Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पर्यटन क्षेत्रातील उगवता तारा नाशिक

$
0
0
जगभरातील पर्यटन व्यवसायाची समीकरणे बदलत चालली आहेत. पर्यटकांच्या अपेक्षेनुसार आवश्यक असलेल्या पर्यटन विषयक बाबी नाशिक परिसरात खच्चून भरलेल्या असल्याने येणारा दिवस हा नाशिक जिल्ह्याला पर्यटन व्यवसायातून नानाविध रोजगारांच्या संधी निर्माण करून देणारा व त्या माध्यमातून नाशिकचे अर्थकारणाचाही विकास करणारा असेल.

कृषीनगरात ‘सायकल सर्कल’

$
0
0
सायकल वापराचा प्रसार व प्रचार व्हावा, यासाठी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या पुढाकाराने व ग्रीन स्पेस रिएलटर्सचे तेजस चव्हाण यांच्या सह्योगाने नाशिकच्या कृषीनगर येथील जॉगिंग ट्रॅक परिसरात भारतातील पहिले सायकल सर्कल साकारणार आहे.

पोलिसांच्या निषेधार्थ रास्तारोको

$
0
0
बाजार समितीमधील व्यापाऱ्यांच्या लुटमारीच्या घटना सातत्याने घडत असूनही पोलिसांकडून ठोस कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांसह बाजार समितीशी संबंधित विविध घटकांनी रास्तारोको आंदोलन केले.

केटीएचएममध्ये भरली योगाची शाळा

$
0
0
विद्या आत्मसात करायची तर त्याला वयाचे बंधन कशाला हवे. केवळ शिकण्याची इच्छा तेवढी हवी. अशीच इच्छाशक्ती असलेल्या अबालवृध्दांचे पाय रविवारी गंगापूर रोडवरील केटीएचएम कॉलेजच्या प्रांगणाकडे वळाले. येथे धडे गिरविण्यात येणार होते योगाचे अन् ते देणार होते योगगुरू रामदेव बाबा.

मद्यपी वाहनचालकांवर होणार कारवाई

$
0
0
सरत्या वर्षाला निरोप देताना कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसविली जाऊ नये यासाठी वाहतूक विभाग मद्यपी आणि बेशिस्त वाहनधारकांवर लक्ष ठेऊन असणार आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला पोलिसांच्या वाहतूक विभागाची ही मोहीम सुरू राहणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प...आज कार्यशाळा

$
0
0
येत्या फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात काय हवं, यासंबंधीचे विशेष सादरीकरण सोमवारी, २९ डिसेंबर रोजी होणार आहे. लघुउद्योग भारतीने आयोजित केलेल्या या सादरीकरणाचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ मीडिया पार्टनर आहे.

बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याची गरज

$
0
0
राज्यात शेतकऱ्यांच्या अजुनही मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत असून त्या टाळण्यासाठी सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहून त्यांचे बळ वाढविले पाहिजे; तसेच शेतकऱ्यांनीही खचून न जाता आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. रमेश ठाकरे यांनी केले.

नगररचना विभागासाठी उपसंचालक मिळणार

$
0
0
महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे नगररचना विभागासाठी सहायक संचालकाऐवजी उपसंचालक दर्जाचा अधिकारी मिळावा म्हणून महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.

त्र्यंबकचा पाणीपुरवठा विस्कळीत

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे नाताळ सहलींनी शहारात गर्दीचा उच्चांक झाला आहे. मात्र, चार दिवसांपासून नळाला पाणी आलेले नसल्याने नागरिकांबरोबरच भाविकांनाही पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

सप्तशृंग गडावर दुर्गाष्टमी पूजा

$
0
0
श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर आज (दि. २९) दुर्गाष्टमीनिमित्त संस्थानतर्फे नवचंडी व होम हवन पूजेच आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता संस्थानच्या कार्यालयातून पादुकांचा पालखी सोहळा आयोजित केला आहे.

सुप्रीम कंपनीचे कामगार वाऱ्यावर

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीती नाईस भागात असलेल्या सुप्रिम इक्वीपमेंट कंपनीतील ४५ कामगार कंपनी व्यवस्थापनाने वाऱ्यावर सोडले आहेत. यात दोन महिन्यांपासून कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामगारांनी पाळीनुसार धरणे आंदोलन केले आहे.

मटण दुकाने एफडीएच्या रडारवर

$
0
0
अन्न सुरक्षा व मानक कायदा ऑगस्ट २०११ नुसार अन्न व औषध विभागाकडे नोंदणी नसलेल्या चार मटण शॉप्स मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

पुलाखाली सापडला तोफगोळा

$
0
0
देवळालीगावाजवळील विहीतगाव पुलाखाली आज दुपारी वालदेवी नदीत लष्करी बनावटीचा तोफगोळा सापडला. यामुळे पुलाचे काम आज थांबविण्यात आले असून हा तोफगोळा सोमवारी लष्कराच्या ताब्यात दिला जाणार आहे.

कविताची ‘सुवर्ण’ हॅट्ट्रिक

$
0
0
कोलकाता येथे रविवारी झालेल्या मॅरेथॉनमध्ये नाशिकची राष्ट्रीय धावपटू सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हिने २५ किलोमीटर गटात प्रथम क्रमांक मिळवला. नुकत्याच गोवा आणि वसई येथे झालेल्या स्पर्धांमध्येही तिने नेत्रदीपक यश मिळवले होते.

पालिका उपकेंद्रांना ब्रेक?

$
0
0
पाणीपट्टी तसेच घरपट्टी बिले भरण्यासाठी सोयीची ठिकाणे म्हणून सुरू करण्यात आलेल्या उपकेंद्रांवर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो आहे. चार ते पाच कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एकत्रित वेतना इतका महसूलसुध्दा महापालिकेला मिळत नाही. त्यामुळे अशा १६ उपकेंद्राऐवजी नागरी सेवा केंद्र सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

कॉफी टेबलमधून नाशिकची स्पंदने

$
0
0
झपाट्याने महानगराकडे झेपावणाऱ्या नाशिकच्या विविध स्पंदनांचा आणि वाटचालीचा लेखाजोखा घेणाऱ्या ‘नाशिक रायझिंग – एक पाऊल पुढे’ या उपक्रमाला कॉफी टेबल बुकच्या रुपाने अविस्मरणीय ठेव्याचे स्वरुप देण्यात आले आहे.

मजुरांच्या सतर्कतेमुळे बचावले विहीतगावकर

$
0
0
देवळाली गावाजवळील विहीतगाव पुलाखाली रविवारी नदीपात्रात सापडलेला तोफगोळा जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुलाखाली खोदकाम करणा ऱ्या मजुरांच्या सतर्कतेमुळे विहीतगावकरांचे जीव बचावल्याची भावना सोमवारी देवळाली व नाशिकरोड परिसरात उमटली.

शासकीय दूध डेअरी पुन्हा सुरू होणार?

$
0
0
दुधाच्या पुरवठ्यासह अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या अभावी बंद पडलेली शासकीय दूध डेअरी पूर्ववत सुरू करण्याचे संकेत महसूल व दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसेंनी दिले आहेत.

नाशिकला मिळणार रेडिरेकनरबाबत दिलासा

$
0
0
गेल्या वर्षी र‌ेडिरेकनरमध्ये अवास्तव वाढ झाली. यामुळे स्टॅम्प ड्युटी ३५ ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढली. याचा परिणाम घरांच्या किंमतीवर झाला. दुर्दैवाने संबंध वर्षात र‌ेडिरेकनर कमी करण्यात यश मिळाले नाही.

फळबागांसाठी राष्ट्रीय योजनेतून मदत

$
0
0
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळबागांचे जवळपास चार हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असून एवढी भरपाई करणे सरकारला शक्य नसल्याची कबुली कृषी मंत्री एकनाथ खडसेंनी दिली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images