Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रस्त्याचे काम जानेवारीपासूनच

$
0
0
नाशिक ते सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम कुठल्याही परिस्थितीत जानेवारीपासून सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सोमवारी जाहीर केले आहे. भूसंपादनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुनावणी घेतली. यावेळी त्यांनी ‌जिल्हा प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

डॉक्टरांकडून होतेय वसुली

$
0
0
अधिकृत डिग्री व रजिस्ट्रेशन नसल्याने कारवाई करण्याचा धाक दाखवून डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्या एका टोळीचा सोमवारी पर्दाफाश झाला. टोळीतील दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून एकजण फरार झाला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितल्यानंतरच आपण डॉक्टरकडून वसुली केल्याचा जबाब संशयितांनी दिला असून यामुळे महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

अडतला स्थगिती; लिलाव पूर्ववत

$
0
0
शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून आडत व तोलाई वसूल करण्याच्या पणन संचालकांच्या निर्णयाला सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनी पुढील आदेश येईपर्यंत स्थग‌तिी दिली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील व्यापारी आणि आडतदारांनी सोमवारी बेमुदत बंद घेत लिलावात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला.

मनसेचे चार माजी आमदार भाजपात?

$
0
0
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याभोवती असलेल्या गोतावळ्याला कंटाळलेले आणि पक्षापासून दुरावलेले मनसेच्या चार माजी आमदारांसह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आता भाजपात घरोबा करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिकलाही मेट्रो शक्य !

$
0
0
नाशिक शहराला मेट्रोची गरज असल्यास त्याचा सरकारकडून सकारात्मक विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात लेखी उत्तराद्वारे सांगितले आहे. 

डांबरीकरणासाठी महिला रस्त्यावर

$
0
0
महापालिकेने लॅमरोडचे डांबरीकरण विनाविलंब करावे या मागणीसाठी विहीतगाव येथील प्रभाग क्रमांक ६१ मधील महिलांनी मंगळवारी अचानक रास्ता रोको आंदोलन करून महापालिका प्रशासनाला धक्का दिला.

...हा तर दबाव टाकण्याचा प्रयत्न

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयातील धान्य वितरण विभागात झालेली चोरी ही प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी झाली आहे काय, असा संशय आम्हाला येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांच्या अहवालानंतर कारवाई करणे शक्य

$
0
0
कारवाईची भीती दाखवून डॉक्टरांकडून पैसे उकळणाऱ्या तिघा जणांविरोधात अंबड पोलिसांनी धमकावणे, तोतयागिरी करणे आदी कलमानुसार सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

तहसील कार्यालयासमोर कामगारांचे ठिय्या आंदोलन

$
0
0
विधवा, घटस्फोटीत महिला, ज्येष्ठ नागरिक, विडी कामगार, जरी कामगार व मजुरांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी सेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शेळीगट खरेदीच्या अटीवरून येवल्यात शेतकऱ्यांचे उपोषण

$
0
0
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांनी चाळीसगाव तालुक्यातून खरेदी केलेल्या शेळ्यांपैकी काही शेळ्या मृत झाल्याने, चाळीसगाव तालुक्यातून शेळ्या खरेदीची अट शासनाने रद्द करावी, या मागणीसाठी शेळीगट मंजूर असलेल्या शेतकऱ्यांनी येवला तहसील कार्यालयासमोर उपोषण केले.

शरयु अपार्टमेंटला दुरवस्थेचा विळखा

$
0
0
विसे मळा येथील रामदास गार्डन जवळील शरयु अपार्टमेंट परिसराची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सोसायटी परिसर तसेच पार्किंग आवारात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

वास्तूनगरची पाइपलाइन महापालिकेकडून अखेर दुरुस्त

$
0
0
अशोकनगर येथील वास्तूनगरमध्ये गळती असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनमुळे तीन महिन्यांपासून खड्डा पडला होता. यासाठी स्थानिक रहिवाश्यांनी पडलेल्या खड्यातच वृक्षारोपण केले होते.

सुरक्षारक्षकांचीच सुरक्षा धोक्यात

$
0
0
महाराष्ट्र सरकारच्या सुरक्षारक्षक मंडळाकडून वेळेत पुरेशा सुविधा मिळत नसल्यामुळे सुरक्षारक्षकांनी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन केले.

टेंडरसाठी पदाधिकाऱ्यांना जुन्या पद्धतीचाच लोभ

$
0
0
राज्य सरकारच्या नव्या ई-निविदा पद्धतीला प्रतिसाद मिळत नसल्याने आणि त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने पाच लाखापर्यंतच्या कामासांठी अॉनलाइन पेमेंट स्वीकारण्याऐवजी धनादेशानेच पेमेंट स्वीकारावेत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.

छावा संघटनेचे धरणे

$
0
0
गोवंश हत्त्या बंदी कायदा लागू करावे आणि गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता द्यावी, या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री गुरुवारी नाशिक दौऱ्यावर

$
0
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या गुरुवारी (२६ डिसेंबर) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार असून, नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला आहे.

वैद्यकीय बिले थकविण्याचे गौडबंगाल काय?

$
0
0
शिक्षकांच्या वैद्यकीय बिलापोटी शिक्षण मंडळाकडे १८ लाख रुपये जमा आहेत. ऑक्टोबर महिन्यात खात्यावर पैसे वर्ग होऊनही ते अद्यापपर्यंत शिक्षकांना मिळत नसल्याने यात गौडबंगाल असल्याचा संशय भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी व्यक्त केला.

नाशिकरोड बसस्थानकात अस्वच्छतेचे साम्राज्य

$
0
0
नव्या इमारतीमुळे नाशिकरोड येथील बसस्थानकाला झळाली प्राप्त झाली असली तरी स्वच्छतेबाबत येथे अनास्थाच आहे. स्थानक परिसराला प्रवासी, भिकारी यांनी स्वच्छतागृहाचे स्वरुप दिले आहे.

वाळूची छुप्या मार्गाने तस्करी

$
0
0
नाशिक परिसरात सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे वेगाने सुरु आहेत. परंतु, त्यात पाच महिन्यांपासून नदीतून वाळूचा उपसा बंद झाल्याने व्यावसायिकांना वाळू नसल्याने काम बंद ठेवावे लागत आहे.

ग्रेप प्रोसेसिंग बोर्डावर गंडांतर?

$
0
0
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या मटण आणि पोल्ट्री बोर्डापाठोपाठ द्राक्ष प्रक्रिया उद्योगासाठी कार्यरत असलेल्या इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्डावरही (आयजीपीबी) गंडांतर आले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images