Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हेल्मेटमुळे वाचले प्राण

0
0
रात्रीही हेल्मेट वापरण्याचे दाखवलेले शहाणपणामुळे जेलरोडच्या अपघातात एका दुचाकीस्वाराचे प्राण वाचले. वेगात असलेल्या कारने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार हेल्मेटसह पुढील काचेत घुसला.

अपघातात दोन जणांचा मृत्यू

0
0
शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. पिंपळगाव बसवंतच्या भिडेनगरमध्ये राहाणारा कुंदन अशोक सोनवणे हे रविवारी रात्री दीडच्या सुमारास नाशिकहून पिंपळगावकडे मोटरसायकलवरून चालले होते.

डॉक्टरांची आता ग्रामीण वारी !

0
0
ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारांसाठी शहरात येण्याची गरजच भासू नये, यासाठी ‘मोबाईल सर्जिकल ट्रॅकींग सिस्टम’ ही अभिनव संकल्पना कार्यान्वित करण्याचा निर्णय जिल्हा आरोग्य यंत्रणेने घेतला आहे. ही सिस्ट‌मि यशस्वी झाली तर तज्ज्ञ डॉक्टर्सचे पथकच ग्रामीण भागातील सरकारी हॉस्पिटल्समध्ये जाऊन उपचार देऊ शकणार आहे.

केसांच्या निगेबाबत आज सेमिनार

0
0
केसांची काळजी घेताना काही ठराविक गोष्टी आपण लक्षात घेतो. मात्र इतरही अनेक गोष्टी यात कराव्या लागतात. केसांच्या निगेबाबात तुम्हाला योग्य माहिती मिळावी यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'ऋतुरंग परिवारा'तर्फे 'कशी घ्यावी केसांची काळजी' या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

बोगस अपंग शिक्षकांवर गंडांतर

0
0
जिल्हा परिषदेच्या शाळांमधून अपंग असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून सोयीनुसार संधी साधणाऱ्या संबंधित शिक्षकांना अपंग प्रमाणपत्र मुंबईच्या शासकीय रुग्णालयातून तपासणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयामुळे बागलाण पंचायत समितीच्या ९१ प्राथमिक शिक्षकांवर गंडांतर येणार आहे.

नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करा

0
0
अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतपिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करून पीककर्ज माफ करण्याबरोबरच जिल्ह्याला तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

बंद घरातून लांबविला ११ लाखांचा ऐवज

0
0
शहरातील प्रतिष्ठित व्यापारी मनोज मंगलचंद राका यांच्या मालेगाव रोडवरील श्री मंगल या बंगल्यावर अज्ञात दरोडेखोरांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घर बंद असल्याचा फायदा घेत सुमारे अकरा लाख रुपये लंपास केले.

गटविकास अधिकाऱ्यांना डांबले

0
0
तालुक्यातील केरसाने येथील रोजगार हमी योजनेतील अपहार झालेल्या विहिरींची पंचनामा प्रत मिळण्यास सातत्याने विलंब झाला आहे. यामुळे संतप्त अखिल महाराष्ट्र महाराणा प्रताप क्रांती दल पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयास कुलूप ठोकून आंदोलन केले.

स्तनाचा कर्करोग पूर्ण बरा होतो

0
0
‘कमी वयातही स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. वेळेत निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो,’ असे प्रतिपादन डॉ. राज नगरकर यांनी येथे केले.

संस्कृती शिदोरी महिलांच्या हाती: सिंधूताई

0
0
‘भारतातील संस्कृतीची शिदोरी महिलांच्याच हाती आहे. त्यामुळे त्यांनी समाज घडविताना झटले पाहिजे.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे केले.

आयुक्त ‘घरकुल’कडे लक्ष देतील का?

0
0
नाशिक महापालिकेत जवाहलाल नेहरू पुनरुथ्थान योजनेत चुंचाळे शिवारात होणारी सहा हजार घरकुलांचे काम कासव गतीने सुर आहेत. दहा इमारती तयार झाल्या आहेत.

सिंहस्थासाठी केंद्राचे ५०० कोटी?

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून ५०० कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने देशातील मेगा इव्हेंटचे निकष तयार केले असून, त्यासाठीचा प्रस्ताव नाशकात युद्धपातळीवर तयार केला जात आहे. तातडीने हा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर होणार आहे.

दोन महिन्यात तिघांचा बळी

0
0
जुने नाशिकमधील बागवानपुरा भागात सोमवारी डेंग्यूसदृश्य आजारामुळे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यात बागवानपुरा भागातील ही तिसरी घटना आहे.

ठेकेदारांसाठी नियम होणार कडक

0
0
आरोग्य, वैद्यकीयसह इतर विभागांसाठी काम करणारे ठेकेदार शिथिल अटी- शर्थींच्या आधारे महापालिकेला डोहीजड ठरतात. मात्र, यापुढे चुकीचे कामे करणाऱ्या ठेकेदारांना वठणीवर आणण्यासाठी करार करताना अत्यंत कठोर अटी-शर्थी तयार करण्याचे सूतोवाच आयुक्त प्रवीण गेडाम यांनी महासभेत केले.

डीटीएचची संख्या चौपट!

0
0
केबलच्या विविध प्रकारच्या समस्या तसेच कमतरता लक्षात घेता डायरेक्ट टू होम अर्थात डीटीएचकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे. गेल्या चार वर्षात डीटीएचधारकांच्या संख्येत तब्बल चारपटीने वाढ झाली आहे. परिणामी, करमणूक कराच्यारुपाने सरकारला लक्षणीय महसूल प्राप्त होत आहे.

सिन्नर रस्ता, जानेवारीत मुहूर्त

0
0
नाशिकरोड ते सिन्नर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम कुठल्याही परिस्थितीत जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली आहे. यासाठी आवश्यक जमिनीचा ताबा २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण केला जाणार आहे.

राज्यमंत्रिपद, बडेजाव त्यावरचा!

0
0
राज्याच्या ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीला राज्यमंत्रिपदाचा दर्जा असला तरी या पदी असलेल्या सूर्यकांत गवळी यांनी नाशिक दौऱ्यात केंद्रीय मंत्र्याप्रमाणेच बडेजाव मिरवला.

डेंग्यूवर उडाला चर्चेचा धूर

0
0
जीवघेण्या डेंग्यू आजाराच्या फैलावास कारणीभूत ठरलेल्या महापालिकेने यावर तब्बल साडेपाच तास चर्चा केली. यात समोर आलेल्या चुकांवर कोणतीही ठोस कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले नाही. त्यामुळे चर्चेच्या धुराचा भविष्यात फायदा होईल काय, असा प्रश्न उपस्थित झाला.

वालदेवीला ‍प्रदूषणाचा विळखा

0
0
सिव्हेज ट्रिटमेंट प्लांटच्या (एसटीपी) प्रतीक्षेत तब्बल तीन वर्ष उलटून गेले. एसटीपीच्या भूसंपादनाचे काम सुरू झालेले नसताना प्रशासनाने पाथर्डीसह इतर भागातील सांडपाणी पाइपलाईनद्वारे नदीपात्राच आणून ठेवले.

गुन्हेगारी रोखण्यासाठी सहकार्याची गरज

0
0
‘वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आणि जनता यांच्यात सुसंवाद हवा. जनतेने पोलिसांना घटना त्वरित कळवावी. सोशल मीडियासारख्या गोष्टींचा वापर करुन पोलिसांना माहिती दिल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण राखणे सोपे जाईल,’ असे प्रतिपादन पोलिस उपायुक्त संदीप दिवाण यांनी केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images