटू लागले आहे.

भारनियमनाविरोधात इगतपुरीत मोर्चा

$
0
0
इगतपुरी तालुक्यात वाढते भारनियमन तसेच विजेच्या लपंडावामुळे लघु उद्योग, शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने इगतपुरी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.

वनसंवर्धनासाठी १५ कोटींची योजना

$
0
0
तालुक्यातील ममदापूरसह पाच गाव परिसरातील जंगलात वनसंवर्धन योजनेतून कोट्यवधी रुपयांची विकासकामे होणार आहेत. तसेच, हरणांसाठी कुरणे, जलसाठे करण्यात येणार आहेत.

जळगाव-धुळे दरम्यान नॉन स्टॉप बससेवा

$
0
0
धुळे-नाशिक विनावाहक बायपास बससेवेला प्रतिसाद पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक येथील विभागीय कार्यालयाने जळगाव ते धुळे मार्गावरही विनावाहक बससेवा सुरू करण्यात आली आहे.

घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वाढता वापर

$
0
0
तालुक्यात ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांशी हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅस सिलिंडरचा खुलेआम वापर करीत असल्याने महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

ग्रामपंचायतीसाठी ऑनलाइनचाच फतवा

$
0
0
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ऑनलाअन अर्जाची प्रक्रिया सपशेल फसल्यानंतरही निवडणूक आयोगाने पुन्हा ऑनलाइन अर्जांचाच हट्ट धरला आहे. त्यामुळे राज्यात एकूण १४५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक यशस्वी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता

$
0
0
भाजप सरकाराच्या लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि शिवसेनेचे दादा भुसे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याच्या वाट्याला किमान दोन राज्यमंत्रीपदे येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गुरुजींच्या दंडावर आज काळ्या फ‌िती

$
0
0
श‌िक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) ‍त्रुटींमध्ये सुधारणा करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज, बुधवारी व‌िव‌िध शाळांमध्ये काळ्या फ‌िती लावून न‌िषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

नोकरभरतीसाठी हवी बंधनात्मक खर्चात कपात

$
0
0
महापालिकेचा बंधनात्मक खर्च अर्थसंकल्पाच्या ३५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. हा खर्च प्रशासनाच्या अर्थसंकल्पाच्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, असे राज्य सरकाराचे स्पष्ट निर्देश असल्याने नोकर भरतीचा प्रश्न रेंगाळत पडला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images