Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जमिनीचा योग्य मोबदला द्या

$
0
0
नाशिकरोड ते सिन्नर या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमीन घ्या पण सर्वोत्तम मोबदला द्या, अशी कळकळीची विनंती शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची जनसुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झाली.

लाचखोर तलाठी दिंडोरीत अटकेत

$
0
0
शेतजमिनीवरील हक्कसोड पत्राचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना द‌िंडोरी तालुक्यातील व‌िनायक लोखंडे या तलाठ्यास अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराकडून तलाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना अॅन्टीकरप्शन व‌िभागाला आढळून आला.

शिक्षकांचं `बिऱ्हाड` धडकलं!

$
0
0
आदिवासी आश्रमशाळांमध्ये दहा-पंधरा वर्षांपासून तासिका तत्वावर काम करणारे शिक्षक आणि रोजदांरीवर कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सेवेत नियमित करण्यासाठी आदिवासी आयुक्तालयावर बिऱ्हाड मोर्चा आणला आहे.

...तर सिन्नर चौपदरीकरण रद्द

$
0
0
नाशिकरोड ते सिन्नर रस्त्याचे चौपदरीकरण दोन वर्षांपासून रखडले असून येत्या जानेवारी अखेरपर्यंत ते मार्गी लागले नाही तर हा प्रकल्पच रद्द करण्याचा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिला आहे.

शेतकरी संघटना उतरली रस्त्यावर

$
0
0
बाजार समित्यामंध्ये व्यापाऱ्यांकडून अडत घेण्याचा निर्णय अठ्ठेचाळीस तासांतच फिरवणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात युतीतील घटक पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

चॉकलेटी दुनिया

$
0
0
चॉकलेट्स म्हटलं की लहानांपासून मोठेही त्याच्या प्रेमात पडतात. हे चॉकलेट्स घरच्या घरी बनविता आले तर हवं तेव्हा त्याची मजा लुटता येईल. म्हणूनच ‘महाराष्ट्र टाइम्स’मार्फत चॉलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते.

रेखाचित्रांमधून साकारला फूटबॉल

$
0
0
काही बोटांमधून रेखाटल्या जाणाऱ्या रेषा मुक्तपणे धावतात, मध्येच वाकडी वळणे घेतात, तिरकस झुकतात आणि एक प्रतिमा तयार होते. हे जादुई हात प्रत्येकाजवळ नसतात, फार थोडक्यांनाच ते लाभतात.

`की टू नाशिक-त्र्यंबक’ उलगडणार इतिहास

$
0
0
नाशिकच्या इतिहासाच्या छटा समोर आणणारी अनेक पुस्तके स्वातंत्र्यापूर्वी लिहिली गेली होती. यातील अनेक पुस्तके आता उपलब्धही नाहीत. मात्र, १९४२ मध्ये हंसराज प्रेमानंद यांनी गुजराती भाषेत लिहिलेले ‘की टू नाशिक-त्र्यंबक’ हे पुस्तक सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी अनुवादीत करीत असून हे नाशिकच्या अनेक पैलुंवर यामुळे प्रकाश पडणार आहे.

१२ हजार कोटींच्या वसुलीसाठी ठोस निर्णयांची गरज

$
0
0
राज्यातील वीज ग्राहकांकडे बिलांपोटी १२ हजार कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे. ही रक्कम वसूल होण्यासाठी ठोस निर्णयाची आवश्यकता आहे.

‘गोडसे’ शब्द असंसदीय ठरविण्यावर आक्षेप

$
0
0
राज्यसभेत राष्ट्रपिता महात्मा गांधीचे मारेकरी असलेल्या नथुराम गोडसे याच्यांवर सुरू असलेल्या वादात सभापतींनी गोडसे हा शब्द असंसदीय ठरविण्याच्या प्रकाराला नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी नामसाधर्म्यामुळे यावर आक्षेप घेतला आहे.

नार-पारच्या सर्वेक्षणासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर

$
0
0
नार-पार, अंबिका, औरंगा खो-यांतील उपसा जोड योजनेचे सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषण करून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ३ कोटी ६३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास जलसंपदा विभागाच्या वतीने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

फ्रीज स्फोट, घरातील साहित्य खाक

$
0
0
बागलाण तालुक्यातील निताणे येथे फ्रीजचा स्फोट होवून घराला लागलेल्या आगीत संसार उपयोगी साहित्य खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. निताणे येथील शरद पांडूरंग खैरनार हे दादाजी अहिरे यांच्या घरात भाडेकरी म्हणून वास्तव्यास आहे.

समस्यामुक्त बागलाण साकारेल काय?

$
0
0
बागलाण तालुक्यातील शेती, सिंचनासह आरोग्य, वीज, व रस्ते या समस्या कायमच असल्याने या समस्यामुक्त बागलाणचे स्वप्न साकार होईल काय, असा सवाल सर्वसामान्य बागलाणवासियांना पडला आहे.

लाल कांद्याच्या आवकेत चारपट वाढ

$
0
0
मंगळवारच्या कांदा लिलाव सुटीनंत बुधवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात मोठया संख्येने कांदा ट्रक्टर दाखल झाल्याने आवार अक्षरशः फुल्ल झाले होते. लिलावासाठी मंगळवारीच ट्रक्टर बाजार समितीत दाखल झाले असल्याने आज सकाळी नव्याने दाखल झालेल्या ट्रॅक्टरांना जागाच नव्हती.

सौंदाणे-देवळा रस्ता प्रवाशांची पाहतोय परीक्षा

$
0
0
सौंदाणे-देवळा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, सिंहस्थाच्या निधीतून सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू असले तरी त्याची गुणवत्ता चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काटेकोरपणे लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मेशीचे माजी सरपंच गंगाधरमामा शिरसाठ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

$
0
0
नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर महाविद्यालयासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी युवकाचा मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.

लिग्रांड कंपनीत कामबंद आंदोलन

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीतील लिग्रांड कंपनीतील कामगारांनी कंपनी प्रवेशद्वारावरच चार दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यात कामगारांनी अठरा महिन्यांपासून प्रलंबित असलेला वेतनवाढीचा करार मंजूर करण्याची मागणी केली आहे.

नव्या वर्षात पोस्टाने मिळणार रेशनकार्ड

$
0
0
रेशनकार्डच्या कामकाजातील अनागोंदी ‘मटा’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर आता थेट पोस्टाने रेशनकार्ड वितरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्या वर्षात ही सेवा सुरू होणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला आहे.

सिंहस्थाच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करा

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी विकास कामांचे सूक्ष्म नियोजन करावे आणि मेळ्याचा कालावधी पावसाळ्यातील असल्याने कामाच्या दर्जाकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे निर्देश विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी दिले.

महिलांचे आंदोलन अन् मनपाचा सुखद धक्का

$
0
0
महापालिकेने लॅमरोडचे डांबरीकरण विनाविलंब करावे या मागणीसाठी विहितगाव येथील प्रभाग क्रमांक ६१ मधील महिलांनी मंगळवारी अचानकपणे रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाला धक्का दिला होता.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images