Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पेट्रोल पंपांवर सौर प्रकाश!

0
0
देशात कार्यरत असलेल्या पेट्रोल पंपांच्या ठिकाणी वीजेच्या उपलब्धतेसाठी मोठ्या प्रमाणात इंधन खर्ची होत असल्याने या पंपांना वीजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पेट्रोल पंपांनी सौर ऊर्जेचा वापर करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एकाढल्याने हे पंप सौर ऊर्जेद्वारे उजळणार आहेत.

सिंहस्थासाठी ९८९ कोटींचा निधी उपलब्ध

0
0
नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठी मंजूर आराखड्यानुसार आराखड्यातील समाविष्ट कामासाठी राज्य सरकारच्या विविध विभागाकडून आतापर्यंत ९८९ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माह‌िती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.

मराठी पाऊल पडते पुढे...

0
0
दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. पहिल्या मजल्यावर शेवटच्या कोपऱ्याला ते ऑफिस होते. पाहूनच भ्रमनिरास झाला. ज्या ढंगात त्याने फोन केला होता अन् ज्या प्रकारचे हिंदी कम इंग्लिश शब्द वापरून त्याने फिल्मवर चर्चा करण्यासाठी बोलावले होते, असे वाटले होते की हा ज्युनिअर यश चोप्राच असावा.

टेबलावर आपटल्या ४४००० फाईल्स

0
0
उत्तर महाराष्ट्रातील आदिवासींच्या प्रलंबित वनदाव्यांच्या प्रश्नासह विविध प्रश्नांसदर्भात लोकसंघर्ष मोर्चाच्या समन्वयक प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता आदिवासी आयुक्तांलयात आयुक्तांना घेरावासह ठिय्या आंदोलन करण्यात आले.

हो, नदीचा प्रवाह बंद केला

0
0
त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचे पात्र संकुचित करतानाच ते काँक्रिटमध्ये बंदिस्त करण्यात आले असून त्यातूनच मलजल वाहत असल्याची साक्ष याचिकाकर्त्यांनी पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलपुढे दिली आहे. त्र्यंबकेश्वर गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात दाखल याचिकेची गुरुवारी अंतिम सुनावणी झाली.

न्याय द्या किंवा तुरुंगात टाका

0
0
नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील आदिवासींचे तब्बल ४४ हजार वनदावे प्रलंबित असतानाही आदिवासी विभाग वनदाव्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे संतापलेल्या आदिवासींनी शुक्रवारी वनदाव्याच्या या कुजलेल्या फाईल्स आदिवासी आयुक्तांच्या टेबलावर ठेवून त्यांना घेराव घातला.

भाजप-शिवसेना आमने सामने

0
0
देवळाली कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या ११ जानेवारीला होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकासाठी आठ जागांसाठी रिंगणात ७२ उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी ४५ जणांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ यांनी ही दिली.

बैठकीत एलईडीवर पुन्हा प्रकाश

0
0
एलईडी फिटींग्ज बसवण्याच्या कामात ठेकेदाराला अपयश आले असून, त्याचा फटका शहरवासीयांना बसतो आहे. संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करता येईल, याबाबतचा अहवाल सादर करण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे.

लग्नपत्रिकेतून स्वच्छतेचा संदेश

0
0
स्वच्छ भारत अभियानाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणातप्रयत्न केले जात आहेत. या अभियानाची चळवळ व्यापक होण्यासाठी पंचायत समिती स्तरावर गट समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे.

ST चालकांची गाडी येणार ‘ट्रॅक’वर

0
0
रस्त्यावर उतरणाऱ्या प्रत्येक अवजड वाहन चालकाने ड्रायव्हिंगच्या काटेकोर चाचणीतून तावून सुलाखूनच बाहेर पडावे यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कंबर कसली आहे.

गारपिटीचा पुन्हा दणका

0
0
नाशिक जिल्ह्यातील बागलाण, निफाड तसेच येवला तालुक्यातील काही गावांना गुरुवारी सायंकाळी बेमोसमी पाऊस व गारपिटीने तासभर झोडपून काढले. द्राक्ष व डाळिंबाला या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

जिल्ह्याचे पाणी जिल्ह्यासाठीच वापरा

0
0
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा हा जेमतेमच असल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठाहा जिल्ह्यातच वापरला जावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

शाळांचा टोल वाजलाच नाही

0
0
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेच्या तालुका समन्वय समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक संपात सहभाग नोंदविल्याने तालुक्यातील सर्वच शाळांचा शुक्रवारी टोल बंद राहिला. परिणामी बाळगोपाळांनी या सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटला.

अपहरणाचा लागला दोन दिवसात छडा

0
0
कळवण येथून अल्पवयीन मुलीच्या अपहरणचा कळवण पोलिसांनी ५२ तासात शोध घेत अपहरणकर्ता व मुलीस ताब्यात घेण्याची कामगिरी केली.

३५ सहकारी संस्थांच्या बागलाणमध्ये निवडणुका

0
0
बागलाण तालुक्यातील ‘क’ व ‘ड’ वर्गातील सुमारे ३५ सहकारी संस्थाच्या निवडणुका घेण्यासाठी बागलाणच्या सहाय्यक निबंधकांनी कंबर कसली आहे. यामुळे विधानसभा व ग्रामपंचायतीपाठोपाठ आता सहकार क्षेत्रातील निवडणुकांमुळे थंडीच्या मोसमात ग्रामीण भागातील वातावरण तापणार आहे.

त्र्यंबक पालिकेत मनसे सत्तेबाहेर

0
0
त्र्यंबकेश्वर पालिकेत सत्तांतर झाले असून, दोन वर्षांपासून सत्तेत असलेला मनसेवर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. काँग्रेस, भाजप व अपक्षांच्या समर्थनाच्या जोरावर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या अलका राजेंद्र शिरसाठ यांची निवड झाली आहे.

पशुपक्षी अन् पिकांचा‌ही ‘अवकाळी बळी’

0
0
येवला तालुक्यात गुरुवारी सायंकाळ ते रात्री सव्वादहापर्यंत झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वारा अन् गारपिटीने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. ठिकठिकाणी झालेल्या 'अवकाळी' च्या कहरमध्ये द्राक्ष, डाळिंब, कांदे, मका, गहू, हरभरा आदी पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

डेंग्यूला रोखण्याचे आव्हान कायम

0
0
थंडीची तीव्रता हळू कमी होऊन दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाची निमिर्ती झाली. त्यातच शुक्रवारी सायंकाळी शहरात मुसाळधार पाऊस पडला. जीवघेण्या डेंग्यूसह इतर साथरोगांचा फैलाव होण्याच्या दृष्टीने हे वातावरण पोषक असून डेंग्यूला रोखण्याचे आव्हान महापालिकेसमोर कायम असल्याचे दिसते.

पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी कठोर अटी-शर्थींचा उपाय

0
0
पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी महासभेसमोर ठेवण्यात आलेले दोन्ही प्रस्ताव मागे घेण्यात आले आहे. या कामात पारदर्शकता आणण्यासाठी नवीन पर्यायांची चाचपणी केली जात असून नुकत्याच एका पथकाने नवी मुंबई महापालिकेच्या कामांची माहिती घेतली, असे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.

ठेवी न मिळाल्यास गावोगावी गुन्हे

0
0
जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेने सहा महिन्यांपसान ठेवीदारांच्या रकमा देण्यास टाळाटाळ केली आहे. या ठेवीदारांच्या ५०० टक्के रकमा तातडीने न दिल्यास गावोगावी गुन्हे दाखल करण्याचा निर्धार ठेवीदारांच्या मेळाव्यात करण्यात आला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images