Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वैद्यकीय सेवा व ग्राहक संरक्षण

$
0
0
रुग्णांची तपासणी, रोगनिदान, औषधोपचार व शस्त्र‌क्र‌िया अशा वैद्यकीय सेवा पैसे देऊन विकत घेणाऱ्या ग्राहकास कधी सेवेत त्रुटी तर कधी फसवणूक झाल्याचे जाणवते. त्यातूनच त्याला मन:स्ताप होतो. अशा ग्राहकाला ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत दाद मागता येते. सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निकालातही याबद्दल स्पष्ट केले आहे. (विनामूल्य-धर्मार्थ औषधोपचार-ग्राहक सेवा घेणाऱ्यांचा यात समावेश होत नाही.) खरेतर वाद न झाल्यास रुग्ण व डॉक्टर या दोघांमध्ये विश्वास निर्माण होईल व आरोग्य सेवेचा दर्जाही वाढेल.

धामणशेतच्या ‘त्या’ दोघींची भुताटकीच्या संशयावरून हत्या

$
0
0
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर सीमारेषेवरील डुबेवाडीतील मांत्रिकाच्या सांगण्यावरून मोखाडा तालुक्यातील धामणशेत येथील तीन महिलांना भुताटकीन असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला होता.

‘पीके’ विरोधात भाजपचे नाशिकरोडला आंदोलन

$
0
0
अभिनेता अमीर खानच्या पीके चित्रपटाच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे नाशिकरोड येथील सिनेमॅक्स चित्रपटगृहाबाहेर सोमवारी आंदोलन करण्यात आले.

आरोग्य विभागाच्या वेतनात अनियमितता

$
0
0
त्र्यंबकेश्वर पंचायत समितीत शिक्षण विभागाच्या पाठोपाठ आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अनियमितता उघड झाली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव त्र्यंबकला फूल, नारळाला बंदी

$
0
0
त्र्यंबकेश्वर मंदिरात १ जानेवारी २०१५ पासून फूल, नारळांना बंदी या निणर्यावर विश्वत मंडळ कायम असल्याचे रविवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले आहे.

सोनसाखळी चोरांचा कळवणमध्ये सुळसुळाट

$
0
0
कळवण शहरात मंगळसूत्र व चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले असून, महिलांमध्‍ये असुरक्षितचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या मोटरसायकलवरून महिलांच्या अंगावरील मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.

धावत्या रेल्वेत चोऱ्यांचे वाढते प्रमाण

$
0
0
देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी हमखास रेल्वे मिळणारे स्टेशनचे गाव म्हणून नावलौकिक असणाऱ्या मनमाड रेल्वे स्थानकाला सध्या धावत्या रेल्वेतील चोऱ्या आणि रेल्वे फलाटावरील शर्विलकांच्या छोट्या मोठ्या हाथ की सफाईच्या घटनांनी त्रस्त केले आहे.

गहाळ फायलींची आयुक्तांमार्फत चौकशी

$
0
0
उद्यान विभागातील गहाळ झालेल्या ४५२ फाईल्सचा शोध घेण्याचे काम आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सुरू केले आहे. हायकोर्टाने तसे निर्देश दिले असून उद्यान, लेखा आणि ​लेखा परिक्षण विभागातील टोलवाटोलवीतील सत्य यामुळे बाहेर येण्याची शक्यता आहे.

जुने नाशिकला ‘चक्का जाम’चा शाप

$
0
0
जुने नाशिक येथील सारडा सर्कल ते द्वारका या शहराच्या मुख्य रस्त्यावर ट्रकसह विविध वाहने तासनतास उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन या मुख्य रस्त्यासह जुने नाशिक परिसरात चक्का जामचा अनुभव रोजचाच आहे.

ओतूर धरणाचा प्रश्न लवकरच सुटणार

$
0
0
ओतूर धरणाच्या गळती थांबविण्याचे तब्बल चाळीस वर्षांपासून प्रलंबित काम कळवणचे आमदार जे. पी. गावित यांच्या पुढाकाराने लवकरच मार्गी लागणार आहे. या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी धरणक्षेत्रातील अकरा शेतकरी, तहसीलदार व स्वतः आमदार यांचा समावेश असलेली नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.

‘रघुरामां’ची खडसेंकडून पाठराखण

$
0
0
शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफीचा उपयोग होत नसल्याचे रिझर्व्ह बँकेच गर्व्हनर रघुराम राजन यांच्या वक्तव्यावर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी टीका केली असतानांच, राज्याचे महसूल व कृषी मंत्री एकनाथ खडसेंनी मात्र राजन यांची पाठराखण केली आहे.

लाल कांद्याच्या दरात घसरण

$
0
0
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत दिवसेंदिवस वाढ होत असून, बाजारभावात घसरण होत आहे. गत सप्ताहात लाल कांद्याला सुमारे १ हजार आठशे रुपयांचा उच्चांकी दर मिळाला होता तर, सरासरी भाव १ हजार ६९० रुपयांपर्यंत होते.

वाहन चोरी, बॅग लिफ्टिंगने हैराण

$
0
0
गुन्हे कधीच कुणी थांबू शकत नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी सातत्याने सांगत असतात. त्यात तथ्यही आहे. तरीही गुन्हेगारी रोखणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे उत्तरदायित्व कायम राहातेच. यंदाचे वर्षही गुन्हेगारी घटनांनी भरून वाहिले. नाही म्हणायला गतवर्षापेक्षा २०१४ मध्ये खून, चैन स्नॅचिंग, चोऱ्या, घरफोड्यांचे प्रकार कमी झाले. परंतु, खूनाचा प्रयत्न, वाहन चोऱ्या, अपहरण, बॅग लिफ्टिंग यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढच झाली.

नव्या वैज्ञान‌किांच्या पाठीवर द्या शाब्बासकीची थाप !

$
0
0
‘व‌ज्ञिान प्रदर्शने ही केवळ शालेय अभ्यासक्रमाचा भागच नाहीत तर नव्या वैज्ञान‌किांना हेरून त्यांना प्रोत्साहन देणारे हे व्यासपीठ आहे. या सर्जनशील उपक्रमात सहभागी होणाऱ्या व‌द्यिार्थ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप द्या,’ असे आवाहन ज‌ल्हिा परिषदेच्या अध्यक्षा व‌जियश्री चुंबळे यांनी केले.

‘अजिंक्य’ रहा..!

$
0
0
‘त्याची’ बॅट सध्या ‘अजिंक्य’ रहा असा आशिर्वाद घेऊन ग्राऊंडवर अवतीर्ण होत आहे असे वाटतयं ! २०१४ हे वर्ष अजिंक्य रहाणेला भारतीय संघात आपले स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे ठरले काल अचानक ‘रश ऑफ ब्लड’ त्याच्या खेळात दिसले व तो ४८ वर बाद झाला अन्यथा संपूर्ण मालिकेत त्याने अतिशय संयमाने फलंदाजी केली.

रेल्वेतही मिळतोय ताजा भाजीपाला

$
0
0
भाजी घ्या भाजी, ताजी ताजी मेथी असे रोजच्या बाजारात अथवा ग्रामीण भागात, आठवडे बाजारात कानी पडणारे स्वर आता मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस किंवा मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्ये कानावर पडले तर, आश्चर्य वाटायला नको.

घरकुलच्या नावाखाली वीस जणांना फसविले

$
0
0
तालुक्यातील आमदर व लिंगामा या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याने पंधरा ते वीस नागरिकांना इंदिरा आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करून देतो, असे सांगून प्रत्येकी पाच हजार रुपये गोळा केले.

तरुणांनो दारू नको; दूध प्या!

$
0
0
वर्षाचा शेवटचा दिवस ३१ डिसेंबर म्हटले की सेलिब्रेशन, पार्टी ओघाने आलीच. विशेषतः तरुणाई तर, या दिवसाची जोरदार तयारी करते. मात्र, केवळ फॅशनच्या नादात व्यसनाधीनतेच्या आहारी जणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

आरोग्य केंद्र समस्यांच्या गर्तेत

$
0
0
एकीकडे देशभर स्वच्छता अभियान राबविण्यास प्राधान्य दिले जात असतानाच लासलगाव जवळील निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसराला चोहोबाजूंनी कचरा आणि घाणीचा विळखा पडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

नायलॉन धागा विक्रीवर बंदी आणा

$
0
0
सिन्नर शहराच्या विविध भागात नायलॉन धाग्याची विक्री सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने या नायलॉन विक्रीवर बंदी घातलेली असताना येथे होणाऱ्या विक्रीकडे दुर्लक्ष झाल्याने विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images