Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

व‌िद्यार्थ्यांची ह‌िऱ्यांच्या खाणीस भेट

$
0
0
केटीएचएम महाविद्यालयातील भूगर्भशास्र विभागाच्या १९ विद्यार्थी व शिक्षकांनी मध्य प्रदेशातील ‘पन्ना डायमंड’ खाणीला भेट दिली. भारतातील ही एकमेव ह‌िऱ्याची खाण आहे.

स्वच्छता मित्र स्पर्धेत योग‌िता कसबे प्रथम

$
0
0
नाशिक पंचायत समितीच्या पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाच्या वतीने ग‌िरणारे येथे आयोज‌ित तालुकास्तरीय स्वच्छता मित्र स्पर्धेत योग‌िता कसबे ह‌िने यश म‌िळव‌िले.

पालकांचे ठिय्या आंदोलन

$
0
0
पाल्याच्या शिक्षणाची विचारपूस करण्यास गेलेल्या एका महिला पालकास शहरातील पिंपळेश्वररोड जिल्हा परिषदे प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने अपशब्द वापरून अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी थेट गटशिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठून सदर शिक्षकाची आठ दिवसात बदली न केल्यास शाळेला टाळे ठोकू, असा इशारा दिला आहे.

पालिका सभेत ३४ विषयांना मंजुरी

$
0
0
येवला नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३४ विषयांना मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शबाना बानो शेख या होत्या. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भाग म्हणून एन्झोकेम विद्यालयाची दगडी इमारत ताब्यात घेण्याबाबतही सभागृहात चर्चा झाली.

१२ जागा बिनविरोध

$
0
0
मतदारयादीवरील हरकतींनी चर्चेत आलेल्या येवला औद्योगिक सहकारी वसाहतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १३ जागांसाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, छाननीत सर्व अर्ज वैध ठरले आहेत. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. एम. लोंढे यांनी दिली. वसाहतीच्या संचालक मंडळाच्या १३ जागांपैकी १२ जागा प्रतिस्पर्ध्यांअभावी बिनविरोध झाल्या आहेत.

भयमुक्त धुळे, हेच पहिले ध्येय

$
0
0
धुळे जिल्ह्याच्या शेजारच्याच जिल्ह्यातला रहिवासी असल्याने मला इथल्या समस्यांची चांगलीच जाण आहे. शहरात गुंडगिरीचे प्रमाण नको तितक्या प्रमाणात वाढले आहे. विशेष म्हणजे दोन राज्यांच्या सीमेवर असलेला या जिल्ह्यात अवैद्य धंदेही मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत.

धुक्यामुळे शेतकरी चिंतेत

$
0
0
गेल्या दोन दिवसापासून शहरासह परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असताना शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शहर व परिसरात दाट धुके पडले होते. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नवीन वर्षाच्या प्रारंभीच वातावरणात कमालीचा बदल झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहे.

तीन रेशन दुकानांना नोटिसा

$
0
0
विल्होळी इथल्या खाजगी गोडावूनमध्ये स्वस्त धान्य दुकानातील धान्य सापडल्या प्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाने सिडकोतील तीन संशयित स्वस्त धान्य दुकानदारांना नोटीसा जारी केल्या आहेत. या तिघांना सात दिवसाच्या आत खुलासा देण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी जवंजाळ यांनी दिले आहे.

‘त्या’ मंतरलेल्या आठवणींचा दरवळला सुगंध

$
0
0
शाळेचा तोच बाक जेथे बसण्यासाठी एकमेकांशी भांडायचो. तीच जागा जेथे एकत्रित बसून डब्यातील पदार्थ फस्त करायचो. अक्षरांनी रंगविलेल्या शाळेच्या भिंतींनी त्या मंतरलेल्या दिवसांची आठवण करून दिली, अन् शाळेत प्रवेश घेतल्यापासून निरोप समारंभापर्यंतचे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या डोळ्यांसमोरून तरळून गेले. निमित्त होते माजी विद्यार्थी मेळाव्याचे.

विकासकांचा ‘बाय-बाय’

$
0
0
वाहतूक बेटांसह रस्त्यांच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेने वारंवार आग्रह करूनही विकासकांनी याकामाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यात पुढे येणारे विविध विकसक ठाकरेंनी पाठ फिरवली की, या कामांकडे दुर्लक्ष करीत असल्याची ओरड प्रशासनाकडून होते आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांना प्रतीक्षा नव्या पदानियुक्तीची

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवार, ३ जानेवारीपासून तीन दिवसांसाठी नाशिकच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. ठाकरे या दौऱ्यात महापालिकेच्या प्रकल्पांना भेटी देवून आयुक्तांसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. सोबत नाशिकला गार्डनसिटी बनविण्याच्या आपल्या संकल्पनेला मूर्त रूप देणार आहेत.

जिल्हा प्रशासनावर कोप?

$
0
0
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख ग्यानदास महाराज हे सिहंस्थ कामांच्या पाहणीसाठी आणि प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारपासून नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. ते रविवार साधूग्राम आणि नव्या शाही मार्गाची पाहणी करणार आहेत तर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे.

घाट बनवितांना गोदा झाली अरुंद

$
0
0
नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यात भाविकांना शाहीस्नान कराता यावे यासाठी गोदावरी नदीला लागून घाट बांधण्यात येत आहेत. परंतु, घाट बांधतांना गोदावरी नदी मात्र अरुंद झालेली दिसून येत आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास महापालिकेने बनविलेले हे घाट गायब होण्याची भिती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

झरे पुन​र्जीवीत करण्याची मागणी

$
0
0
गोदावरी नदीपात्रात १६ कुंडे असून ती काँक्रिटीकरणाने बुजवण्यात आली आहेत. या कुंडाचे पुन​र्जीवन झाल्यास गोदावरीचे प्रदूषण आपोआप कमी होईल. त्यामुळे महापालिकेने या मागणीची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचवटी ​विभाग अध्यक्ष तसेच प्राचीन कुंड बचाव समितीचे निमंत्रक देवांग जानी यांनी केली आहे.

आज आंतरराष्ट्रीय नीती परिषद

$
0
0
इंडो त‌िबेटीयन मंगल मैत्री संघाच्या वतीने शनिवारी, ३ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय धर्मन‌िरपेक्षता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पाथर्डी फाटा येथील हॉटेल ज्युप‌िटर येथे सकाळी ९ वाजेपासून या परिषदेस सुरुवात होणार आहे. या परिषदेचे वैश‌िष्ट म्हणजे बौध्द धर्मगुरू दलाई लामा यांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे.

घाटांच्या रचनेत बदल आवश्यक

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या सात घाटाच्या कामांमध्ये अमुलाग्र बदल होणे आवश्यक आहेत. सिंहस्थानंतर घाटाची उपयुक्तता सिध्द झाली पाहिजे. अन्यथा तब्बल १०२ कोटी रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची भीती असून अधिकाऱ्यानी आवश्यक ते बदल करून काम करण्याचे आदेश पाटबंधारे आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

$
0
0
नवनवीन नाटके रंगभूमीवर येत असून, त्यात विविध विषयावर भाष्य केले जात आहे. मात्र, यात सामाजिक विषय, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर कमी प्रमाणात लिखाण होत असल्याची खंत रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाचे सदस्य सूर्यकांत देशपांडे यांनी केले. कालिदास कलामंदिरात शनिवारी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित ६२ व्या नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे ते बोलत होते.

डॉ. गोवारीकरांच्या न‌िधनाने हळहळ

$
0
0
ज्येष्ठ शास्त्रज्ञ आण‌ि पुणे व‌िद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या न‌िधनाच्या वृत्ताने नाश‌िकच्या शैक्षण‌िक वर्तुळावरही शोककळा पसरली आहे.

नावा चषकाचे रंगणार सामने

$
0
0
नाशिक अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज् वेल्फेअर असोसिएशन (नावा) च्या वतीने आयोजित ‘नावा’ चषक टी टेन इंटर मीडिया क्रिकेट स्पर्धा उद्या (दि.४) सकाळी ७.३० वाजेपासून फ्रवशी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर रंगणार आहे. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये रंगणाऱ्या या नावा चषकामुळे सर्व संघामध्ये जल्लोष दिसू लागला आहे.

रेडिरेकनरमध्ये झाली छुपी वाढ

$
0
0
नुकत्याच जाहीर झालेल्या रेडिरेकनरबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. खुल्या जागांमध्ये झालेल्या दरवाढीबाबत सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, काही छुपी दरवाढ देखील करण्यात आली आहे. फूटनोटमधील ही दरवाढ मागे न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी दिला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images