Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

समंत्रक प्रशिक्षणासाठी १२ जानेवारीपर्यंत प्रवेश

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक सेवा विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या समंत्रक प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रमाचे प्रवेशांना सुरुवात झाली आहे. राज्यभरातील ४१ अभ्यासकेंद्रावर १२ जानेवारीपर्यंत ही प्रवेश प्र‌क्र‌िया सुरू राहणार आहे.

पेस्ट कंट्रोल ठेक्यास मुदतवाढ

$
0
0
पेस्ट कंट्रोल ठेकेदारास बाराव्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. ठेकेदारास तीन महिने मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत नवीन ठेका देण्याचे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली.

तोतया पोलिसाला अटक

$
0
0
नाकाबंदी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला तुला गाडी अडविण्याचा काय अधिकार, अशी विचारणा करीत तोतया पोलिसाने दमदाटी केली. त्याच्याकडे पोलिसाचे बनावट ओळखपत्र आढळून आले आहे. पंचवटी पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या एका साथीदाराला अटक केली. न्यायालयाने त्याला ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

नासाकाची निवडणूक प्रक्रिया सुरू

$
0
0
नाशिक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सहकार प्राधिकरणाचे सचिव डॉ. आनंद जोगदंड यांनी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नासाकाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अहमदनगर येथील साखर प्रादेशिक सहसंचालकांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

आंबरे ज्युनिअर महाराष्ट्र श्री

$
0
0
भारत सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालयाची मान्यताप्राप्त इंडियन बॉडी बिल्डर्स असोसिएशन व महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे ज्युनिअर महाराष्ट्र श्री स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत नाशिकच्या अतुल आंबरे याने ज्युनिअर महाराष्ट्र श्री किताब मिळवला आहे.

कुंभमेळा `ट्वेंटी-ट्वेंटी`सारखा उत्सव

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिल्लक कालावधी लक्षात घेता सिंहस्थ हा `ट्वेंटी-ट्वेंटी` मॅच सारखा आहे. कालावधी कमी आणि कामे जास्त अशी स्थिती असल्यामुळे युद्धपातळीवर पण दर्जेदार काम करण्याचे निर्देश कुंभमेळा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी दिले.

प्रेससमोर होर्डिंग्जवरून तणाव

$
0
0
येथील प्रतिभूती मुद्रणालयाच्या ग्रीन गेटजवळील होर्डिंग्ज काढण्यावरून महापालिका आणि प्रेस कामगार यांच्यात गुरुवारी तणाव निर्माण झाला. कामगारांनी महापालिकेचेच वाहन ताब्यात घेतले. महापालिकेने होर्डिंग्ज पूर्ववत लावल्यानंतर वाद मिटला.

‘आयआयए’तर्फे आर्किटेक्ट सत्कार

$
0
0
दि इंडियन इंन्स्टीट्यूट ऑफ आर्किटेक्ट या संस्थेचे राष्ट्रीय चर्चासत्र नॅटकॉन २०१४ नुकतेच पवई येथे पार पडले. येथे नाशिक शहरातील प्रख्यात आर्किटेक्ट धनंजय शिंदे, निलेश वाघ, पंकज पुंड यांना विशेष कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.

आजपासून नाट्यस्पर्धा

$
0
0
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाश‌िक व‌िभागाच्या वतीने ६२ व्या नाट्य महोत्सव प्राथम‌िक स्पर्धेला आजपासून (द‌ि. २) सुरुवात होणार आहे. आजपासून सुरू होणारी ही स्पर्धा महाकवी काल‌िदास कलामंद‌िरात २९ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

नाशिकमध्ये अवकाळी पाऊस

$
0
0
नववर्षारंभीच पहाटे नाशिक शहरात अवकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. येते काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने वर्तविली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीच अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.

फाळके स्मारकाला म‌िळेना न्याय

$
0
0
शहराचा गौरव असणाऱ्या व्यक्त‌िमत्वांपैकी एक दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाची झालेली दैना अद्यापही ‘जैसे थे’ च आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला स्मारकाचा डोलारा पालक संस्थेच्या उदास‌िनतेमुळे प्रेक्षकांच्या पदरी न‌िराशाच टाकतो आहे.

आघाडीचे मंत्री ‘टक्केवारीखोर’

$
0
0
‘आघाडीच्या मंत्र्यानी दहा ते बारा टक्के घेऊन सिंचन प्रकल्पांच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारला. आघाडीच्या मंत्र्यांनी जलसंपदा विभागात भुवया उंचावतील असे कारनामे केले आहेत. सिंचनाच्या मनोरंजक अशा पाच फाईल्सचा अभ्यास सुरू असून येत्या दोन महिन्यात जलसंपदातील भ्रष्टाचाराचा सोक्षमोक्ष लावू, असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

नळपट्टी वसुलीत १० कोटीने वाढ

$
0
0
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत नळपट्टी वसुलीमध्ये ९ कोटी ५२ लाख ८१ हजार रुपयांची वाढ झाली आहे. ६० कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे ४० टक्क्यापर्यंत वसुली झाली असून पुढील तीन महिन्यात ६० टक्के वसुलीचे काम महापालिका प्रशासनाला करावे लागणार आहे.

अखेर भुजबळांचा ‘बडेजाव’ गेला

$
0
0
राज्यसरकारने आघाडीतल्या काळातील मंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठे फेरबदल केले असून माजी मंत्री छगन भुजबळ यांचाही त्यात समावेश आहे. भुजबळांची सुरक्षा व्यवस्था झेड प्लस वरून एक्स दर्जाची करण्यात आली आहे. आता भुजबळांकडील सुरक्षा रक्षकांची संख्या २५ वरून थेट एकवर आली असून त्यांच्याकडील सुरक्षा वाहनांचा ताफा गेला आहे. त्यामुळे भुजबळांचा बडेजाव अखेर भाजप सरकारने काढून घेतला आहे.

‘केटीएचएम’च्या विद्यार्थ्यांचा ‘रीमेक’

$
0
0
कॉलेज म्हणजे विद्यार्थ्यांच्या क्रिएटीव्हीटीला मिळालेलं एक व्यासपीठच असतं. असंच व्यासपीठ मिळालं ते ‘केटीएचएम’ कॉलेजमध्ये व्हिडीओ प्रॉडक्शन विभागामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना. या विभागाच्या ‘मुव्ही ब्रिगेडीयर’ या ग्रुपने ‘मला वेड लागले प्रेमाचे..’, या गाण्याचा रीमेक केला असून ७ जानेवारीनंतर हा रीमेक यू ट्युबर उपलब्ध होणार आहे.

एक एक वीट

$
0
0
घराच्या बांधकामात वीट हा एक महत्त्वाचा घटक असतो. पण आजकाल या वीटांमध्ये भरपूर व्हरायटी पाहायला मिळते. तसेच या वीटा खरेदी करण्याबाबतही ग्राहक चोखंदळ बनले आहेत.

प्रदर्शनातून संदेश पर्यावरण रक्षणाचा

$
0
0
पर्यावरणाचा ऱ्हास टाळून निसर्गाचा समतोल साधता यावा यासाठी हरितकुंभ योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महात्मा फुले कलादालनात नाशिकच्या विभागीय शिक्षण उपसंचालक व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला संघातर्फे पोस्टर व रांगोळी चे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ६ जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

‘नाशिक अपडेट’साठी विकिपीडीयाची कार्यशाळा

$
0
0
मंत्रभूमी ते तंत्रभूमी असा प्रगतीशील विकास साधणाऱ्या नाशिकची ओळख जगाला करुन देण्यासाठी ‘विकिपिडीया’ने पुढाकार घेतला आहे. ज्याप्रमाणे पाश्चिमात्य देशातील शहरांची माहिती इंटरनेटवर अगदी सहज उपलब्ध आहे त्याचप्रमाणे नाशिकची सुधारित माहिती इंटरनेटवर उपलब्ध करुन देण्यासाठी ३ व ४ जानेवारीला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

गाडगे महाराज पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद

$
0
0
संत गाडगे महाराज पतसंस्थेच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या दिनदर्शिकेत धार्मिक रचना, महाराष्ट्रातील थोर संत, बारा ज्योर्तीलिंग, भारतातील नद्यांची माहिती, अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठ, सिंहस्थ कुंभमेळा यावर माहिती प्रसारीत करून आध्यात्मिक मार्गाचा प्रसार करीत आहेत.

चव्हाण यांना गारपीटग्रस्तांचे निवेदन

$
0
0
राज्य शासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली मदत तुटपुंजी असून, वडनेर भैरव भागातील सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे. खासदार चव्हाण यांनी वडनेर भैरव परिसरातील गारपीटग्रस्तांची भेट घेतली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images