Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सप्तशृंग गड स्वच्छ अन् सुंदर

0
0
अर्धे शक्तीपीठ सप्तशृंग गडावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. मात्र, ट्रस्ट आणि ग्रामपालिका प्रशासनाने संपूर्ण गडाची स्वच्छता केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

येवल्यात लवकरच निवडणूक

0
0
गेल्या ३ वर्ष ८ महिन्यांच्या प्रशासकीय राजवटीनंतर सहकार खात्याच्या वतीने येवला तालुक्यातील अंगणगाव येथील येवला औद्योगिक सहकारी वसाहतीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील वर्षी २० जानेवारी रोजी निवडणूक अन् त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे.

मालगाडीच्या चार डब्यांना आग

0
0
तालुक्यातील म्हसावद येथे कोळसा वाहून नेणाऱ्या मालवाहू गाडीच्या चार डब्यांना आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियं‌त्रण मिळविण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.

१४० प्रयोगांचे सादरीकरण

0
0
इगतपुरी तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग, विज्ञान अध्यापक संघ व बेलगाव तऱ्हाळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात जवळपास १४० शाळांच्या प्रयोग सादर करण्यात आले आहेत.

कर्मचारी, अधिकाऱ्यांची होणार पडताळणी

0
0
मुख्यालयी राहत नसल्यास जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करण्याच्या नोटिसा उच्च न्यायालयामार्फत निघाल्यानंतर आता जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच अधिकारी अन् कर्मचाऱ्यांबाबत देखील कडक पवित्रा घेण्याचे निश्चित केले आहे.

तीन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

0
0
राज्याचे कृषी व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर सावखेडा ये‌थीलही एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली.

‘तो’ लाचखोर अधिकारी निलंबित

0
0
आदिवासी लाभार्थींचे अनुदान मंजूर करण्यासाठी लाच घेतल्याची तक्रार असलेल्या नाशिक पंचायत समितीचे कृषी अधिकारी नवलसिंग पवार याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुखदेव बनकर यांनी अखेर मंगळवारी निलंबित केले.

`विराट विजय`... तरीही पराजय!

0
0
ऑस्ट्रेलियन दौऱ्यात कोहलीचा विराट प्रयत्न फसला! मात्र, मागील ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील भारताची कामगिरी बघितली तर या कसोटीतील भारताच्या कामगिरीने आगामी कसोटी सामन्यातील कामगिरीबाबत आशा पल्लवित जरूर झाल्या आहेत.

ऑनलाईन वीजबिलास पसंती

0
0
महावितरणच्या अॉनलाईन वीज भरणा सुविधेला नाशिक जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या आनलाईन बिल भरण्याच्या संख्येत ७५ हजार २७४ ग्राहकांनी वाढ झाली.

फक्त ८५० पाळीव श्वानांची नोंद

0
0
महापालिकेकडून होणाऱ्या पाळीव श्वानांच्या नोंदणीमध्ये २०११ ते डिसेंबर २०१४ या चार वर्षांच्या कालावधीत अवघ्या ८५० श्वानांची नोंद करण्यात आली आहे. २००८ मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी हे पद निर्माण करण्यात आल्यापासून या कामास गती मिळाल्याचे दिसते.

...तर, सरकारविरोधात संघर्ष

0
0
अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पीककर्ज माफ करून आपत्तीग्रस्तांसाठी राज्य सरकारने कायमस्वरूपी आपत्कालीन निधी उभारावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

अभियंत्याची भूमिका महत्वाची

0
0
जिल्ह्याच्या विकासात अभियंत्याची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे कामांचा दर्जा उचांवून चांगले काम उभे करा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी केले.

आता पंतप्रधानांनाच साकडे

0
0
मुंबई ते नाशिक दरम्यान अति जलद रेल्वे सुरू करावी, या मागणीसाठी गेल्या दहा वर्षांपासून काटेकोर पाठपुरावा सुरू असला तरी त्यास यश आलेले नाही. रेल्वेमंत्र्यांनी तर यासंदर्भात पोहोच देण्याचीही तसदी घेतली नसून, आता याप्रश्नी थेट पंतप्रधानांकडेच पाठपुरावा करण्याचा निर्णय विठ्ठलराव तिडके यांनी केला आहे.

त्र्यंबकेश्वर येथे पाहणी

0
0
नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अधिकाऱ्यांनी त्र्यंबकला जाऊन पाहणी दौरा केला आहे. त्र्यंबकला गोदावरी नदी काँक्रिटमध्ये बंदिस्त करतानाच तिचा नैसर्गिक प्रवाह बंद केला आहे.

विरोधकांचीही सरकारवर टीका

0
0
नाशिक जिल्ह्यासह राज्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारने प्रतिहेक्टरी १० ते २५ हजार रुपये अशी अल्पशी मदत देऊन बोळवण केली आहे. सरकारच्या या तोकड्या मदतीवर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टीका केली असून, या मदतीतून शेतकरी पुन्हा कसा उभा राहील, असा सवाल उपस्थित केला आहे.

थकबाकीदारांसाठी नवे वर्ष कठीण

0
0
२५ हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या तब्बल दोन हजार मिळकतधारकांनी ३१ डिसेंबरपर्यंत थकबाकी जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच मिळकत जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त आर. एम. बहिरम यांनी दिला आहे.

रामरथ मार्गच नवा शाही मार्ग

0
0
आगामी कुंभमेळ्यात आपत्ती होऊ नये यासाठी आता नव्या शाही मार्गाचे नियोजन सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील निर्देश दिल्यानंतर रामरथाच्या मार्गाचा विचार शाहीमार्गासाठी करण्यात येत आहे.

गारपीटग्रस्तांना दिलासा

0
0
उत्तर महाराष्ट्रासह कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात १२ ते १५ डिसेंबरपर्यत झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

स्वच्छता बनावी जीवनशैली

0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने देशात सार्वजनिक स्वच्छतेबाबत अद्भूत जागरूकता निर्माण झाली आहे. हे वातावरण वाढविणे व स्वच्छता एक जीवन शैली बनविण्यासाठी काही गोष्टी करणे नितांत गरजचे आहे.

गरमागरम सूऽऽऽप

0
0
हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवणापूर्वी स्टार्टर्समध्ये पहिली पसंती दिली जाते ती सूपला. थंडी किंवा पावसाळा असेल तर हे गरमागरम सूप प्रत्येकालाच हवं असतं. पण आता हॉटेलमध्येच नव्हे तर घरच्या घरीच तुम्हाला असे सूप्स बनवता येणार आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images