Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

प्रदूषण केल्यास जप्ती, फौजदारी

$
0
0
रामकुंडाच्या ठिकाणी गोदावरी नदीपात्रालगत वाहने आणि कपडे धुणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे. नदीचे प्रदूषण करणाऱ्यांकडील साहित्य जप्त करण्याबरोबच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

पालकमंत्री घेणार सिंहस्थाचा आढावा

$
0
0
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सिंहस्थ समन्वयक गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली येत्या गुरुवारी सिंहस्थ आढावा बैठक होणार आहे. पालकमंत्री पहिल्यांदाच ही बैठक घेणार असून, त्यानंतर ते सिंहस्थ कामांचा पाहणी दौराही करणार आहेत.

कॉमर्समध्ये अफाट संध‌ी

$
0
0
सद्यस्थ‌तिीत भारताचे अर्थकारण हे सेवा क्षेत्रावर बहुतांशी अवलंबून आहे. या क्षेत्राचा द‌विसेंद‌विस देशात होणारा व‌स्तिार लक्षात घेता कॉमर्स व‌द्यिाशाखेत व‌द्यिार्थ्यांना करिअरच्या अफाट संधी आहेत, असा सूर सी. ए. व‌द्यिार्थी राष्ट्रीय परिषदेत व्यक्त झाला. महाकवी काल‌दिास मंद‌रिात आयोज‌ति दोन द‌विसीय परिषदेचे मंगळवारी सकाळी उद्घाटन झाले.

६२ कोटींची विक्रमी वसुली

$
0
0
बँक खाते गोठवण्याची मोहीम बंद करण्यात आली. त्यातच स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द होण्याच्या राजकीय घोषणा सुरू झाल्या. या नकारात्मक परिस्थितीत देखील आजवरचा उच्चांक एलबीटी वसुलीने मोडला असून, डिसेंबर महिन्यात तब्बल ६२ कोटी रुपयांचा महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे.

नववर्षात अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0
सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून रस्त्यावर आलेली सर्व अतिक्रमणे हटवण्यासाठी नववर्षात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. विशेषतः महापालिकेच्या ताब्यातील रस्ते आणि त्यावरील सामासिक अंतर मोकळे करण्यास प्राधन्य दिले जाणार आहे.

अन् सुटकेचा सुस्कारा

$
0
0
दहशतवादी हल्ल्यांच्या सावटाच्या पार्श्वभूमिवर पोलिस राबवित असलेल्या दक्षता अभियानास नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. जुने नाशिकमधील इगतपुरीवाला चाळसमोर भर वर्दळीच्या ठिकाणी आढळलेली बेवारस बॅग उचलून बघण्याऐवजी थेट पोलिसांना कळविण्याची जागरुकता नागरिकांनी दाखविली.

सरत्या वर्षाने पेरला आशावाद!

$
0
0
काळाच्या कुठल्याही टप्प्यावर प्रश्न संपत नाहीत. केवळ त्यांचे स्वरूप बदलत असते. संघर्षाच्या एका वळणावर काही प्रश्नांची उत्तरे कालांतरांने सापडतात. सरत्या वर्षाला म्हणजेच सन् २०१४ ला न‌िरोप देताना या वर्षाने नाश‌िकच्या शैक्षण‌िक वर्तुळाला काय द‌िले, काय राहिले?

कचरा डेपोला सहसंचालकांची भेट

$
0
0
नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी बुधवारी प्रभाग ३४ मधील चेहेडी-चाडेगावातील प्रस्तावित कचरा डेपोची पाहणी केली. भाजपचे नेते बाजीराव भागवत, सुनील आडके, नगरसेविका शोभा आवारे आदी यावेळी उपस्थित होते.

वीस वर्षांपासून पाण्यासाठी वंचित

$
0
0
नाशिक महापालिका हद्दीत समाविष्ट होऊन २० वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पिंपळगाव बहुला गावातील शेती शिवारातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महापालिकेकडून अजुनही पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही.

आणखी दोन एफएम स्टेशन्स!

$
0
0
विविध क्षेत्रात आघाडी घेणाऱ्या नाशिक शहरात यंदाच्या वर्षात आणखी दोन एफएम स्टेशन्स दाखल होणार आहेत. विविध एफएम कंपन्यांनी प्रसार भारतीकडे अर्ज सादर केले असून येत्या काही महिन्यातच नाशकात दोन नवे एफएम स्टेशन्स सुरु होणार आहेत.

जलसंपदातील घोटाळ्यांची चौकशी

$
0
0
‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागात झालेल्या अनेक घोटाळ्यांची चौकशी सुरू असून या सर्व गैरव्यवहारांचा तपशील दोन आठवड्यांत जाहीर करू,’ असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे सांगितले.

गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

$
0
0
आम्ही नार्को टेस्टला तयार आहोत. पण आमच्या आधी जे आघाडी सरकार होते त्यावेळी जलसंपदा विभाग सांभाळणाऱ्या अजित पवार आणि सुनील तटकरे यांचीही चौकशी करा, असे प्रत्युत्तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दिले आहे.

आरोपांतील तथ्य शोधणार कसे?

$
0
0
आर्थिक शिस्तीचे धिंडवडे काढणाऱ्या दोन आरोपांनी सध्या महापालिकेचे वातावरण तप्त झाले आहे. या आरोपांनी वैद्यकीय आणि शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न चिन्हे ​निर्माण झाली असून, यातील तथ्य शोधून बाहेर काढण्याची जबाबदारी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी त्वरित पार पाडणे गरजेचे आहे.

नेट-सेट उपयुक्त पुस्तकाचे प्रकाशन

$
0
0
व‌िद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्य व राष्ट्रस्तरीय पात्रता चाचणीसाठी (सेट आण‌ि नेट)उपयुक्त ठरणाऱ्या प्रा. देव‌िदास ग‌िरी व प्रा. छाया लोखंडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले.

कृतज्ञतेतून धावणार नाशिककर

$
0
0
सामाजिक कार्यात सर्वसामान्यांचा सहभाग वाढावा, समाजातील उपेक्षित गरजूंना मदत व्हावी यासाठी ‘नाशिक रन’ गेल्या १२ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असते. दरवर्षी प्रमाणे ही मॅरेथॉन १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता महात्मानगर येथील मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

आंदोलन छेडण्याचा इशारा

$
0
0
शहरातील नामपूररोड ते साठ फुटी रस्त्याचे रुंदीकरण व रस्ता काँक्रिटीकरणाचे काम नगरपरिषदेच्या वतीने चार टप्प्यांत करण्यात आले आहे. नववसाहतीमधील वाहनधारकांचा व पादचा-यांचा हा मुख्य मार्ग असून, चारही टप्प्यांत झालेले हे काँक्रिटीकरण असमांतर असल्याने वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

कादवात एक लाख मेट्रिक टनाचे गाळप

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील सहकारी तत्वावरील सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याने आजपर्यंतच्या सर्व गळीत हंगामापेक्षा अवघ्या ६० दिवसांत एक लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप केले असल्याची माहिती कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.

गुणगौरव सोहळ्याने गजबजला परिसर

$
0
0
महाराष्ट्र प्रदेश ही संतांची भूमी असून, या भूमितूनच ख-या अर्थाने संस्कार व साहित्य निर्माण झाले. साहित्य हे नेहमी जीवनाला दिशा देण्याचे काम करते. समर्पित भावनेने केलेले काम हे निश्चितच दिशादर्शक असते, अशा शब्दांत मराठी साहित्य परिषदेने आज वैतरणा येथे घेतलेला उपक्रम कौतुकास्पद व दिशादर्शक असल्याचे गौरवास्पद मनोगत व्यक्त करून दुखित व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे हे मानवतेचे लक्षण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अहिराणी भाषेच्या अभ्यासिका प्रा. डॉ. श्रीमती उषा सावंत यांनी व्यक्त केले.

बीएसएनएल सेवेचे वाजले `तीन तेरा`

$
0
0
गेल्या दोन दिवसांपासून कळवण तालुक्यातील कळवण, अभोणा, कनाशीसह पश्चिम पट्ट्यात बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क कोलमडले आहे. त्यामुळे या कंपनीच्या मोबाईलधारक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, बीएसएनएलने तातडीने कारभार सुधारावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

...अन् धुक्यात हरवले मनमाड

$
0
0
मनमाड शहर परिसरात गुरुवारी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडी व दाट धुक्यांबरोबरच पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. थंडीसह पावसाच्या आगमनामुळे शहर काही काळासाठी धुक्यात गडप झाले होते. हे चित्र अनुभवताना `मी न माझा राहिलो` अशीच नागरिकांची स्थिती झाल्याचे चित्र होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images