Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सुपिक जमिनीत डम्पिंग ग्राऊंड

0
0
प्रतिभावान लोक कचऱ्यातून सोन्याची निर्मिती करतात. मात्र, नाशिक महापालिका अधिकाऱ्यांनी सोन्यासारख्या जमिनीत कचरा पेरण्याचा प्रयोग यशस्वी करण्याचा चंग बांधला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मोहन भागवत त्र्यंबकमध्ये

0
0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मंगळवारी संघाच्या नियमित बैठकीसाठी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत. त्र्यंबकेश्वर जवळील तळवाडे येशील योग विद्याधाम मध्ये बुधवारी संघाची विशेष बैठक होत आहे.

उसाला १६०० ‍रुपये पेमेंट

0
0
रानवडच्या कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याच्या वतीने यंदाच्या गळीत हंगामात आलेल्या उसाचे पह‌िल्या पंधरवड्याचे ऊस पेमेंट १६०० रुपये प्रत‌ि टनाप‍्रमाणे देण्यात आले आहे, अशी माह‌िती कारखान्याचे जनरल मॅनेजर पी. आर. जाधव, फायनान्स मॅनेजर अतुल डोळे यांनी द‌िली.

'त्या' कारखान्यांचा गौरव

0
0
राज्य सरकारच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून ग्रीनबुक व सेफ्टी कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. तसेच वर्षभर औद्योगिक सुरक्षा पाळणाऱ्या मोठे, लघु व मध्यम कारखान्यांचाही प्रशिस्तपत्रक व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

'एचएएल क्रेडीट'च्या लेखापरीक्षकांना नोटिसा

0
0
ओझर इथल्या एच.ए.एल.एम्प्लॉईज को.अॉप क्रेडीट सोसायटीच्या लेखापरिक्षणात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी सहा लेखापरीक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. सोसायटीचे वार्षिक लेखापरीक्षण करतांना संचालकाच्या बेकायदेशीर कामांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका लेखापरीक्षकांवर ठेवण्यात आला आहे.

नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे चौपदरीकरण

0
0
सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने त्र्यंबकेश्वरसह परिसरात ३१८ कोटींची विकासकामे सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाची आहेत. त्र्यंबक शहरास जोडणारे रस्ते रूंदीकरण व मजबुतीकरण सुरू झाले आहे. नाशिक-त्र्यंबक रस्ता चौपदरी होत असून, हे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे.

कामयानी एक्स.ला लासलगाव थांबा द्या!

0
0
लासलगाव रेल्वे स्थानकात कामयानी एक्स्प्रेसला थांबा मिळावा, या मागणीचे निवेदन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना लासलगाव शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.

गैरव्यवहारप्रकरणी कारवाईची मागणी

0
0
तालुक्यातील अंबासन येथील ग्रामपंचायतीत पाच वर्षाच्या कार्यकाळात जवळपास ४५ लाख रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. त्यामुळे ग्रामविकासाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

फुले मार्केटला समस्यांचा विळखा

0
0
जुने नाशिक येथील सवार्त जुनी मंडई म्हणून प्रसिध्द असलेल्या महात्मा जोतिबा फुले मार्केटला अतिक्रमण, अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. या मार्केटला नवा लुक देण्याच्या उद्देशाने स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला. परंतु, त्यास दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.

रतन चावला, कुसाळकर यांची हकालपट्टी

0
0
भाजपाचे नाशिक तालुकाप्रमुख रतन चावलासह पदाधिकारी सुरेश कुसाळकर यांना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. अनुशासन समितीच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माह‌िती महानगरप्रमुख लक्ष्मण सावजी यांनी दिली आहे.

गंगापूररोडचा श्वास झाला मोकळा

0
0
पंडित कॉलनी ते जेहान सर्कल आणि जेहान सर्कल ते बेंडकुळे मळ्यापर्यंतची अतिक्रमणे महापालिकेने हटविल्याने गंगापूर रोडचा श्वास मोकळा झाला आहे. मंगळवारी दुसऱ्या टप्यात झालेल्या अतिक्रमण मोहिमेत गंगापूररोडवरील सर्वच हॉटेलांची अतिक्रमणे महापालिकेने जमीनदोस्त केली.

पेस्ट कंट्रोल ठेक्याला बारावेळा मुदतवाढ

0
0
शहरातील पेस्ट कंट्रोलचे काम पाहणाऱ्या ठेकेदारास बाराव्यांदा मुदतवाढ देणाऱ्या प्रशासनाने यापोटी आजवर २ कोटी​ १६ लाख रूपये खर्ची घातले आहेत. आता आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे असून यासाठी ५९ लाख रूपये खर्च अपेक्षित आहेत.

अंजनेरी,अवनखेड आदर्श ग्राम

0
0
सांसद ग्राम योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अंजनेरी आणि अवनखेड ही दोन्ही गावे आदर्श होण्याच्या वाटेवर आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी या दोन्ही गावांमध्ये होणार असून, त्याचे नियोजन सध्या सुरू झाले आहे.

पेठ रस्त्याचा विस्तार

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि गुजरात राज्याला जोडणाऱ्या पेठ रस्त्याचे रुंदीकरण पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

आठ जागांसाठी ७७ कोटी

0
0
सिहंस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यातच आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या महापालिकेसमोर भूसंपादनाच्या किचकट प्रक्रियेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आज, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीसमोर भूसंपादनाचे १३ प्रस्ताव असून, यातील ८ प्रस्तावांसाठी तब्बल ७७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

गॅस ग्राहकांसाठी ‘बुरे दिन’

0
0
नव्या वर्षापासून थेट बँक खात्यात अनुदान जमा करण्याची ‘पहल’ ही योजना केंद्र सरकारने सुरू केली असली तरी, विविध कारणाने ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गॅस ग्राहक हैराण झाले असून, या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.

अतिक्रमणधारकांना झटका

0
0
संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेली महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. मंगळवारी दिवसभरात गंगापूररोडवरील सर्वच हॉटेलांची अतिक्रमणे महापालिकेने जमीनदोस्त केली.

झेडपीत संगीतखुर्ची

0
0
नाशिक जिल्हा परिषदेत नियुक्ती देण्यात आलेले वर्ध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी पदभार घेण्यासाठी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर वेटींगवरील सुखदेव बनकर यांना काम सुरू ठेवण्याचे तोंडी आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कारभाराचा गोंधळ अधिक वाढला आहे.

शूटिंगसाठी नाशिक

0
0
मूळातच लाभलेली सृष्टीसौंदर्याची देणगी आता नाशिकला चित्रनगरीच्या दिशेनेही घेऊन जात आहे. मराठीच नव्हे तर मोठमोठ्या बॅनरच्या हिंदी चित्रपटांच्या शूटिंगसाठी नाशिकची प्राधान्याने निवड केली जात असून गेल्या दीड वर्षात नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये सात हिंदी सिनेमांचं शूटिंग झालं आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीत शूटिंगसाठी नाशिक हिट ठरले आहे.

नाशिकचे आशिक!

0
0
नाशिक ही तपोभूमी आहे. महान ऋषीमुनींची भूमी आहे. त्र्यंबकेश्वर हे गोदावरीचे जसे उगमस्थान आहे तसेच नाशिकमध्येही अनेक ऐतिहासिक व धार्मिक व्यक्तीमत्वांचेही जन्मस्थान आहे. कुंभातले अमृत नदी पात्रात पडले आणि हे शहरच पावन झाले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images