Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अवकाळीने ३८ हजार हेक्टरची दैना

$
0
0
निसर्गाच्या अवकृपेमुळे गेल्या दोन दिवसात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने जिल्ह्यातील तब्बल ३८ हजार ४३० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने नुकसानीचे प्राथमिक आकडेवारी शनिवारी जाहीर केली.

फळबागांनाही देणार नुकसान भरपाई

$
0
0
जिल्ह्यातील फळबागांना सातत्याने नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत असल्याने भविष्यात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी फळबाग वाचविण्यावर विशेष लक्ष देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नवी फॅशन आयकॉन

$
0
0
बॉलिवुडमध्ये दर शुक्रवारी नंबर वन पदासाठीची रस्सीखेच सुरू असते आणि आठवड्याला स्टार बदलतात असं म्हटलं जातं, बाकी काहीही असलं तरी ‘फॅशन आयकॉन’ या बिरुदासाठी अभिनेत्रींमध्ये चांगलीच रस्सीखेच रंगते.

रंगला झुम्बा डान्स

$
0
0
थंडीचा महिना म्हणजे आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्तम महिना. थंडीचा आनंद घेता घेता आरोग्य उत्तम ठेवण्याचा प्रयत्न सर्व लोक करत असतात. यामध्ये मग लहानग्यांनीही का मागे रहावे यासाठीच महाराष्ट्र टाइम्सतर्फे झुम्बा विथ किडस् या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते.

३६ वर्षांनी भेटला आधाराचा हात

$
0
0
जन्मदात्यांनीच स्वत:पासून तोडल्यानंतर घारपुरे घाटावरचा आधाराश्रमच त्याच्यासाठी आधाराचा हात बनला. तेव्हा तो अवघा पाच वर्षांचा जंगलू नावाचा न‌रिागस मुलगा होता.

चौफुली नव्हे, मृत्यूचा सापळाच

$
0
0
वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती, बंद सिग्नल यंत्रणा, चारही रस्त्यांवर भरधाव वेगाने धावणारी वाहने या गराड्यातून जीव मुठीत घेऊन हजारो नागरिकांना मृत्यूचा सापळा बनू पाहणारा वडाळा नाका चौफुली ओलांडून दररोज ये-जा करावी लागत आहे.

महापालिका शाळांसाठी सुरक्षारक्षक!

$
0
0
समाजकंटाकाकडून शाळांमध्ये होणारी दादागिरी आणि गैरप्रकार रोखणे तसेच चोरीच्या घडणाऱ्या घटनांना पायबंद घालण्यासाठी महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव शिक्षण मंडळाने प्रशासनासमोर ठेवला आहे.

चाकोरीबद्ध शिक्षण नकोच!

$
0
0
आजच्या २१ व्या शतकात करिअरचे असंख्य मार्ग उपलब्ध आहेत. असं असलं तरी आजचा समाज चौकट मोडून बघायची हिंमत करत नाही. आजचा तरुण सजग आहे आणि शिक्षणाची खरी व्याख्या तो जाणतो म्हणूनच आपल्यातलेच काही तरुण नोकरीचं प्रतिष्ठीत लेबल लावलेले मार्ग सोडून वेगळया मार्गावरून चालायची हिंमत करून पुढे जात आहेत आणि याचा त्यांना पश्चात्ताप नाही तर अभिमान आहे.

युवकाने खडूत साकारले महापुरुष

$
0
0
जन्मजात अंगभूत कला असली तर ती कधी झाकून ठेवता येत नाही. कलाकार हे मुळातच एका अनामिक उर्जेने झपाटलेले असतात. अभोणा गावातील एका ध्येयवेड्या पदवीधर तरुणाने खडूवर कलाकुसरीने महापुरुषांच्या आकर्षक मूर्ती साकारल्या आहेत. त्या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे प्रशांत गांगुर्डे.

आमदार गावितांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी

$
0
0
गावाच्या विकासाची जवाबदारी ग्रामस्थांसोबत ग्रामसेवकावर असून, जर ग्रामसेवकाच्या तक्रारीच राजस्व अभियानातील आढावा बैठकीत होत असेल तर हे निंदनीय आहे. त्याबाबत पुढील तीन महिन्यात होणाऱ्या आढावा बैठकीत सुधारणा होणे आवश्यक आहे, असे खडेबोल आमदार निर्मला गावित यांनी हरसूल येथे झालेल्या राजस्व अभियानांतर्गत तालुक्याच्या आढावा बैठकीत सुनावले.

गारपीटग्रस्त गावांना भुजबळ यांची भेट

$
0
0
वादळी वारा, अवकाळी पाऊस अन् गारपिटीने मोठे नुकसान झालेल्या येवला तालुक्यातील भाटगाव, धुळगाव, पिंप्री, शेवगे, सातारे, एरंडगाव, मुखेड या गावांचा शनिवारी दुपारी राज्याचे माजी मंत्री अन् येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी पाहणी दौरा केला.

सोशल मीडियावर शेतकऱ्यांचे दुःख

$
0
0
अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्स अॅप आणि फेसबुकवरही कवितांच्या माध्यमातून बळीराजाच्या या वेदनेचे प्रतिबिंब उमटले आहे.

बागलाणमध्ये १७१ गावांना तडाखा

$
0
0
गत दोन दिवसात बागलाण तालुक्यातील १७१ गावांना वादळी वारा, विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊर तर काही गावांना गारपिटीने झोडपले. तालुक्यात सगळीकडे पावसाच्या रौंद्र रूपाने त्रस्त करून सोडले असून शेतकऱ्यांची अवस्था आई जेवू घालेना व बाप भीक मागू देईना, अशी झाली आहे.

२४ हजार उमेदवारांनी दिली टीइटी

$
0
0
श‌िक्षक पात्रता चाचणी (टीइईटी) परीक्षेला ज‌िल्हाभरातून रव‌िवारी सुमारे २४ हजार विद्यार्थी सामोरे गेले. नाश‌िक शहरासह ज‌िल्हाभरात सुमारे ६० केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली.

नापास झालेलं मूल्यमापन

$
0
0
नापास करून पुन्हा त्याच वर्गात ठेवणे हे शिक्षण हक्क कायद्यानुसार आता घटनाबाह्य ठरेल. लहान मुलांच्या मानसिकतेला दिलेले घटनेचे हे सुरक्षा कवच अतिशय उचित आहे. या मागची भूमिका काय हे पालकांनी समजून घेणे अगत्याचे व अंतिमत: त्यांच्या पाल्याच्या हिताचे आहे.

कोडगेपणावर उतारा हवाच!

$
0
0
सैन्याने अशी कर्तबगारी करावी की सेनापतींची छाती अभिमानाने फुलून यायला हवी. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. नाशिक पोलिस गळपटलेत की काय अशी एकंदर परस्थिती आहे.

कसली शेती, मिळाली माती

$
0
0
दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीटमुळे शेतकऱ्यांचे अतानोत नुकसान झालेे. कर्ज काढून फुलवलेली द्राक्ष, डाळिंब बाग तसेच कांदा, मका, गहू जमीनदोस्त झाले आहेत.

उत्तर महाराष्ट्राला मिळणार पॅकेज

$
0
0
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उध्दवस्त झालेल्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी विधीमंडळात सोमवारी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राज यांनी गुंडाळला नियोजित दौरा

$
0
0
निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागाईतदार शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी नाशिकचा दौरा रविवारी दुपारी चारच्या सुमारास गुंडाळला. नियोजित कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच त्यांनी मुंबईकडे प्रयाण केल्याने खांदे पालटाची आस लावून बसलेल्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मात्र निराशा झाली.

शेतकरी चढले सरणावर

$
0
0
जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी रविवारी सायंकाळी सात वाजता रूईचे सरपंच कैलास तासकर यांच्यासह पन्नास शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images