Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'सीटीएस' चेकला मुदतवाढ

$
0
0
रिझर्व्ह बॅँकेने चेक टंकेशन सिस्टीम (सीटीएस)ला पुन्हा ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात सर्व बॅँकांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आल्याने मायकर चेक संपुष्टात आणण्याचा निर्धार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी

$
0
0
चेन स्नॅचर, दुचाकी चोर आणि घरफोडी अशा महत्त्वाच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी चेक पॉइंट तयार केले आहेत. मात्र, या ठिकाणी काम करणा-या कर्मचारी व अधिका-यांकडून 'चोर सोडून, संन्याशाला फाशी' देण्याची कार्यपद्धती अवलंबली जात आहे.

'तोतया' पोलिसांनाही भारी !

$
0
0
आम्ही पोलिस आहोत. पुढे दंगल सुरू आहे. तुमच्याजवळील दागिने काढून ठेवा... आम्ही 'सीआयडी'चे अधिकारी आहोत. तुमच्याजवळ गांजा आहे. झडती घेऊ द्या... अशी बतावणी करून लोकांना लुटण्याच्या घटना वारंवार घडत असतात.

उघड्यावर मांस विक्रीला जोर

$
0
0
शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर मांस विक्री बोभाट सुरू असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‌याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही महापालिकेचा आरोग्य विभाग व अतिक्रमण विभाग या अतिक्रमित दुकांनाकडे डोळेझाक करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गणवेश खरेदीत २८ लाखांचा अपहार

$
0
0
ठेकेदारी, भोंगळ कारभार यामुळे सातत्याने चर्चेत राहणा-या नाशिक महापालिकेत सुमारे २८ लाख रुपयांचा विद्यार्थी गणवेश घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अनेकांनी या गैरव्यवहारात आपले उखळ पांढरे केल्याचे स्पष्ट होत आहे.

उपनगरला कुत्र्यांचा सुळसुळाट

$
0
0
उपनगर व आजुबाजूच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून लहान मुलांवर कुत्र्यांकडून हल्ला होण्याची घटना ताजी असतानाही नाशिकरोडच्या महापालिका कर्मचा-यांना मोकाट कुत्री पकडण्याबाबत जाग येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

वीस हजार युवक लष्करात भरती

$
0
0
देवळाली कॅम्प येथील लष्करी विभागात जिल्ह्यासह राज्यातील युवकांसाठी विविध पदांकरिता मंगळवारपासून (१९ मार्च) भरती सुरु झाली. ही भरती अंतीम टप्प्यात आली असून २४ मार्चपर्यंत राज्यातील वीस हजार युवकांनी या संधीचा फायदा घेतला. मुंबई लष्कर भरती कार्यालयामार्फत भरती प्रक्रिया राबविली गेली.

सर्वसामान्यांचा 'शेअर' वाढावा

$
0
0
'शेअर बाजार म्हणजे फसवणूक हे समीकरणच सामान्यांमध्ये रूढ झाले आहे. मात्र, गुंतवणुकदाराच्या आर्थिक साक्षरते अभावी फसवणूकीचे प्रकार घडतात. शेअर बाजार आज संगणकीकरणामुळे पारदर्शक व सुरक्षित झाला आहे.

पैसा देवो भव:

$
0
0
वाटसरूंना थांबण्याकरिता व विश्रांतीकरिता उभारलेली वास्तू म्हणजे धर्मशाळा. पूर्वी धर्मशाळांमध्ये मोफत मुक्काम असायचा परंतु कालमानानुसार तिचे स्वरूप बदलत चालले असून अतिथी देवो भव: ऐवजी 'पैसा देवो भव:' अशी ती परावर्तित झाली आहे.

सभेतला चिमटा

$
0
0
ग्रामीण भागाच्या मिनी मंत्रालयाचा कारभारच काही निराळा असतो. इथल्या पदाधिका-यांचा बडेजाव तर विचारायलाच नको. महिला पदाधिकारीही काही कमी नाहीत. परवा अशाच एका दिवेधारी महिला पदाधिका-याची अशी काही जिरली की बस्स.

बाजारपेठेत पिचका-यांची मागणी घटली

$
0
0
राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेक मंडळांनी रंगपंचमी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक घरातही लहानमुलांमध्ये पाणी वाचवण्याबाबत जागृकता होत असल्याने त्याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत पिचका-यांच्या मागणीत घट झाली आहे.

विज्ञानाचा वापर आवश्यक तेथेच करावा

$
0
0
जीवनात ऊर्जा आणि विज्ञानावर बंधने आणण्याची गरज निर्माण झाली असून ऊर्जेचा वापर शक्य तितका टाळला पाहिजे आणि आवश्यक तिथेच विज्ञानाचा वापर केला पाहिजे, असा सल्ला पर्यावरणप्रेमी दिलीप कुलकर्णी यांनी दिला.

पुक्टोचा संघर्षाला कारवाईचा लगाम?

$
0
0
राज्यभरात पुक्टोच्या पाठोपाठ सुरू झालेला कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचा तिढा सुटूनही पुक्टोचा संघर्ष अद्याप 'जैसे थे'च आहे. प्राध्यापकांच्या २००९ मधील कामबंद आंदोलनाच्या वेळी फरकाहून दिलेल्या आश्वासनावर पुन्हा एकदा सरकारने घूमजाव केल्याने संघटना अन् सरकार दोघेही इरेला पेटले आहेत.

बँकेत २० लाखांचा अपहार

$
0
0
सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील कॅशिअर राहुल मुक्तीकर याने बँकेतील खातेदारांच्या खात्यातील २० लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

दरोड्याच्या तयारीतील ५ जणांना अटक

$
0
0
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला भद्रकाली पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या टोळीकडून चॉपर, कुऱ्हाड, छिन्नी, मिरचीच्या पुड्या, असा ऐवज जप्त केला.

घाईच्या ठरावात अपहाराचा डाव

$
0
0
गणवेश खरेदी करताना महापालिकेने शालेय वर्षाच्या कालावधीकडे हेतपुरस्सर दुर्लक्ष केले. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये निविदा प्रक्रिया राबवून जुन-जुलैमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप होणे अपेक्षित असताना महापालिकेने डिसेंबरमध्ये गणवेश खरेदीचा ठराव संमत करून ठेकेदराचे हित जोपासले.

औद्योगिक धोरणात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप

$
0
0
मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांत आता नव्या उद्योगवाढीला जागा राहिलेली नाही. त्यामुळे राज्याच्या औद्योगिक तसेच वस्त्रोद्योग धोरणात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप दिले जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

विनयभंग प्रकरणी अटक संशयितांना जामीन

$
0
0
नाशिक-पुणे हायवेवरील एका कंपनीत काम करणा-या २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी अटक केलेल्या सात संशयितांना कोर्टाने जामीनवर सोडले. शनिवारी सायंकाळी हा गुन्हा दाखल झाला होता.

अंधारात 'मंगल'मूर्तीनगर

$
0
0
नाशिक- पुणेरोडवरील उपनगरच्या मंगलमुर्तीनगर भागात गेल्या १५ दिवसांपासून पथदिप बंद असून महापालिकेत तक्रार करुन नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेचे कर्मचारी नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत असून नगरसेवकही काही कारवाई करीत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

माहितीपटांनी बहरली व्ही. शांताराम नगरी

$
0
0
कुसुमाग्रज स्मारकातील चित्रपती व्ही. शांताराम थिएटरमध्ये रविवारी विविध फिल्मस दाखविण्यात आल्या. निफ फिल्म फेस्टिव्हलचा आज समारोप असल्याने रसिकांनी माहितीपटात अधिक रस दाखवत विषयांची माहिती करून घेतली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images