Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चित्रकलेतील सौंदर्यावर व्याख्यान

$
0
0
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशि विभागीय केंद्र, पवार चॅरिटेबल ट्रस्ट, विश्वास को-ऑप बँक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि विश्वास कम्युनिटीतर्फे ‘लोकसंवाद’ या उपक्रमांतर्गत ‘चित्रकलेतील सौंदर्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

रंगणार ‘सुवर्ण मंदार’

$
0
0
संगीत नाटक या मराठी परंपरेतील काहीशा दुर्मिळ होत जाणाऱ्या गायकीचा नाशिककरांना आस्वाद घेता यावा यासाठी एक अनोखी मैफल रसिकांच्या भेटीला येणार आहे.

अनुभवा बॉलीवूडचा प्रवास

$
0
0
बॉलीवूडचा प्रवास प्रत्येकाच्याच आवडीचा. गेल्या कित्येक पिढ्यांनी बॉलीवूडचा हा रंजक प्रवास पाहिला आणि अनुभवला. त्यामुळेच बॉलीवूडने शंभर वर्षांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. संगीत असो वा नृत्य सर्वच माध्यमातून बॉलीवूडने रसिकांचे मनोरंजन केले.

थंडीची ऐशी-तैशी

$
0
0
गेल्या चार दिवसात नाशिककर थंडीने गारठलेले दिसत आहेत. पण या थंडीला घाबरुन घरात बसतील ते यंगस्टर्स कसले. अशाच काही यंगस्टर्सशी संवाद साधला असता, हा थंडा थंडा कूल कूल मोसम एन्जॉय करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

फुटपाथ नव्हे, फ्रुटपाथ!

$
0
0
फुटपाथ हा शब्द समोर येताच आपल्या समोर येते अतिक्रमण. दुकानदारांचा, फेरीवाल्यांचा, वाहनांचा जमेल त्या प्रकारचे अतिक्रमण. ही एक फार खेदजनक गोष्ट आहे. खरे तर, फुटपाथ म्हणजे सर्वसामान्यांचे व सर्वांसाठीची एक हक्काची वहिवाट.

पुरूषोत्तम इंग्ल‌िश स्कूलने पटकावला यशवंत चषक

$
0
0
संत यशवंतराव महाराज देवमामलेदार यांच्या १२७ व्या पुण्यत‌िथीच्या न‌िम‌ित्ताने आयोज‌ित न‌िबंध स्पर्धेचा न‌िकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेन‌िम‌ित्त देण्यात येणारा यशवंत चषक नाश‌िकरोड येथील पुरूषोत्तम इंग्ल‌िश स्कूलने पटकाव‌िला आहे.

टॅलेंट हंट झाले, पुढे काय?

$
0
0
नाशिकला कविता राऊत, अंजना ठमके, मोनिका आथरे, संजीवनी जाधव, किसन तडवी यासारख्या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या धावपटूंची परंपरा आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिच्या वाढदिवसानिमित्त हरसूल येथे टॅलेंट हंट स्पर्धा घेण्यात आली.

रक्तदान शिबिराला प्रतिसाद

$
0
0
एचडीएफसी बँकेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून बॅँकेतर्फे संपूर्ण भारतात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. यंदाही संपूर्ण नाशिक शहरात रक्तदान शिबिर आयोजित करून ६५३ बॅग संकलित करण्यात आल्या.

...अन् शाळाही झाल्या काही क्षण स्तब्ध

$
0
0
ताल‌िबानी दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे पाकिस्तानमधील पेशावर शहरात आर्मी स्कूलवरील केलेल्या हल्ल्याचा व‌िव‌िध शाळांमध्ये न‌िषेध करण्यात आला.

तीन वर्षांपासून नाही घरपट्टी, पाणीपट्टी

$
0
0
बांधकाम व्यावसायिकाने अर्पाटमेंटचे काम पूर्ण केल्यानंतर महापालिकेकडून कप्लिशन अर्थात इमारत पूर्णत्वाचा दाखला घेतला. मात्र, त्यानंतरही घरपट्टी, पाणीपट्टीसाठी सोमेश्वर कॉलनीतील रहिवाशांची वणवण थांबू शकलेली नाही. तीन वर्षांपासून घरपट्टी व पाणीपट्टीच महापालिकेने दिलेली नाही.

ग्रामीण पाणीपुरवठा योजना रखडल्या

$
0
0
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना जलसुराज्य योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येतात. अशा योजना तांत्रिक सल्लागार समितीच्या नावाखाली अडकल्या असून, त्यामुळे या पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत. या योजनांना तांत्रिक सल्लागार समितीच्या ताब्यातून काढून घ्यावे, अशी मागणी सिन्नरचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी केली आहे.

गडावर विकासकामांना सुरुवात

$
0
0
सप्तशृंग गडावर सार्वजनिक बांधकाम विभाग व ट्रस्टच्या वतीने विकासकामांना सुरुवात करण्यात आली. सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्टच्या वतीने मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार व ध्यानधारणा चिंतन सभागृह बांधकामाचे कोनशीला अनावरण नाशिक जिल्ह्याचे मुख्य सत्र न्यायाधीश आनंद करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले.

शहर सजले यात्रोत्सवासाठी

$
0
0
सटाणा शहराचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या १२६ व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित यात्रोत्सव व पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण सटाणा शहर सजले आहे.

द्राक्ष उत्पादकांची वाढली चिंता

$
0
0
अवकाळी पाऊस अन् गारपिटीने येवला तालुक्यातील द्राक्षबागांना मोठा फटका बसला. अवकाळीचा परिणाम आठ दहा दिवसानंतर जाणवू लागला आहे. त्यातच गोठवणाऱ्या थंडीचा कहर सुरू झाल्याने काय होणार? या चिंतेने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

एलबीटीवरून महापालिका पेचात

$
0
0
महापालिकेकडून एलबीटी विवरण पत्र सादर करण्यासंदर्भात व्यापाऱ्यांवर सुरू असलेली कारवाई शिथिल करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी आदेशावरून महापालिका प्रशासन कात्रीत सापडले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून लेखी आदेश न मिळाल्यामुळे कारवाई थांबवली तर, लेखा विभागाचा आक्षेपाला तोंड द्यावे लागेल आणि कारवाई केली तर, मुख्यमंत्री कार्यालयाचा रोष सहन करावा लागेल.

बासरी वादकांचा ‘कुंभमेळा’

$
0
0
आर्ट ऑफ लिव्हींग परिवारातर्फे नाशिक येथे येत्या १२ जानेवारी रोजी एकाच वेळी सहा हजार बासरीवादक ‘वेणुनाद’ हा समूह बासरी वादनाचा कार्यक्रम सादर करणार आहे. श्री श्री रविशंकरजी यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रख्यात बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांच्या उपस्थितीमुळे ‘चार चाँद’ लागणार आहेत.

वा‌ढत्या रेडिरेकनरपासून ‍दिलासा

$
0
0
नव्या वर्षात नाशिक शहरातील रेडिरेकनरचे दर अर्धात जागांचे सरकारी मूल्य वाढणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधी व क्रेडाईच्या शिष्टमंडळाने बुधवारी त्यांची नागपूरात भेट घेतली.

जनजागृतीसाठी इनोसन्स

$
0
0
सामाजिक विषयांवर प्रबोधन करण्याच्या कामात आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे. विविध माध्यमांचा खुबीने वापर करण्यातही ही तरुणाई वाकबगार आहे.

तबल्यातील गणिताबरोबरच कवित्व जाणा

$
0
0
‘पंडीत भानुदास पवार स्मृती समारोहात नाशिकमध्ये तबलावादन करायला मिळणार या भावनेने मी तर भारावून गेलो आहे. असंख्य तबला वादकांचे गुरु पं. भानुदास पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात मला कला सादर करता येणार हे मी भाग्याचे समजतो’, असे भावपूर्ण उद्गार पं. नयन घोष यांनी काढले.

‘कल्चर क्लब’ची नोंदणी शेवटच्या टप्प्यात

$
0
0
विविध दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या कल्चर क्लबला नाशिककरांना भरभरुन प्रतिसाद दिला आहे. नाटक, संगीताचे कार्यक्रम तसेच विविध वर्कशॉप्सच्या माध्यामातून कल्चर क्लबने नाशिककरांची अभिरुची वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images