Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

२११ लेटलतीफांवर आयुक्तांची कारवाई

$
0
0
महापालिकेत गत महिन्यात उशिरा येणाऱ्या ७८४ पैकी २११ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधानकारक खुलासा सादर न केल्याने आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

डॉ. गायकवाड यांचा पोलिसांनी घेतला जबाब

$
0
0
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठविल्याचे सांगून अंबड लिंकरोडवरील केवलपार्क येथील डॉ. वाजे यांच्याकडे लाच मागणी तिघे आरोपी अद्याप फरार आहेत. दरम्यान, या प्रकरणी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड यांची अंबड पोलिसांनी बुधवारी जाब घेतला.

ओझरखेड कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

$
0
0
ओझरखेड कालव्याचे पाणी मिळावे यासाठी लासलगाव जवळील वाहेगाव साळ, टाकळी(विं) पिंपळद वाकी आदि गावांतील शेतकरी आमरण उपोषणास बसले आहे. जोपर्यंत पाणी पाटचारी क्र. ३४ पर्यंत येत नाही, तोपर्यंत उपोषण चालूच राहील, असा निर्वाणीचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.

पंचवटीतून मशिनरी चोरीस

$
0
0
पंचवटीमधील एका घरामधून वेल्डींग मशिन, मोटार पंप, टेबल फॅन अशा वस्तू चोरीस गेल्या आहेत. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.

मुलीला पळविणाऱ्यास सक्तमजुरी

$
0
0
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सतीश पांडुरंग भामरे (३०, रा. पंचवटी) असे त्या आरोपीचे नाव आहे.

नियुक्तीच नाही तर चौकशी कशी?

$
0
0
महापालिका हद्दीत ड्रेनेजचे काम करताना तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यूमुखी घडल्याची घटना जिल्हा प्रशासनासाठी अत्यंत किरकोळ बाब आहे की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

समायोजनेच्या नावाखाली शिक्षकाच्या ‘अर्थ’पूर्ण बदल्या

$
0
0
नाशिक महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला असून समायोजनांच्या नावाखाली शिक्षकांच्या अर्थपूर्ण बदल्या केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

पिचडांचा पळ !

$
0
0
आदिवासी सांस्कृतिक एकता संमेलनाच्या तयारीसाठी बुधवारी नाशिकमध्ये येणाऱ्या माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी आश्रमशाळा शिक्षकांच्या बिऱ्हाड आंदोलनामुळे थेट दौराच रद्द केला.

सायकलिंगला हवा प्रशासनाचा बूस्ट

$
0
0
नाशिक महापालिकेने इतर खेळांना चालना देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले असताना जनमानसात प्रसिध्द होत असलेल्या सायकलिंगकडे मात्र कानाडोळा केला आहे. नाशिक महापालिकेने केंद्र सरकारच्या ‘नॉन मोटराईज्ड ट्रान्सपोर्टला’ प्रोत्साहन देण्यासाठी अजूनही कोणतीही पावले उचललेली नाहीत.

पुणे, धुळेसाठी नॉनस्टॉप बसेस

$
0
0
नाशिक-पुणे प्रवास अधिक सुकर व्हावा आणि प्रवाशांना पाच तासांच्या आत पुण्याला पोहोचता यावे यासाठी नाशिकहून पुण्यासाठी नॉनस्टॉप बसेस सोडण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. नववर्षात १ जानेवारीपासून या सेवेचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे.

सिन्नर बनतंय मटक्याचं माहेरघर

$
0
0
सिन्नर शहर व परिसरात मटक्याच्या अड्ड्यांनी डोके वर काढले आहे. युती शासनाच्या काळात बंद झालेले मटक्याचे धंदे, आघाडी सरकारच्या काळातही बंद होते. आता मात्र पुन्हा युती शासनाच्या काळात सदर धंदे बंद असणे आवश्यक असताना आता हे बेकादेशीर धंदे राजरोस सुरू झाले आहेत.

उघड्या नाल्यात हॉटेलचे सांडपाणी

$
0
0
गंगापूररोडवरील बारदान फाट्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलचे सांडपाणी उघड्या नाल्यात सोडले आहे. यामुळे सोडलेल्या सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून पादचारी व वाहनचालकांना नाक, तोंड कपड्याने झाकून प्रवास करावा लागत आहे.

शिक्षकांच बिऱ्हाड आंदोलन सुरूच

$
0
0
आदिवासी विकास मंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळत नसल्याने आदिवासी आश्रमशाळामंधील तासिका शिक्षक आणि रोजदांरी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम आहे. संघटनेचे प्रमुख पदाधिकारीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याने चर्चा अर्धवट राहील्याने प्रशासननही हतबल झाले आहे.

वर्षभरात डेंग्यूचे ४९२ रुग्ण

$
0
0
नाशिक शहरातील ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. डिसेंबर महिन्यात शहरात नव्याने ६३ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वर्षभरात शहरात घेण्यात आलेल्या ११६६ डेंग्यूच्या संशयितांपैकी तब्बल ५९२ रुग्णांचे अहवाल पॉझीटिव्ह आला आहे.

रुग्णांच्या वेळबचतीसाठी टेलिमेडिकल प्रणाली

$
0
0
एकदा उपचार घेऊन गेलेल्या रुग्णांना पूनर्तपासणीसाठी पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यावे लागू नये, यासाठी सुरू केलेल्या टेलिमेडिकल प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

सिव्हिलमध्ये आणखी एक इर्मजन्सी वॉर्ड

$
0
0
अपघात आणि तत्सम आपत्कालीन परिस्थितीमध्ये एकाच वेळी २० रुग्णांना दाखल करता यावे यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणखी एक सुसज्ज तात्कालिक कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधील तात्कालिक कक्षांमधील एकूण बेडची संख्या आता ५० पर्यंत पोहोचली आहे.

अग्निशमन केंद्रांची उद्योजकांना प्रतीक्षा

$
0
0
सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत लघु, मध्यम व मोठे दीड हजारांपेक्षा अधिक उद्योग आहेत. यात सातपूर औद्योगिक वसाहतीत अग्निशमन केंद्र आहे तर अंबडला अग्निशमन केंद्रासाठी जागा देण्यात आली आहे.

अखेर सूर्यकांत गवळी यांची गच्छंती

$
0
0
राज्याच्या ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा असला तरी केंद्रीय मंत्र्याचा बडेजाव मिरविणाऱ्या सूर्यकांत गवळी यांची राज्य सरकारने अखेर गच्छंती केली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय ग्राहक दिनालाच गवळी यांना अध्यक्षपदावरुन डच्चू देण्यात आला आहे.

स्ट्रॉबेरीवर करपाचा प्रादुर्भाव

$
0
0
अवकाळी पाऊस व गेल्या आठवड्यात गारपीट झाल्यामुळे कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी स्ट्रॉबेरी उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामानातील या बदलाचा पिकावर परिणाम झाला असून, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे फळधारणा मंदावली आहे.

‘त्या’ प्राथमिक शिक्षकांचे आदेश रद्द करा

$
0
0
राज्यातील इतर जिल्हा परिषदांच्या कार्यक्षेत्रातून आंतरजिल्हा बदलीने नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात बदलून येण्याकरिता चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नाशिक जिल्हा परिषदेने ३५२ प्राथमिक शिक्षकांना ना हरकत प्रमाणपत्र दिले होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images