Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चर्चा करून सोडवा अतिक्रमणाचा तिढा

0
0
सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू असून, लवकरच विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने बोरगड येथील अतिक्रमणधारकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी, असा सल्ला देत पोलिसांनी बंदोबस्त पुरवण्यात ‘यू टर्न’ घेतला आहे.

दर कोसळूनही हमीभावास नकार

0
0
नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या कोसळणाऱ्या किंमतीवर शुक्रवारी लोकसभेत चर्चा झाली. यावेळी किंमती कोसळल्याचे प्रथमच केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी कबूल केले आहे. मात्र, हमीभाव देण्याची खासदार हरिश्चंद्र चव्हाणांनी केलेली मागणी कृषिमंत्र्यांनी फेटाळल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे.

भुजबळांशी संबंध नाही

0
0
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची छबी आक्रमण संघटनेच्या फ्लेक्सवर खुलेआम झळकावणाऱ्या संतोष शर्मा याने बुधवारी संघटनेने काढलेल्या रॅलीशी भुजबळांसह राष्ट्रवादीचा संबंध नसल्याचे स्पष्ट करून एकाएकी यू टर्न घेतला आहे.

आठशे कोटींचे व्यवहार ठप्प

0
0
वेतनावाढीसाठी राष्ट्रीयीकृत बॅँकेच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात तब्बल आठशे कोटींची उलाढाल ठप्प झाली असल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. संपात महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, दीव दमण येथील कर्मचारीही सहभागी झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

मालेगावला मिळालं मंत्र‌िपद

0
0
सेना-भाजपमधील कटुता संपल्यावर शिवसेना सत्तेत सामील होणार हे नक्की झाले. यामुळे मालेगाव बाह्यमधून विजयाची हॅटट्रिक साधणारे शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांना मंत्रिपद मिळण्याची आशा मालेगावकरांना वाटू लागली होती.

आठ जागांसाठी ३५० अर्ज

0
0
देवळाली कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या ११ जानेवारीला होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी आठ जागांसाठी १२० उमेदवारांनी ३५० अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिली. येथे इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘आयटीआय’चे उद्या नागपुरात आंदोलन

0
0
राज्यात कुशल मनुष्यबळ घडविण्यात खासगी आयटीआयचाही वाटा आहे. मात्र, आर्थिक कारणांमुळे खासगी आयटीआय बंद पडत आहे. त्यामुळे राज्यभरातील खासगी आयटीआयला राज्य सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेने केली आहे.

आंदोलनाबाबत शाळेने चुकीचे संदेश पसरवू नयेत

0
0
तीन मह‌न्यिांपूर्वी आंदोलनकर्त्या पालकांनी शाळेला पाठव‌लिेले फ‌‌ीचे चेक शाळेनेच स्वीकारले नव्हते. तरीही शाळेच्या वतीने उलट व‌धिाने केली जात असल्याचे श‌क्षिण बाजारीकरण व‌रिोधी मंचने म्हटले आहे.

... तर, पोलिसांकडे तक्रार करू

0
0
महिला व बालकल्याण समितीमार्फत महिलांना प्रशिक्षण देण्याचा बहाणा करून परस्पर पैसे वसूल केल्याचे निदर्शनास आल्यास किंवा तशी तक्रार आल्यास पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याचे संकेत महिला व बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्याने दिले आहेत.

अखेर ऑनलाइनचा फतवा मागे

0
0
ग्रामपंचायत निवडणुकीत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सक्ती अखेर निवडणूक आयोगाला मागे घ्यावी लागली आहे. यासंदर्भात असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शनिवारी आयोगाने नवा आदेश काढत पारंपरिक पद्धतीने अर्ज सादर करण्यास मुभा दिली आहे.

हॉटेल्सवर एफडीएची कारवाई

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रामकुंड परिसरात मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार शनिवारी पहिल्याच दिवशी १२ हॉटेल्सची व एका धर्मशाळेची तपासणी करण्यात आली.

साडेसात हजार हॉकर्सचा सर्व्हे पूर्ण

0
0
शहरातील विविध कानाकोपऱ्यात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या ७ हजार ५०० व्यावसायिकांचा बायोमेट्रीक सर्व्हे पूर्ण झाला आहे. १२ हजार व्यावसयिकांनी आतापर्यंत अर्ज घेतले असून, सध्या जागा नि​श्चित करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती उपायुक्त डी. टी. गोतीसे यांनी दिली.

चुकीच्या कामांची चौकशी

0
0
राज्यातील सहकार क्षेत्राची स्थिती चागंली नसल्याची कबुली देत सहकार क्षेत्रात जिथे जिथे चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असा इशारा नवनियुक्त सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.

२८ संस्था अवसायनात

0
0
नव्याने मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांच्याकडे सहकार खाते येण्यापूर्वीच सहकार विभागाने त्यांच्यांच मतदारसंघातील २८ सहकारी संस्था अवसायनात काढल्या आहेत. अंतिम आदेशान्वये उपनिबंधक सहकारी संस्था, मालेगाव यांनी त्या संस्थांचे कामकाज गुंडाळून अवसायानात काढून कर्जवसुली अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

दोनशे सोनोग्राफी केंद्र बंद

0
0
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी शासनाकडून कठोर पावले उचलली जाऊ लागल्याने सोनोग्राफी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहे. उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांमध्ये दोनशे सोनोग्राफी केंद्रांना टाळे लागले असून त्यापैकी ९० सेंटर्स एकट्या नाशिक जिल्ह्यात आहेत.

रोबोट मशिन्ससाठी स्वीसवारी

0
0
रोबोट खरेदीची प्रक्रियेसाठी महापालिकेच्या दोघा इंजिनीअर्सने नुकताच स्वीस दौरा केला. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता ‘नाका पेक्षा मोती जड’ अशी परिस्थिती झाल्याची चर्चा या दौऱ्याच्या निमित्ताने होते आहे.

दहा वर्षात तीन जलवाहिन्या

0
0
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दहा वर्षांत तीन जलव‌ाहिन्या सातपूर भागातील शेतीशिवारात टाकल्या. परंतु, अद्यापही तेथील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

‘PMEGP’च्या लाभधारकांची तपासणी

0
0
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या (पीएमईजीपी) माध्यमातून बँकांचे कर्ज घेतलेल्या पण, कुठल्याही प्रकारचा उद्योग धंदा सुरू न केलेल्या लाभार्थ्यांची माहिती आता उघड होणार आहे.

जॉगिंग ट्रॅकच झाला गायब!

0
0
सर्वसामान्यांना आरोग्याची काळजी घेता यावी या उद्देशाने नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी सातपूर पोलिस स्टेशनच्या चारही बाजूंनी जॉगिंग ट्रॅकची उभारला केली होती. मात्र, परिसरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी महापालिकेने उभारलेला जॉगिंग ट्रॅक गायब झाला आहे.

दुष्काळप्रश्नी आवाज उठवणार

0
0
राज्यात भाजप व शिवसेनेचे सरकार आले आहे. या नवीन सरकारमध्ये मंत्रीही नवीन आहे, त्यांना सभागृहाचे कामकाज समजू द्यायला वेळ द्यायला हवा. पण त्याचबरोबर राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली असल्याने आपण या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवू, अशी ग्वाही माजी मंत्री व विद्यमान आमदार छगन भुजबळ यांनी येथे दिली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images