Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पत्रकारितेची सुरुवात वृत्तपत्रातूनच करावी

$
0
0
पत्रकारीतेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांचा कल हा इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडे आहे. यासंबंधी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी पत्रकारितेत करीअर करायचे झाल्यास वृत्तपत्रातून सुरुवात करावी, असे प्रतिपादन पत्रकार व वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांनी केले.

नाशिकचा शरीरसौष्ठव संघ जाहीर

$
0
0
भारत सरकारच्या क्रीडा व युवक मंत्रालय मान्यताप्राप्त इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन व महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशन यांच्यातर्फे सांगली येथे आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघातर्फे निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली.

सरसंघचालकांच्या आगमनाचे कोडे

$
0
0
त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या तळवाडे येथील योगविद्याधाम येथे सरसंघचालक मोहन भागवत हे राष्ट्रीय पातळीवरील नियोजनासाठी आले असल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती घेतली असता घरवापसी अभियानाचे नियोजन व त्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी ते आले असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे.

नायलॉन मांजाची होळी

$
0
0
संक्रांतीचा सण अवघ्या आठवडाभरावर येवून ठेपल्याने लासलगावसह परिसरातील पतंगप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला आहे. मात्र, लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे स्वाभिमानी यूथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चिनी बनावटीच्या मांजाची होळी करण्यात आली.

कावनईला सिंहस्थाची कामे संथ गतिने

$
0
0
सिंहस्थाचे मुळक्षेत्र समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांच्यासह विविध संतानी भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्याची प्रशासनाला सूचना करणार असल्याचे यावेळी महंत ग्यानदास यांनी नमूद केले.

कुचकामी सिग्नलमुळे वाहनांची घुसखोरी

$
0
0
जुने नाशिक परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी असलेली सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलिसांच्या गैरहजेरीमुळे कुचकामी ठरली असून बेशिस्त वाहनधारकांनी घुसखोरी वाढत असून यामुळे लहानमोठे अपघात घडत आहेत. या सिग्नलवर रस्ता ओलांडतांना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

पेस्ट कंट्रोल ठेक्याच्या मुदतवाढीला ब्रेक

$
0
0
डेंग्यूमुळे वादग्रस्त ठरलेल्या पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याचा विषय बुधवारच्या स्थायीच्या बैठकीत चागंलाच गाजला. आरोग्य विभागाने तब्बल अकरा महिने बेकायदेशीरपणे पेस्ट कंट्रोल ठेक्याला मुदतवाढ दिल्याचा आरोप सदस्यांनी केला असून, यात ५९ लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका अधिकाऱ्यांवर ठेवला आहे.

कुणाचा आत्मक्लेश तर, कुणाची धमकी

$
0
0
महापालिकेत नगरसेवकांची साधी देखभाल दुरूस्तीचेही कामे होत नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांचा उद्रेक बुधवारी झाला. यात सत्ताधारी मनसेच्या नगरसेवकांचा संताप हनावर झाला असून ‘जिथे प्रभागाचीही कामे होत नसतील तर, ती सत्ता काय कामाची’ असे सांगत नागरिकांना काय तोंड दाखवावे असा सवाल सभापतींना विचारत मनसे नगरसेवकांमधील अस्वस्थता बुधवारी बाहेर आली.

सीए, बँकेची फसवणूक

$
0
0
सीएच्या नावाचे खोटे शिक्के तयार करून त्याआधारे ३९ लाखांचे कर्ज मंजूर करवून घेऊन सेंट्रल बँक ऑफ इंडियाची तसेच, संबंधित सीएची फसवणूक करण्यात आली. बँकेच्या रेडक्रॉस येथील शाखेत २९ ऑक्टोबरपूर्वी हा प्रकार घडला.

गुन्ह्यांचा तपास सचोटीने करा

$
0
0
गुन्ह्याचा तपास पोलिस किती प्रामाणिकपणे, सचोटीने आणि गांभीर्याने करतात यावरूनच त्या गुन्ह्याच्या निकालाचे भवितव्य ठरत असते. न्यायदेवता व्यक्ती पाहून नव्हे तर पुरावे पाहून न्याय देते. प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकाऱ्यांनी याचे भान ठेऊनच तपास करावा, असा सल्ला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी बुधवारी दिला.

‘एलईडी’वर नव्या खरेदीची कडी

$
0
0
घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे या उक्तीनुसार नाशिक महापालिकेचे सध्या कामकाज सुरू आहे. शहरात एलईडी बसवण्याचा २०२ कोटींचा वादग्रस्त ठेका मंजूर असतानाच प्रशासनाने आता पुन्हा सध्याच्या दिव्यांच्या दुरूस्तीसाठी तीन कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

भूसंपादन प्रस्तावांना ‘ब्रेक’

$
0
0
प्रभागातील दैनंदिन कामांच्या दोन दोन लाखांच्या फाईली मंजूर न करणाऱ्या प्रशासनाला बुधवारी स्थायी समितीच्या सदस्यांनी जोरदार झटका दिला. सिंहस्थाच्या नावाखाली भूसंपादनासाठी आलेल्या शंभरपेक्षा अधिक कोटींचे अकरा प्रस्ताव स्थायीने फेटाळून लावले.

गोदावरीचे गटारीकरण थांबवा

$
0
0
गोदावरीचे गटारीकरण तातडीने थांबवावे व असा प्रकार करणारे लवकरच गजाआड जातील. प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन करण्याबरोबरच इतर धर्मांचा आदर करावा. घरवापसीसारख्या चर्चा घडवून दोन्ही धर्मातील कट्टरपंथीय तेढ निर्माण करीत आहेत.

सकारात्मक मानसशास्त्रावर आज राष्ट्रीय परिषद

$
0
0
लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात शुक्रवारी, आज सकारात्मक मानसशास्त्र राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सकारात्मक मानसशास्त्र : मानसशास्त्रीय आणि मानसिक आरोग्य आणि खुशालीच्या नव्या परिमिती’ हा व‌िषय या दोन द‌िवसीय परिषदेसाठी ठेवण्यात आला आहे.

सेंट फ्रान्स‌िसच्या पालकांचा शन‌िवारी एकजूट मेळावा

$
0
0
अन्यायकारक फी वाढीच्या न‌िषेधार्थ पालकांनी द‌िलेल्या यशस्वी दीर्घकालीन लढ्यान‌िम‌ित्त शन‌िवारी एकजूट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शन‌िवारी (द‌ि.१०) सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक येथे हा मेळावा होणार असल्याची माह‌िती श‌िक्षण बाजारीकरण व‌िरोधी मंचने द‌िली आहे.

कचऱ्याच्या पुनर्वापरास हवे प्राधान्य

$
0
0
‘प्रदूषणाचे मोठे आव्हान आज जगापुढे आहे. याच बरोबरीला रोज न‌िर्माण होणारा अफाट क्षमतेच्या अन् व‌िव‌िध प्रकारच्या कचऱ्याची व‌िल्हेवाट योग्य पध्दतीने लावली जात नाही. परिणाम‌ी पर्यावरणासारख्या समस्यांमध्ये मोठी भरच पडते. याला आळा घालण्यासाठी कचऱ्यावर प्रक्र‌िया करून पुनर्वापराच्या पध्दतीला प्राधान्य द्यायला हवे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एस. पी. काळे यांनी व्यक्त केली.

महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

$
0
0
शहरातील सातपूर एमआयडीसी जवळील शिवाजीनगर परिसरात विवाहिता शोभा पाटील यांची भरदिवसा त्यांच्या घरात शिरून हत्या करण्यात आली. यानंतर एमआयडीसी भागातीलच नव्हे तर शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नाशिकला द्या डबल डेकर रेल्वे

$
0
0
प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मुंबई-रत्नागिरी-मडगाव ही डबल डेकर जलद रेल्वे गाडी मध्य रेल्वेकडून येत्या एक फेब्रुवारीपासून बंद करणार आहे. ही गाडी भुसावळ-मुंबई अशी चालविण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बुरड यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

हतगड बारी रस्त्याची लागली वाट

$
0
0
सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ सुरगाना यांच्या कार्यक्षेत्रातील हतगड बारीच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. त्याकडे सदर विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्यांची वाट लागलेली आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

‘त्यांनी’ पहिल्यांदाच पाहिले पोलिस ठाणे

$
0
0
पोलिस निरीक्षक होण्यासाठी काय करावे लागते इथपासून ते पोलिसांकडे असलेल्या बंदुका कोणत्या प्रकारच्या असतात अशा नानाविध प्रश्नांची सरबत्ती शालेय विद्यार्थ्यांनी पोलिसांना करून पोलिस प्रशासनाबाबत आपल्या मनात असलेल्या विविध शंका जिज्ञासा यांचे समाधान करून घेतले. निमित्त होते पोलिसांच्या रेझिंग डेचे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images